श्रावणात घरात सगळीकडे धुवूनपुसून स्वच्छता केली जायची. आईचा श्रावणात सोमवारी शनिवारी उपवास असायचा. उपवासाचे पदार्थ आणि उपवास सोडायला जेवणात वेगवेगळे पदार्थ असायचे. वडिलांनी आणलेली केळीची पाने उपवास सोडण्यासाठी िभतीच्या कोपऱ्यात उभी असायची. टेबलावर एका भांडय़ात आम्ही पाणी घालून बरीचशी सुवासिक फुले ठेवायचो.

श्रावण महिन्यात उन्हाचा लपंडाव सुरू होतो आणि श्रावणसरींनी आनंदाची चाहूल लागते. धरतीचे हिरवेगार लावण्य, त्यावरील फुले, गोड फळे, फुलांवर रुंजी घालणारी मनमोहक रंगीबेरंगी फुलपाखरे आणि आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्य अशी सगळीकडे रंगांची उधळण असते.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

श्रावण म्हटला, की मला आठवतो तो माझ्या माहेरचं श्रावणास सजणारं घर. व्रतवैकल्ये आणि धार्मिक सणांनी हा महिना भरलेला असतो. श्रावणात जसा निसर्ग नटलेला असतो, त्याप्रमाणे आमच्या घरातील श्रावणातील प्रत्येक वार व सण विविध पारंपरिक पदार्थानी भरलेला असायचा.

श्रावणात घरात सगळीकडे धुवूनपुसून स्वच्छता केली जायची. आईचा श्रावणात सोमवारी व शनिवारी उपवास असायचा. उपवासाचे पदार्थ आणि उपवास सोडायला जेवणात वेगवेगळे पदार्थ असायचे. वडिलांनी आणलेली केळीची पाने उपवास सोडण्यासाठी िभतीच्या कोपऱ्यात उभी असायची. टेबलावर एका भांडय़ात आम्ही पाणी घालून बरीचशी सुवासिक फुले ठेवायचो. उपवासाच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा असल्यामुळे घरात आईची लगबग चाललेली असायची. मुगाची आमटी किंवा वालाचे बिरडे, वालाच्या खिचडीबरोबर पोह्यचा पापड व लोणचे, तळलेली किंवा नारळाच्या दुधातली अळूवडी असे पदार्थ जेवायला असायचे. त्या दिवशी आईने सांगितल्याप्रमाणे वालाचे बिरडे सोलायचे काम माझ्याकडे असायचे. खास अळूवडीसाठी मागच्या अंगणात लावलेल्या अळूची पाने काढली जायची. एखाद्या मंगळवारी आमच्याकडे जरी मंगळागौर नसली तरी मटकीची उसळ व थालीपीठांचा फर्मास बेत असायचा. एखाद्या शुक्रवारी देव्हाऱ्यात देवीला चणे आणि गुळाचा नवेद्य  दाखविला जाई. श्रावणातल्या बुधवार, गुरुवार व रविवारी तर शेवयांची खीर, काकडीचे तवसे, भोपळयाची भाजी, दुधी हलवा, पुरणपोळया वगरे पदार्थाची रेलचेल असायची. श्रावण स्पेशल कुळू, अळू, शेवळं, टाकळा, कर्टुली वगरे पावसाळी भाज्यांची मजा लुटायला मिळायची ते वेगळेच.

श्रावणातल्या सणांचे तर काही विचारूच नका. दाराला तोरण लावले जाई. उंबरठय़ापुढे रांगोळी काढली जाई. नागपंचमीच्या आदल्या दिवशी आई घरी माळ्यावर जपून ठेवलेली समुद्रकाठची पांढरी वाळू काढायची. त्यात ती हरभरे, शेंगदाणे, वाल, लाह्य वगरे फुलवायची, त्याचा सुंदर वास घरात सुटलेला असायचा. दुसऱ्या दिवशी त्याचा नवेद्य नागाला दाखविला जायचा. त्यावेळी अंगणात नागवाले यायचे. नारळीपौर्णिमेच्या दिवशी तुपावर लवंगा परतून केलेल्या खरपूस नारळीभाताचा दरवळ घरभर पसरलेला असायचा. गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता दहीपोह्यचा नवेद्य आमच्या घरी दाखविला जायचा.

श्रावणात घरात देवाची पूजा नेहमीपेक्षा जास्तच साग्रसंगीत असे. देव्हाऱ्यात देवांना चंदन लावले जायचे, हार घातले जायचे, भरपूर फुले वाहिली जात. उदबत्ती, दिवा लावला जायचा. धूपारती केली जायची. छानसा नवेद्य दाखविला जायचा. फुलांच्या, चंदनाच्या उदबत्तीच्या आणि धुपाच्या वासाचा घरात सुगंध सुटायचा, त्यामुळे घरात एक प्रकारचा धार्मिक आणि सात्विक भाव दाटून यायचा, घर प्रसन्न वाटायचे.

असा हा माझ्या माहेरच्या घरचा श्रावण महिना. सुंदर निसर्गाबरोबर सगळे घरच श्रावणमय झालेले असायचे. मला त्याबद्दल खूप अप्रूप आहे.

madhurisathe1@yahoo.com