एकंदरच नोटबंदी व रिअल इस्टेटमध्ये महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे विकासकांना आशा आहे ती अशा सण किंवा मुहूर्ताकडूनच! या सर्व बाबी पाहता कोणतीही जागा किंवा घर खरेदी करताना ऑफर्स व सवलतींच्या मागच्या नियमांची पडताळणी करणे आवश्यक आहे.

घरांवर मिळणारी ऑफर्स म्हटलं की लोकांच्या भुवया उंचावतात. मग त्या ऑफर्समध्ये आम्हाला किती फायदा होतोय, याचा विचार करून ऑफर्स घ्यायची की नाही हे ठरविले जाते. कधी कधी तर ऑर्फसना भुलून घर खरेदीचा विचार करणारी मंडळीही आहेत. परंतु या ऑफर्समागे लपलेलं सत्य अनेक ग्राहक लक्षात घेत नाहीत.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
Pune cyber crime Five Delivery Boy
दिवसा डिलीव्हरी बॉय, रात्री सायबर क्रिमिनल; कोट्यवधीची फसवणूक करणारे आरोपी जेरबंद
two wheeler thieves enjoy at dance bar
नागपूर: वाहन चोरायचे अन् डान्सबारमध्ये पैसे उडवायचे…

आजकाल ऑनलाइन शॉपिंग किंवा मॉल्समध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ऑफर्सचा फार मोह असतो. अशाच ऑफर हजार दोन हजारांच्या वस्तूंवरच नाही तर चक्क करोडोंच्या घरांवरही दिल्या जातात. गेल्या काही वर्षांत विकासक घरांसाठी देत असलेल्या या ऑफर्सची खूप चलती आहे. शिवाय गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दिवाळी अशा सणांच्या शुभ मुहुर्तावर घरखरेदी करण्याला ग्राहकांची पसंती असते. अशा वेळी शून्य डाऊन पेमेंट, खास सुविधा कमी पैशात किंवा गाडी मोफत, हेलिकॉप्टर राइड व अनेक सोयीसुविधांचे आमिष अशा अनेक ऑफर्स विकासकाकडून दिल्या जातात.

साई इस्टेट कन्सलटंटकडून मुंबईत एक घर घेतल्यावर अलिबागमधील घर मोफत मिळवण्याची संधी ग्राहकांना दिली आहे. वडाळयातील अजमेरा आयलंडकडून बोरिवलीत घर घेतल्यास डाऊन पेमेंट नंतरची उर्वरित रक्कम ताबा मिळण्याच्या एक वर्षांनंतर भरण्याची ऑफर ग्राहकांना देण्यात आली आहे. परवडणाऱ्या घरांना पायाभूत सुविधांचा दर्जा दिल्याने व १ मेपासून लागू होणाऱ्या रेराचा नक्कीच रिअल इस्टेट क्षेत्रावर मोठा परिणाम आहे. व्याजदर कपात व घरखरेदीसाठी अनुकूल वातावरणामुळे अक्षय्यतृतीयेच्या घरखरेदीत वाढ होण्याच्या अपेक्षा अजमेरा ग्रुपचे डायरेक्ट धवल अजमेरा आणि एमसीएचआईचे अध्यक्ष व निर्मल लाइफस्टाइलचे अध्यक्ष धर्मेश जैन यांनी व्यक्त केल्या आहेत.

भारतात सणासुदीच्या वेळी घर घेण्याला वेगळे महत्त्व असते. त्यामुळे अशा वेळी घरखरेदी करताना कुठेतरी ग्राहक भावनिक विचार करतो. आणि हेच कित्येकदा नुकसानदायी ठरते. कारण भावनिकदृष्ट्या विचार करत असताना संबंधित ऑफर्सच्या नियम व अटी बहुतेक वेळा लक्षपूर्वक पाहिल्या जात नाहीत. आणि नेमकी हीच चूक ग्राहक करतात, असे नाहर ग्रुपच्या वाईस चेअरपर्सन व नरेड्कोच्या वाईस प्रेसिंडेंट मंजु याज्ञिक यांनी सांगितले. घर घेताना फॉरेन ट्रिप किंवा गाडी हे महत्त्वाचं नसून एक उत्तम दर्जाचं घर मिळावं हा हेतू ग्राहकाचा असावा. घराचा व्यवहार करताना ऑफर्समधील लपलेल्या किमती व त्यांचे हिशेब केल्यावर ग्राहकाला द्यावी लागणारी एकूण रक्कम याचा विचार अधिक करणे ग्राहकांना फायदेशीर ठरू शकते, असा सल्ला याज्ञिक यांनी दिला.

विकासकांच्या या ऑफर्स स्वीकारू नये किंवा त्या खोटय़ा असतात असं नाही, मात्र आपल्याला जसं घर हवं आहे, घरातल्या सर्व व्यक्तींच्या गरजा पूर्ण करणारे ठिकाण या ग्राहकाच्या घर घेण्यामागच्या गरजा पूर्ण होत असतील तर या ऑफर्स स्वीकारण्यात काहीच हरकत नाही.

ग्राहकाने घर घेताना तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन व्यवहाराबाबतचे निर्णय घेतले पाहिजे. गुंतवणूक किंवा राहण्यासाठीच्या सर्व गरजा समजून घेतल्यास निर्णय अधिक सोयीस्करपणे घेता येऊ  शकतो. सध्या रिअल इस्टेट मार्केट ग्राहकांसाठी स्थिर आहे, बरेच डिस्काऊंट्स आहेत आणि गृहखरेदीसाठी उत्तम काळ असल्याचे भासवण्यात येत आहे. मात्र घराचा ताबा मिळण्यासाठी उशीर झाल्यास डिसकाऊंट ऑफर्स हे सर्व काही पुसून जातं. अशातच विकासकाचा इतिहास जाणून घेणे, त्याने केलेले बांधकाम जाणून घेणे तसेच विकासकाची सध्याच्या बांधकामांची स्थिती ही सर्व माहिती असणे गरजेचे आहे. ही माहिती घेतल्यावर तुम्ही घेत असलेल्या घराची खरी किंमतही तुम्हाला कळू शकते. विकासक नेहमी त्यांच्याकडे आधीपासून असलेली मालमत्ता यावरच ग्राहकाशी  एक उत्तम करार करण्याचा प्रयत्न करतो.

एकंदरच नोटबंदी व रिअल इस्टेटमध्ये महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे विकासकांना आशा आहे ती अशा सण किंवा मुहूर्ताकडूनच! या सर्व बाबी पाहता कोणतीही जागा किंवा घर खरेदी करताना ऑफर्स व सवलतींच्या नावाने खूश न होता त्यामागच्या नियमांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या मायाजालात ग्राहकांनी न अडकता सारासार विचार करून तसेच तज्ज्ञांच्या मदतीने गृहखरेदी करावी.

स्वाती चिकणे vasturang@expressindia.com