सोसायटीत एखाद्या सभासदाला किंवा त्याच्या कुटुंबातील मुलांना कुत्रा पाळण्याची हौस असते. क्वचितप्रसंगी काही सभासद मांजर किंवा खारूताईदेखील पाळतात. शेवटी हौसेला मोल नसते हे तितकेच खरे आहे. सर्वसाधारणपणे कुत्रा हा प्राणी माणसाचा चांगला मित्र व इमानी सेवक मानला जातो. कुत्र्यामध्ये मानवी भाव-भावना व आदेश समजून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. परंतु सोसायटीच्या कार्यकारी समिती सदस्यांच्या लहरी स्वभावाची व त्याच्या सोसायटीतील वास्तव्याबद्दल त्यांच्या मनात नेमके काय विचार सुरू आहेत याचा ठाव मात्र कुत्र्याला लागत नाही, हेच खरे आहे. याचा प्रत्यय नुकताच मुंबईतील एका सोसायटीत आला.

मुंबईतील माहीम येथील अवर लेडी ऑफ वेलंकणी अँड परपेच्युअल सुकोअर सोसायटीत दहाव्या मजल्यावर ऑलविन डिसोझा नावाचे सभासद राहतात. त्यांनी एक कुत्रा पाळला होता. डिसोझा रोज सकाळी आपल्या कुत्र्याला फिरण्याकरिता नेण्यासाठी लिफ्टचा वापर करीत. पाळीव प्राण्यांमुळे सोसायटीला त्रास सहन करावा लागतो. या प्राण्यांमुळे दरुगधी तर होतेच शिवाय त्यामुळे इतरांनाही भीती वाटते. या प्राण्यांना ने-आण करण्याकरिता लिफ्टचा वापर होत असल्याने विजेचा वापरही अधिक होतो, अशी भूमिका घेत सोसायटीची कार्यकारी समिती पाळीव कुत्र्याला फिरायला नेण्यासाठी लिफ्टचा वापर  करणाऱ्या डिसोझा यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने जादा देखभाल शुल्क (मेंटेनन्स) वसूल करीत होती. कुत्र्याला नेण्या-आणण्यासाठी लिफ्टचा वापर करण्याबद्दल या सभासदाकडून दरमहा रुपये ५००/-  जादा शुल्क आकारीत होती. डिसोझा यांनी या नियमबा वसुली विरोधात जिल्हा ग्राहक मंचाकडे दाद मागितली. सोसायटीने आपली उपरोक्त भूमिका मांडल्यानंतर जिल्हा ग्राहक मंचाने ती फेटाळून लावली व डिसोझा यांना दिलासा दिला. त्यानंतर सोसायटीने राज्य ग्राहक आयोगाकडे दाद मागितली. परंतु आयोगानेही जिल्हा ग्राहक मंचाचा निर्णय योग्य ठरवत सोसायटीने घेतलेली भूमिका चुकीची ठरवली. तसेच या संबंधात सोसायटीने ऑगस्ट २००८ मध्ये ठरावही केला होता. मात्र हा ठराव सोसायटीने फेब्रुवारी २००९ मध्ये आपल्या इतर सभासदांना कळविला. खरे तर बैठकीचे इतिवृत्त मंजूर  करण्याआधी केलेल्या ठरावाची माहिती १५ दिवसांच्या आत सर्व सभासदांना देणे बंधनकारक आहे. त्यानंतरच्या १५ दिवसांत एखाद्या सभासदाला या ठरावाला विरोध दर्शविता येतो. ही सर्व प्रक्रिया अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीच्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करावी लागते. परंतु सोसायटीने हा ठरावच मुळात इतर सभासदांना कळविण्यास सहा महिने घेतले. त्यामुळे हा ठराव इतर सभासदांवर बंधनकारक ठरत नाही. सोसायटीला एखादा ठराव करावयाचा असेल तर त्यासाठी आदर्श उपविधीमध्ये दिलेली योग्य पद्धत अवलंबिली पाहिजे, असे राज्य ग्राहक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
girl was sexually assaulted
डोंबिवलीत चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
youth lured a young woman
नागपूर : प्रेमसंबंध एकीशी अन् लग्न दुसरीशी… हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाच्या हातात बेड्या…

अन्य सोसायटीतही अशा प्रकारे वितंड वाद निर्माण होण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत  नाही. त्यामुळे सोसायटीत पाळीव-प्राणी पाळण्याबद्दलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा कारभार हा शासनाने वेळोवेळी सुधारणा करून अद्ययावत करण्यात आलेल्या आदर्श उपविधीनुसार चालतो. परंतु आत्तापर्यंत चार वेळा सुधारणा करूनही पाळीव-प्राणी पाळण्याबद्दल कोणतेही नियम वा मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली नाहीत हे विशेष. सोसायटीतील सभासद कुत्रा, मांजर व खारूताई यांसारखे पाळीव प्राणी पाळतात. खारूताई पाळल्याने अन्य सभासदांना विशेष त्रास होत नाही. मांजर हा प्राणी फार तर आजूबाजूच्या सदनिकेत गुपचूप शिरून उघडे असलेले दूध व इतर अन्नपदार्थ फस्त करते. परंतु कुत्र्यामुळे मात्र सोसायटीतील अन्य सभासदांना काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते.

या पाश्र्वभूमीवर पुढील उपविधी सुधारणा करताना सहकारी गृहनिर्माण संस्थेत पाळीव प्राण्यांचे स्थान व  त्याबाबतचे नियम व र्निबध अंतर्भूत करण्याबद्दल सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सहकार आयुक्त व संबंधित उपनिबंधक यांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

कुत्र्यामुळे सोसायटीतील अन्य सभासदांना काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता खाली दिलेल्या कारणावरून होऊ शकते.

* सभासद काही कामासाठी कुत्र्याला सदनिकेत एकटे ठेवून गेल्यास तो खूप मोठय़ाने सतत भुंकत राहतो अथवा रडतो. त्यामुळे आजूबाजूच्या सदनिकाधारकांना त्रास होतो.

* काही सभासद कुत्र्याला सोसायटीच्या आवारातच ‘शी’ व ‘शू’साठी फिरवितात. त्यामुळे दरुगधी पसरते.

* लिफ्टमधून कुत्रा बरोबर असल्यास लहान मुले खूप घाबरतात. तसेच आवारात कुत्रा फिरताना दिसल्यास मुले भीतीने पळत सुटतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* क्वचितप्रसंगी कुत्रा पाहून पळताना तो मागे लागून चावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* मुंबई प्रांतिक अधिनियमाच्या आधारे पाळीव कुत्र्यांसाठी नियम लागू केले आहेत. त्याच्या आधारे पाळीव कुत्र्यांसाठी परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सोसायटीचे सभासद दरवर्षी पाळीव प्राणी (कुत्रा) पाळण्याबाबत महानगरपालिकेचे आवश्यक ते शुल्क भरून परवाना घेत असल्याची खात्री कार्यकारी समितीने करावयाची आहे.

विश्वासराव सकपाळ –  vish26rao@yahoo.co.in