आपल्या शेजारचा मधूनमधून अचानक भेटण्याची जागा म्हणजे ‘कॉमन पॅसेज’ असे मी म्हणतो. किंवा लिफ्ट बंद पडली, लाइट गेले, पाणी नसले की सोसायटीतल्या सभासदांची एकत्र येण्याची जागा म्हणजे कॉमन पॅसेज.

फ्लॅट/ ब्लॉक संस्कृतीमुळे कॉमन पॅसेज ह्य़ा  जोडगोळी शब्दाला महत्त्व प्राप्त झाले. घराच्या किंवा बंगल्याच्या अशा मोकळ्या जागेला व्हरांडा म्हणतात. हल्ली ब्लॉकच्या किमती बिल्टअप व कार्पेट एरियावर ठरवतात. त्यात परत बिल्डरने ‘सुपर बिल्टअप’ असे नवीन गोंडस नाव देऊन, कॉमन पॅसेजची वाटणी केली व ब्लॉकचा एरिया फुगवून किंमत वाढवली. म्हणूनच तो पॅसेज हा कॉमन असला तरी तो आपला आणि शेजाऱ्यांचा आहे ही जाणीव ठेवून, त्याची स्वच्छता देखभाल त्या त्या मजल्यावरील सभासदांनी घेतली पाहिजे.

PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

नको असलेली अडगळ म्हणजे मुलांची जुनी सायकल, कुंडय़ा, चपलांचा स्टॅण्ड वगैरे ठेवण्याची जागा म्हणजे कॉमन पॅसेज. काही शेजारी तर कचरावाली सकाळी लवकर येते म्हणून उठायला नको म्हणून कचऱ्याने ओथंबलेली बादली आदल्या दिवशी रात्रीच कॉमन पॅसेजमध्ये ठेवतात. मग त्याची घाण येवो किंवा रात्री उंदीर वरती येऊन बादली उपडी करो, यांना त्याची फिकीर नसते. एकांतात किंवा प्रायव्हेट असे मोबाइलवर बोलण्याची जागा किंवा हमखास मोबाइलला रेंज मिळणारी जागा म्हणजे कॉमन पॅसेज.

घरात कितीही गप्पा मारल्या तरी पाहुण्यांबरोबर खासकरून आपल्या माणसांबरोबर लिफ्ट किंवा जिन्यासमोरील पॅसेजमध्ये गप्पांचा ‘फायनल टच’ कॉमन पॅसेजमध्ये देत असतात. प्रत्येक घरातल्या बायकांची दरवाजात उभे राहून, दरवाजातच उभ्या असलेल्या शेजारणीबरोबर गॉसिप करण्याची जागा म्हणजे कॉमन पॅसेज. त्यात परत कॉमन भाजीवाला, फळवाला, बिस्कीटवाला, मच्छीवाली, इस्त्रीवाला कॉमन पॅसेजमध्ये येऊन बसला की महिलावर्गाला एकत्र येण्याचा चान्स मिळतो. तेव्हा एकमेकांच्या आवडीनिवडीवरून आपली श्रीमंती दाखवण्याची अहमहमिका लागते.

कॉमन पॅसेजसाठी खास दिवस असतात ते दिवाळीत. कारण दिवाळीत आपापल्या घरापुढील जागेत रांगोळी काढणे, आकाश कंदील, तोरणे लावणे, यानिमित्ताने यंग जनरेशन (शेजारपाजारचे) वारंवार एकमेकांना भेटत असतात. ज्येष्ठ महिला आधी राहात असलेल्या चाळीतल्या कॉमन गॅलरीची व जुन्या दिवाळीच्या आठवणी काढून नवीन पिढींना टोमणे मारत असतात. आमच्या घराशेजारी त्यांचा दरवाजा व दुसऱ्या बाजूला जिना असल्यामुळे आम्हाला कॉमन पॅसेजची ‘आमची’ अशी जागा नसल्यामुळे माझी बायको लिफ्टसमोरील भागात रांगोळी काढून हौस भागवते. हल्ली तर लिफ्टसमोरील कॉमन पॅसेज सुंदर पेंटिंग किंवा चांगल्या झाडाची कुंडी, गणपतीची मूर्ती वगैरे ठेवून सजवण्याची स्टाइल निघाली आहे. कारण लिफ्टमधून वरखाली करणाऱ्या सभासदांना ते दिसले पाहिजे.

काही जण कॉमन पॅसेजचा आपल्याकडील भाग स्वत:चा समजून ग्रिलचा दरवाजा लावून तो भाग आत घेतात. काही जण मार्बल टाइल्स कापणे, फर्निचर बनवणे वगैरे कामे कॉमन पॅसेजमध्ये करून शेजाऱ्यांना त्रास देतात. कॉमन पॅसेजमधली साधी टय़ुबलाइट गेली तरी कोणी लक्ष देत नाहीत, व्यवस्थापकाला कळवणार कोण? तू तू मै मै चालू असते.

कॉमन पॅसेजचा एक हटके उपयोग आमच्या शेजारचे काका करतात तो म्हणजे सिगारेट ओढायला. घरात मनाई असल्यामुळे ते कॉमन पॅसेजच्या खिडकीत निवांत उभे राहून सिगारेट ओढत असतात.

असाच कॉमन पॅसेजचा कौटुंबिक भावनिक उपयोग शेजारच्या नवीन दाम्पत्याने केला आहे. त्यांचे लहान मूल ओक्साबोक्सी रडत असेल तर घराच्या बाहेर पॅसेजमध्ये त्याला घेऊन फेऱ्या मारल्यावर ते थांबते, हे मी पाहिले आहे. त्याच्या उलट आमच्या खालच्या मजल्यावर एका कुटुंबात आई मुलाला शिक्षा म्हणून घराबाहेर कॉमन पॅसेजमध्ये उभे करून ठेवते. कावराबावरा घाबरलेला मुलगा रडत उभा राहिलेला मी खाली उतरताना पाहिला आहे.

हल्ली मोटारी-स्कूटरमुळे अंगण भरलेले असल्यामुळे दुधाची तहान ताकावर म्हणून लहान मुले कॉमन पॅसेजमध्येच टुकुटुकु क्रि केट खेळत असतात.

घरात राहणाऱ्या नोकरांची झोपण्याची उत्तम सोय म्हणजे कॉमन पॅसेज. येथे त्यांना जरा स्वतंत्रता, मोकळेपणा मिळतो. रात्री बाहेर फेरफटका मारून उशिरा घरी आले तरी चालते. शिवाय अप्रत्यक्ष, घराबाहेर तो झोपल्यामुळे पहाराही असतो. दुसऱ्या मजल्यावरील कॉमन पॅसेजचे दर्शन जेव्हा लिफ्ट बंद पडते तेव्हाच होते, ही हल्लीच्या टॉवरची परिस्थिती आहे.

– श्रीनिवास डोंगरे
vasturang@expressindia.com