गृहनिर्माण संस्थांच्या वार्षिक सभांमध्ये होणारे वाद, गैरसमज आणि गोंधळ हा प्रामुख्याने अध्यक्ष आणि सेक्रेटरी या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सभा संचालनाचा प्रभाव सभेच्या प्रारंभी कसा पडतो त्यावर बरंच काही अवलंबून असतं.

गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सभांचं सूत्रसंचालन करणे ही एक तारेवरची कसरत असते. ही कसरत यशस्वी करण्याची जबाबदारी अध्यक्ष आणि सेक्रेटरी या दोघांची सयुक्तिक असते. सभेचे यशस्वी संचालन हे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या अनुभवावर आणि गुणवत्तेवर बऱ्याच  अंशी अवलंबून असते. हा गुणवत्ता विषयाचा अभ्यास आणि सभेपुढे मांडण्याची पद्धती यावरही अवलंबून असते.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
panvel marathi news, panvel dispute marathi news
पनवेल : शौचालयाला पाणी मागितल्याने गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाकडून महिलेला शिवीगाळ 
ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

सभेमध्ये चर्चिले जाणारे विषय, त्यांची मांडणी, प्रश्नोत्तरे, तौलनिक मांडणी आणि विषयानुरूप दिलेली सुसंगत उदार या सर्वाचा एकत्रित परिपाक म्हणजे सभेचं यशस्वी संचालन होय. या बाबी जर तंतोतंत प्रत्यक्षात अमलात आणावयाच्या असतील तर अध्यक्ष आणि सेक्रेटरी या दोघांचा यशस्वी संचालनाची काही सूत्र आत्मसात करण्याची आवश्यकता असते.

प्रथमत: जे विषय सभेमध्ये सभासदांपुढे मांडले जाणार आहेत त्यांचा सखोल अभ्यास सभा संचालनकर्त्यांने करावयास हवा, त्यानंतर सभासदांच्या शंका-कुशंकांना समर्पक आणि समाधानकारक उत्तर मिळेल, अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता असते. असं वातावरण जर तयार झालं तर गोंधळी वृत्तीचे सभासद या वातावरणाचा फायदा उचलून सभेचा रसभंग करण्यात पुढाकार घेतात. ही संधी अशा सभासदांना मिळू नये म्हणून विषयांचं योग्य प्रकारे नियोजन करावयास हवं. याचाचा दुसरा अर्थ म्हणजे विषयांचा अभ्यास आणि तो नेटकेपणाने मांडण्याची हातोटी ज्याच्याकडे आहे त्याने तो विषय संचालनासाठी स्वत:कडे घ्यावा.

इतिवृत्त वाचन ही पण वार्षिक सभेतील एक महत्त्वाची बाब असते. इतिवृत्त वाचन कंटाळवाणे होऊ नये म्हणून ते वाचन करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीचा आवाज खणखणीत असावा, उच्चार स्पष्ट असावेत, न अडखळता वाचनाची सवय असावी, जेणेकरून इतिहास वाचन एकूण सुखावह ठरावं. इतिवृत्त वाचन फक्त सेक्रेटरीनंच केलं पाहिजे असा काही नियम नाही म्हणून तसा आग्रह कुणी करू नये.

यशस्वी सभा संचालनासाठी अध्यक्ष आणि सेक्रेटरी या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची वैयक्तिक गुणवत्ता, तिचं वैयक्तिक वर्तन आणि सोसायटीमधील सभासदामध्ये असलेला सुसंवाद या बाबीदेखील महत्त्वपूर्ण ठरतात. हा गुणसंचय या व्यक्तीमध्ये असेल तर सभास्थानी असलेल्या त्या व्यक्तीच्या शब्दांना, निवेदनाला, विश्लेषणाला आणि आग्रहाला वेगळच वजन प्राप्त होतं, असा सार्वत्रिक अनुभव आहे. एखाद्या मुद्याबाबत पदाधिकाऱ्यांकडून केला जाणारा युक्तिवाद हा समर्पक आणि सयुक्तिक  असेल तर ‘गोंधळी’ वृत्तीचे सभासद गप्प बसलेले असतात. मात्र जर परिस्थिती उलट असेल तर.. कैचीत पकडणारे प्रश्न उपस्थित करून सभेत गोंधळ सुरू होतो.

या सर्व बाबी विस्तारपूर्वक मांडण्याचं कारण म्हणजे गृहनिर्माण संस्थांच्या वार्षिक सभांमध्ये होणारे वाद, गैरसमज आणि गोंधळ हा प्रामुख्याने अध्यक्ष आणि सेक्रेटरी या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सभा संचालनाचा प्रभाव सभेच्या प्रारंभी कसा पडतो त्यावर बरंच काही अवलंबून असतं.

सभेवर आपलं नियंत्रण आहे की नाही याचा अंदाज सभा संचालकाला पहिल्या काही मिनिटांतच यायला हवा. सभेवर नियंत्रण नसणे याचा दुसरा अर्थ गोंधळाला निमंत्रण देण्यासारखं आहे.

यशस्वी समालोचक आणि सूत्रसंचालक जशी श्रोत्यांची आणि रसिकांची मने स्वत:च्या गुणवैशिष्टय़ाने जिंकतो तेच अनुकरण गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सभांमध्ये अध्यक्ष आणि सेक्रेटरी या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून अपेक्षित आहे म्हणून हा लेखनप्रपंच!

vasturang@expressindia.com