गुंतवणूक या दृष्टीने गेल्या काही वर्षांत मालमत्तेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. मालमत्तेचे भाव सतत चढते असल्याने त्यातील गुंतवणुकीचा परतावा चांगला मिळतो. म्हणूनच साहजिकच अधिकचे पैसे असले, की असे पैसे मालमत्तेत गुंतविण्याकडे हल्ली लोकांचा वाढता कल आहे.

जोवर ज्या व्यक्तीने एखादी मालमत्ता खरेदी केली आहे तीच व्यक्ती अशा मालमत्तेची विक्री किंवा इतर व्यवहार करते तोवर काही प्रश्न उद्भवत नाही. बरेचदा गरज न पडल्याने किंवा अधिकचा परतावा मिळावा म्हणून गुंतवणूक म्हणून घेतलेली मालमत्ता लवकर विक्रीस येत नाही. त्यातून काही वेळेस असेही घडते की, मालमत्ता ज्या व्यक्तीने घेतली ती व्यक्ती दुर्दैवाने निधन पावते.

mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Hindu Marriage Act
“हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
supreme court
तथ्यशोधन कक्षाबाबतच्या अधिसूचनेला स्थगिती
What are the constitutional powers of the Election Commission regarding the transfer of the Mumbai Municipal Commissioner at the time of the election itself
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना बदलणे राज्य सरकारला का भाग पडले? निवडणूक आयोगाचे यासंबंधी अधिकार कोणते?

अशा परिस्थितीत दोन मुख्य शक्यता उद्भवतात, एक म्हणजे  मृत व्यक्तीने रीतसर मृत्युपत्र केलेले असते. किंवा दोन-  मृत व्यक्ती मृत्युपत्र किंवा तत्सम काहीही व्यवस्था न करता निधन पावते. या दोन्ही प्रकारांत पुढच्या पिढीने व्यवहार करायच्या आधी मृत्युपत्र असल्यास ते सक्षम न्यायालयात अर्ज करून शाबीत करून घेतले पाहिजे किंवा मृत्युपत्र नसल्यास  मृत व्यक्तीच्या वारसांनी सक्षम न्यायालयात अर्ज करून वारस दाखला मिळविला पाहिजे. अशा प्रकारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली की  मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा व्यवहार किंवा विक्री करायचा निर्विवाद अधिकार वारसांना मिळतो.

मात्र, हल्ली बरेचदा असे निदर्शनास येते की, पुढच्या पिढीतील वारस हे असा वारस दाखला वगैरे न घेताच मालमत्तेची विक्री करतात. वास्तविक वारसांनी त्यांना वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेची विक्री करण्यात गैर काहीच नाही, त्यांना तसा अधिकार आहेच. मात्र स्वत:ला असलेला अधिकार हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बजावणे केव्हाही श्रेयस्कर असते.

अन्यथा असा वारस दाखला न घेता व्यवहार केल्यास, विक्री केलेल्या मालमत्तेच्या अभिलेखांवर खरेदीदारांचे नाव लावण्यास अनंत तांत्रिक अडचणी येतात आणि ते स्वाभाविक देखील आहे. कारण मालमत्तेचे सर्व अभिलेख  मृत व्यक्तीच्या नावे असतात. मृत व्यक्ती व्यवहार करू शकत नसल्याने, प्रत्यक्ष व्यवहार अथवा विक्री ही तिऱ्हाईत व्यक्तींनी केलेली आढळून येते. कारण जोवर  मृत व्यक्तीच्या वारसांची नावे रीतसर नोंदविली जात नाहीत, तोवर विक्री करणारे वारस जरी असले तरी अभिलेखाकरता ते तिऱ्हाईतच ठरतात. अशा परिस्थितीत  मृत व्यक्ती, त्याचे वारस यांच्यातील संबंध प्रथमत: प्रस्थापित होत नाहीत तोवर खरेदीदाराचे नाव मालमत्तेच्या अभिलेखात नोंदले जात नाही, या सगळ्या प्रकारात बराच कालापव्यय आणि मनस्ताप होण्याची शक्यता असते.

बरं, परत हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार वारसांचे देखील प्रथम वर्ग वारस, द्वितीय वर्ग वारस आणि तृतीय वर्ग वारस असे तीन स्वतंत्र वर्ग निश्चित केलेले आहेत. वारसाहक्क कायद्यान्वये सर्वसाधारण नियम असा की, प्रथम वर्ग वारसांना प्रथम प्राधान्य किंवा वारसाहक्क आणि मग उतरत्या क्रमाने बाकीच्या वर्गातील वारसांना. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा त्याच्या मालमत्तेत वारसाहक्क कोणाला आणि कसा मिळणार हे अतिशय स्पष्ट आहे.

त्यामुळे विशेषत: खरेदीदारांनी अशा मालमत्तांचे व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ज्याच्याशी आपण व्यवहार करतोय तोच वारस आहे का? आणि वारस असल्यास वारसाहक्कान्वये त्यालाच मालमत्तेत वारसाहक्क निश्चितपणे प्राप्त होणार आहे का? याची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे. कारण समजा प्रथम वर्ग वारस असताना, आपण द्वितीय किंवा तृतीय वर्ग वारसांशी व्यवहार केले तर त्यांना त्या मालमत्तेत काही वारसाहक्कच नसल्याने आपला व्यवहार आणि करार पूर्णत: अवैध ठरण्याचाही धोका उद्भवतो. म्हणूनच प्रत्येकाने जेव्हा आपल्याला वारसाहक्काने एखादी मिळकत मिळते तेव्हा त्या मिळकतीचा व्यवहार किंवा विक्री करण्याअगोदरच त्याबाबत रीतसर वारस दिाखला प्राप्त करून घेणे इष्ट ठरते. मालमत्ता म्हणजे केवळ भौतिक मालमत्ता नसून, त्या मालमत्तेच्या सर्व अभिलेखांचा देखील त्यात सामावेश होत असतो. म्हणूनच खरेदीदाराने देखील मालमत्ता खरेदी करताना, ती वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता असल्यास, वारसांचा वारस दाखला किंवा मृत्युपत्र शाबीत केल्याच्या न्यायालयीन निर्णयाचा आग्रह धरावा, जेणेकरून भविष्यात काहीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही आणि मालमत्तेचा व्यवहार आणि हस्तांतरण निर्वेधपणे पूर्ण होईल.

’ पुढच्या पिढीतील वारस वारस दाखला वगैरे न घेताच मालमत्तेची विक्री करतात. वास्तविक वारसांनी त्यांना वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेची विक्री करण्यात गैर काहीच नाही, त्यांना तसा अधिकार आहेच. मात्र स्वत:ला असलेला अधिकार हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बजावणे केव्हाही श्रेयस्कर असते. अन्यथा असा वारस दाखला न घेता व्यवहार केल्यास, विक्री केलेल्या मालमत्तेच्या अभिलेखांवर खरेदीदारांचे नाव लावण्यास अनंत तांत्रिक अडचणी येतात आणि ते स्वाभाविक देखील आहे.

’ आपल्याला वारसाहक्काने एखादी मिळकत मिळते तेव्हा त्या मिळकतीचा व्यवहार किंवा विक्री करण्याअगोदरच त्याबाबत रीतसर वारस दिाखला प्राप्त करून घेणे इष्ट ठरते. मालमत्ता म्हणजे केवळ भौतिक मालमत्ता नसून, त्या मालमत्तेच्या सर्व अभिलेखांचा देखील त्यात सामावेश होत असतो. म्हणूनच खरेदीदाराने देखील मालमत्ता खरेदी करताना, ती वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता असल्यास, वारसांचा वारस दाखला किंवा मृत्युपत्र शाबीत केल्याच्या न्यायालयीन निर्णयाचा आग्रह धरावा, जेणेकरून भविष्यात काहीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही.

tanmayketkar@gmail.com