मंडळी आज विद्युत सुरक्षा या कॉलममध्ये आपण विजेवर चालणाऱ्या सर्वमान्य आणि बहुतांश जनतेचा रोज संबंध येणाऱ्या उपकरणाबद्दल चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे ‘लिफ्ट’ अर्थात उद्वाहन. सध्या संपूर्ण देशात बांधकाम क्षेत्र कमालीचे विस्तारले आहे, जागेची कमतरता असल्यामुळे उंच टॉवर्स आणि हाय राईज बिल्डिंग्जची संकुले बांधण्याकडे बांधकाम व्यावसायिक जास्त भर देत आहेत. आजच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करणाऱ्या या संकुले व टाऊनशिप्सची निर्मिती हे एक मोठेच आव्हान असतं; त्यासाठी आवश्यक असते दूरदृष्टी, नियोजन, प्रचंड जबाबदारी पेलण्याची तयारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्कम आणि भरवशाची साथ!

मॅकेन्झी २०१०चा रिपोर्ट असं सांगतो की, भारतामध्ये पुढील २० वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात शहरीकरण होणार आहे. कामासाठी असलेल्या विविध संधी, शैक्षणिक सुविधा, कला, क्रीडा आणि इतर सांस्कृतिक संधी या सर्वामुळे भारताच्या ग्रामीण भागांतून अधिकाधिक लोकसंख्या शहरांकडे आकर्षित होत आहे. या लोकसंख्येला पुरे पडण्यासाठी शहरी प्रशासनाला प्रचंड प्रमाणात वीज, पाणी, रस्ते, उद्वाहने, मलनि:सारण, कचरा व्यवस्थापन या सर्वासाठी अधिकाधिक यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच त्याला शहरातील उद्योग व्यावसायिकांनी मदतीचा हात दिल्यास ही प्रगती अधिक झपाटय़ाने होईल.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Toronto airport cargo facility Heist
कॅनडामध्ये ‘मनी हाइस्ट’ प्रमाणे सर्वात मोठी चोरी; भारतीय वंशाच्या आरोपींनी ४०० किलो सोने पळविले
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात टॉवर्सची उभारणी झाल्यावर तेथील रहिवाशांना वर-खाली वाहतुकीसाठी (Vertical Transport)) जे उपकरण वापरण्यात येते त्यास लिफ्ट अथवा उद्वाहन म्हणतात. आजकाल सर्व हाऊसिंग सोसायटीज, कॉर्पोरेट ऑफिसेस, औद्योगिक क्षेत्र, शॉपिंग मॉल्स इत्यादींमध्ये लिफ्टस्चा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे त्याबाबतचे नियम आणि लिफ्टस्चा सुरक्षितपणे वापर या संदर्भात सर्वसामान्य लोकांना माहिती मिळणे आवश्यक झाले आहे. विद्युत नियमावली ही संपूर्ण हिंदुस्थानात एक आहे. वीज कायदासुद्धा सर्व राज्यांमध्ये एकच आहे, तसे लिफ्टच्या बाबतीत मात्र नाही.

प्रत्येक राज्यात स्वतंत्र उद्वाहन कायदा व नियमावली अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र उद्वाहन कायदा १९३९ व महाराष्ट्र लिफ्ट नियम १९५८’प्रमाणे लिफ्टची उभारणी व नियमन/ देखभाल होत आहे. यातील महत्त्वाची कलमे खालीलप्रमाणे-

महाराष्ट्र उद्वाहन नियम १९५८च्या नियम क्र. ४ प्रमाणे प्रत्येक उद्वाहन ग्राहकाने लिफ्टची उभारणी झाल्यावर महिनाभराच्या आत उद्वाहन निरीक्षकास (Lift Inspector) लायसेन्ससाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यानंतर निरीक्षण होऊन सर्व व्यवस्थित असल्यास सदर लिफ्टला नियम क्र. ४(२) प्रमाणे परवाना दिला जातो, जो प्रत्येक लिफ्टमध्ये लावणे कायद्याने बंधनकारक आहे. जर एखाद्या सोसायटी, कॉर्पोरेटमधील उद्वाहनात हे प्रमाणपत्र लावले नसेल तर त्यास ‘बिगर परवाना’ या अंतर्गत कायदेशीर कारवाई करता येते. कुठल्याही सोसायटी, ऑफिस, हॉस्पिटल, मॉल्स इत्यादी ठिकाणी उभारलेल्या लिफ्टच्या देखभालीसाठी नियम क्र. ६ प्रमाणे शासनप्राप्त उद्वाहन कंत्राटदारास वार्षिक देखभालीचे कंत्राट अर्थात Annual Maintenance contract (AMC) देणे अनिवार्य आहे. सदर कंत्राटदाराने महिन्यातून कमीत कमी एकदा तरी लिफ्टचे सव्‍‌र्हिसिंग करून निर्माण झालेल्या त्रुटींची संबंधितांशी चर्चा करून दूर कराव्यात असे निर्देश आहेत.

  • लिफ्ट ऑपरेटर हा कमीत कमी अठरा वर्षे पूर्ण केलेला असणे बंधनकारक आहे. तसेच लिफ्ट व्यवस्थितपणे कार्यरत ठेवण्यामध्ये तो प्रशिक्षित असावा.
  • कुठल्याही लिफ्टमध्ये अपघात घडल्यास नियम क्र. ८ प्रमाणे फॉर्म ‘एफ’मध्ये निरीक्षक कार्यालयात २४ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे.
  • लिफ्ट कार जी लिफ्टच्या पिटमध्ये वर-खाली प्रवास करीत असते. तिच्या ट्रॅव्हेलिंग केबल्स या फ्लेक्झिबल (लवचीक) आणि अग्निरोधक (Fire proof) असणे आवश्यक आहे.
  • शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, ५ स्टार हॉटेल्स इ. ठिकाणी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट्स असतात, त्या काचेची जाडी ही १० मिलिमीटर असून त्याचे फायररेटिंग दोन तास असणे आवश्यक आहे.
  • लिफ्ट सेफ्टीसाठी दोन फायनल लिमिट स्विचेस् (१.५ मीटर वर व खाली) देणे आवश्यक आहे.
  • मशीनमध्ये ओव्हरस्पीड गव्हर्नर असणे आवश्यक.
  • कारगेट स्विच हे सेफ ऑपरेशन ऑफ लिफ्टकारसाठी आवश्यक आहे, तसेच प्रत्येक मजल्याच्या दरवाजास लॅण्डिंग गेट लॉक असणे आवश्यक आहे.
  • लिफ्टकारच्या वरच्या बाजूस कार टॉप स्विच लावणे आवश्यक आहे, ज्याचा वापर लिफ्टच्या देखभालीसाठी होतो.
  • ओव्हरहेड रीले व स्वयंचलित सुटका उपकरण हे जानेवारी २०१३ पासून लावणे बंधनकारक आहे. लिफ्टमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन किंवा माणसे असतील तर ओव्हरलोड रीले अलार्म वाजवून तशी सूचना देते.
  • स्वयंचलित सुटका उपकरण (Automatic Rescue Device) हे लावले असल्यास, काही कारणाने लिफ्टचा वीजपुरवठा खंडित झाला तर लिफ्ट जिथे असेल तिथून जवळच्या मजल्यावर जाऊन उभी राहते आणि दोन्ही दरवाजे उघडून माणसे बाहेर पडू शकतात.
  • लिफ्टकारच्या खाली टो गार्ड अथवा ७५० मिमि. आकाराचा अ‍ॅप्रन लावणे जरुरी आहे. यामुळे लिफ्ट मजल्याच्या वर थांबल्यास खालील पोकळीतून कुणी खाली म्हणजे लिफ्टवेलमधे पडण्याची भीती राहात नाही.
  • स्वयंचलित (Automatic) लिफ्टमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी इन्फ्रारेड प्रोटेक्शन देणे अत्यंत आवश्यक आणि बंधनकारक आहे. हे नसल्यास लिफ्टकारच्या दरवाज्यात अडकून बरेच अपघात झाल्याचे कळते.
  • नियम क्र. ३० नुसार बारा वर्षांखालील मुलांना एकटय़ाने लिफ्टमधून प्रवास करण्यास मनाई केली आहे. जाणे आवश्यक असल्यास एखाद्या मोठय़ा व्यक्तीबरोबर किंवा लिफ्टमन असताना त्याच्यासोबत प्रवास करू शकतो.
  •  मशीन रूममधील मोटर, कंट्रोलर, मेनस्विच इ.ना नियमाप्रमाणे अर्थिग करून ई.एल.सी.बी. बसविणे आवश्यक आहे.

वर उल्लेख केलेल्या कायदेशीर बाबींअंतर्गत येणारी ही सर्व सुरक्षा साधने उभारणे व त्याची योग्य ती देखभाल करणे हे ग्राहकावर बंधनकारक आहे.

लिफ्टचे प्रकार :  ढोबळमानाने लिफ्ट दोन प्रकारच्या मानल्या जातात. पहिली मॅन्युअल. ज्यात दोन्ही दरवाजांची उघडझाप आपल्याला हाताने करावी लागते व दुसरी अ‍ॅटोमॅटिक, ज्यात स्वयंचलित दरवाज्यांचा उपयोग केलेला असतो. परंतु लिफ्टच्या उपयोगितेनुसार त्यांची खालीलप्रमाणे वर्गवारी करण्यात येते.

१) पॅसेंजर लिफ्ट- हिचा उपयोग सर्वत्र माणसांसाठी वर-खाली नेण्यासाठी केला जातो.

२) गुड्स लिफ्ट- हिचा उपयोग सामानाची ने-आण करण्यासाठी केला जातो.

३) स्ट्रेचर लिफ्ट- हॉस्पिटलमध्ये पेशंटची ने-आण करण्यासाठी या स्लो स्पीड लिफ्टचा उपयोग केला जातो.

४) कॅप्सूल लिफ्ट- कॉर्पोरेट ऑफिसेस, शॉपिंग मॉल्स, स्टार हॉटेल्स, इ. ठिकाणी या काचेच्या लिफ्टस वापरतात.

५) फायर लिफ्ट- २४ मीटरच्यापेक्षा उंच असलेल्या इमारतींमध्ये या लिफ्टस्चा उपयोग बहुतांशी अग्निशामक दलाकडून केला जातो.

जबाबदार नागरिक म्हणून थोडी काळजी घेतल्यास आपण स्वत:च्या व इतरांच्याही जिवाचा धोका टाळू शकतो. ही सुरुवात आपल्या घरापासून करणे इष्ट ठरेल, हे नि:संशय!

सदस्य राष्ट्रीय सुरक्षा परिषद लिफ्टच्या सुरक्षित वापरासाठी आवश्यक सूचना

सध्या जगातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे रेल्वे, मेट्रो, मोनो, बस, हवाई इत्यादींपेक्षा विद्युत उद्वाहन अर्थात लिफ्टसमधील प्रवास हा अतिशय लोकप्रिय आणि त्यातील इनहाऊस सेफ्टी सिस्टीममुळे सुरक्षित झाला आहे. तथापि लिफ्टचा वापर करणाऱ्यांनी खालील काही सूचना पाळल्यास अधिक सुरक्षितता लाभेल.

  • लिफ्टला बोलावताना तिच्या पॅनेलवरील बटन एकदाच दाबावे. सतत बटन दाबत राहिल्याने सर्किटमधून जास्त करंट वाहत राहतो. त्यामुळे विद्युत तारा गरम होऊन शॉर्टसर्किटचा धोका संभवतो.
  • लिफ्टकारमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला ज्या मजल्यावर जायचे आहे ते बटन दाबून कारच्या मागच्या बाजूस जाऊन उभे राहा, ज्यामुळे आत येणाऱ्या प्रवाशांना जागा मिळेल.
  •  जर स्वयंचलित लिफ्टच्या ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ तुम्हाला लिफ्टचे दरवाजे उघडे (ओपन) ठेवायचे असतील तर कारच्या पॅनेलवरील ‘डोअर ओपन’ हे बटन दाबून ठेवा.
  •  तुमच्या लिफ्टचे दरवाजे हे स्वयंचलित असल्यामुळे त्यांच्याशी खेळू नका. त्यांच्यात मेकॅनिकल आणि इन्फ्रारेड सुरक्षेचा बीम असल्यामुळे त्यांना सुरक्षितपणे हाताळा.
  • तुम्ही लिफ्टकारमध्ये प्रवेश करतानाच कारचे दार बंद होऊ लागले तर त्वरित मागे येऊन पुढील कारची प्रतीक्षा करा. बंद होत असलेल्या दरवाजामध्ये तुमचा हात, पाय अथवा छत्री, बॅग यांसारख्या वस्तूंनी आडकाठी करण्याचा प्रयत्न केल्यास ते अपघातास कारण ठरते.
  • सध्याच्या मॉडर्न लिफ्टसमध्ये इमारतीचे लॅण्डिंगगेट आणि कारगेट समान पातळी (छी५ी’) वर असतात. तथापि एखाद्या चुकीच्या कृतीमुळे (ट्र२स्र्ी१ं३्रल्ल) दोन्हींच्या लेवलमध्ये फरक पडू शकतो. अशा परिस्थितीत लिफ्ट थांबवून सदर बाब सोसायटीच्या मॅनेजमेंटच्या नजरेस आणून त्यावर ए.एम.सी. असणाऱ्या कंत्राटदारास बोलावून दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
  • लिफ्टकार येते वेळी लॅण्डिंग गेटच्या बाजूला उभे राहून, आतील प्रवासी बाहेर आल्यानंतर गेटजवळ असलेल्या प्रवाशाने आत जाऊन त्यापाठोपाठ इतरांनी शिस्तीत आत प्रवेश करावा. लिफ्टमधून प्रवास करताना काही शिष्टाचार पाळणे जरुरी आहे. जसे धूम्रपान करीत असताना आत प्रवेश करू नये, मुलांना लिफ्ट पॅनेलला हात लावू देऊ नये. प्राण्यांना लिफ्टमध्ये नेऊ नये,  इत्यादी सौजन्य पाळणे आवश्यक आहे.
  • तुम्ही उतरण्याच्या पूर्वी लिफ्ट थांबल्यास तुम्ही एका बाजूस उभे राहा म्हणजे प्रवेश आणि निकास हा प्रवाशांसाठी सुलभतेने होईल.
  • लिफ्टमध्ये प्रवेश करतेवेळी लिंग किंवा वय यांचा अडसर ठेवता कामा नये. हा साधा कॉमन सेन्स आहे.. लॅण्डिंग गेटजवळच्या प्रवाशांनी एकानंतर एक आत प्रवेश करावा व लिफ्टच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुरुवात करावी.
  • लिफ्ट बंद पडल्यास गोंधळून जाऊ नये. शांत राहावे. इंटरकॉमवरून सिक्युरिटी अथवा संबंधितांना फोन करावा. फायर ब्रिगेडला (१०१) संपर्क केल्यास उत्तम. विविध सेफ्टी डिवायसेस (सुरक्षा साधनं)मुळे लिफ्ट खाली पडणार नाही. घाईने उडी मारणे अथवा वर चढण्याचा प्रयत्न करू नये. थोडय़ाच वेळात तुम्ही सुरक्षित व्हाल.

plkul@rediffmail.com