आपल्या घरातील गणपतीची सजावट विलोभनीय व आकर्षक कशी होईल, याच विचारातून नवनवीन कल्पना आकारास येतील.

श्रावण सुरू होताच वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. मुळातच श्रावण महिना हा पानाफुलांनी हिरवागार तसेच सुवासिक फुलांनी बहरलेला असतो. आणि अशी नैसर्गिक साधनसामुग्री म्हणजे घरगुती गणपतीच्या सजावटीला पर्वणीच होय. ह्यच दरम्यान सुवासिक फुलांची रेलचेल सजावटीला पोषक ठरते. त्या कालावधीतच ‘मी येतोय’ अगदी काही दिवसांनीच.. अशा प्रकारचे मोठमोठे बॅनर, पोस्टर्स, होर्डिग्ज नाक्या नाक्यावर प्रकर्षांने आढळतात. इतकी आपण आतुरतेने गणपतीची वाट बघत असतो.

Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

दरवर्षी येणारा बाप्पा हा आपल्या कुटुंबातील सर्वाचे रक्षण करणारा सदस्यच असतो. स्वाभाविकच विविध प्रकारची वातावरण निर्मिती होत असते. घरातील साजावटीसाठी विविध प्रकारची मखरं, कार्डबोर्डच्या नक्षीकाम केलेल्या महिरपी, तोरणं असे विविध  पर्याय थर्माकोलमधून उपलब्ध असतात. परंतु दिवसेंदिवस समाजात पर्यावरणाबाबत निर्माण झालेली जागरूकता पाहता नैसर्गिक वस्तूचा वापर अधिक होऊ लागला; जेणेकरून पर्यावरणाला धक्का लागणार नाही. त्यासाठी पाने, फुले, पडदे, एलईडी दिवे / तोरणे ह्यंचा वापर अधिक होऊ लागला आहे.

घरातील सजावट म्हणजे जागेचा प्रश्न आलाच, त्यासाठी मोजक्या आणि ठरलेल्या जागेत प्रत्येकजण आपापल्या कल्पतेनुसार सजावट करीत असतो. आज फुलांमध्येसुद्धा देशी-विदेशी पर्याय उपलब्ध असल्यामुळे नैसर्गिक ओरिजनल फुलांची सजावट करण्यामध्ये लोकांचा कल वाढलेला आहे. जलबेरा, ऑर्चिड, गोल्डन, रजनीगंधी, ह्यंसारखी फुले जरी महाग असली तरी तीन/ चार दिवस ती ताजी टवटवीत राहातात. त्यामुळे ती अधिक सोयीची त्याचप्रमाणे आकर्षक दिसतात. ओयासीसमध्ये योग्य त्या पद्धतीने व रंगसंगतीने मांडली तर सजावट अधिक विलोभनीय दिसते. त्याकरिता फुलांसाठी पाणी बदलण्याची आश्यकता नाही. याव्यतिरिक्त चटई, बारदाने, माती, टोपल्या ह्य साधनांतून सुद्धा आपण गड, किल्ले, डोंगर, छोटेखानी राजवाडे, गावाकडील नैसर्गिक दृश्ये साकारू शकतो. तर छोटय़ा पंपाच्या साह्यने नदी, नाले, धबधबा, कारंजेसुद्धा सोप्या पद्धतीने मांडू शकतो. अगदी घरगुती गणपतीसाठी पावडरचे डबे, आरशाचे तुकडे, काडेपेटय़ा, स्ट्रॉ, छोटय़ा बाटल्या अशा टाकावू वस्तूंतून सुद्धा आपण घरात सजावट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्यातील कल्पकतेला थोडासा ताण द्यावा लागेल इतकेच! मग तुम्ही आपल्यातले तन, मन, धन, सर्वस्व ओतून आपल्या घरातील गणपती सजावट विलोभनीय व आकर्षक कशी होईल ह्यचाच विचार करून कामाला लागता, ते केवळ आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण होण्यासाठीच!

पुरुषोत्तम आठलेकर pkaathalekar@gmail.com