आतापर्यंत आपण या सदरामधून रंगचक्रावरचे विविध रंग, त्यांची एकमेकांशी असलेली नाती, या रंगांचं मानसशास्त्र, इत्यादींविषयी जाणून घेतलं. आता या भागापासून आपण एकेका रंगाविषयी, त्याचे मनावर कोणते परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळेच त्याचा वापर कुठे व कसा होऊ शकतो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

याची सुरुवात करायची झाली तर सप्तरंगांमध्ये सर्वात आधी येणारा आणि सर्वात जास्त वेव्हलेंग्थ म्हणजे दीर्घ तरंगलांबी असलेला असा हा रंग! मेंदूला उत्तेजना देणारा, बुद्धीला तजेला देणारा असा हा रंग आहे. ज्या गणपतीला आपण बुद्धीची देवता मानतो, त्यालाही आपण रक्तवर्णी फुलंच अर्पण करतो. माणासाला राग अनावर झाला की, रक्तप्रवाह वाढल्यामुळे चेहरा रागाने लालसर होतो, डोळे लालसर होतात. तांबडा रंग हा ऊबदार रंग आहे. बलांच्या शर्यती लावतात, तेव्हा त्यांना उत्तेजित करण्यासाठी तांबडय़ा रंगांचा कपडा त्यांच्यासमोर धरला जातो. त्यामुळेच आपल्या घरात किंवा कार्यालयात रंग काढताना तांबडय़ा रंगाचा वापर जरा जपूनच केला पाहिजे. कारण त्याच्या प्रभावाने तापटपणासारखे गुण वाढीला लागले, तर अति तेथे माती होण्याचीच शक्यता अधिक!  पण सगळ्याच व्यक्तींवर त्याचा एकसारख्या प्रमाणातच आणि एकाच पद्धतीने परिणाम होईल, असं सांगता येत नाही. कारण तांबडय़ा रंगाचा परिणाम एखाद्या व्यक्तीवर किती आणि कसा होईल, ते एखाद्या व्यक्तीचा स्वभाव मूळचा कसा आहे, यावरही अवलंबून असतं. त्यामुळे हा रंग आपल्याला मानवेल की नाही किंवा कितपत मानवेल हे आपण स्वत:च अधिक नेमकेपणाने ठरवू शकतो. तसंच एखाद्या व्यक्तीला हा रंग त्याज्य असला म्हणून तो सरसकटपणे सर्वानाच त्याज्य ठरतो असं आढळत नाही.

chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
rangpanchami celebration
Health Special: रंगपंचमीला कोणते रंग वापराल? रंगांचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी

आपण जर सध्याच्या काळातल्या अनेक घरांचं निरीक्षण केलं, तर आपल्याला लिव्हिंग रूममधली एखादी भिंत किंवा तिचा एखादा भाग नारिंगी, ‘मिल्क टॉफी’सारख्या किंवा तांबडय़ा रंगाशी जवळीक साधणाऱ्या एखाद्या रंगात किंवा त्याच्या एखाद्या मंद छटेत रंगवलेला आढळतो. त्याच्या आजूबाजूला मात्र, ऑफ व्हाईट किंवा क्रीम रंगांसारख्या पेस्टल कलर्सचा वापर केलेला असतो. अशा प्रकारची रंगसंगती दिसायला छान दिसते, किंवा तो सध्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे लिव्हिंग रूममधल्या आसनव्यवस्थेसमोरच्या भिंतीवर डिस्प्ले एरिया करून त्यामागे असा ऊबदार रंग लावला तर पेस्टल रंगांमुळे काहीशी म्लान झालेली खोली अम्लान होऊन खोलीत चतन्यदायी वातावरण निर्माण व्हायला मदत होते. (छायाचित्र १ पाहा) शिवाय आजूबाजूच्या पेस्टल कलर्समुळे या रंगांनी येणाऱ्या भडकपणावर संतुलनही साधलं जातं. दुसऱ्या प्रकारे एखादी भिंत या रंगात रंगवण्याऐवजी खोलीसाठी थोडा कमी वेव्हलेंग्थच्या पिवळ्या रंगासारखा एखादा रंग वापरून बठक व्यवस्थेसाठी म्हणजे सोफा-खुच्र्याच्या कव्हर्ससाठी तांबडय़ा रंगाच्या रंगछटेचा वापर केला, तरी तो उठावदार दिसू शकतो. (छायाचित्र २ पाहा) बेडरूम ही रिडिंग रूम म्हणूनही वापरायची असेल तर, किंवा स्वतंत्र स्टडीरूमसारख्या खोल्यामध्ये जिथे बौद्धिक कामं करायची आहेत अशा ठिकाणी तांबडा रंग हा बुद्धीला अधिक चालना देऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी त्याचा  वापर करायला हरकत नाही. मात्र, बेडरूम कम स्टडीरूममध्ये तांबडय़ाचा वापर अधिक काळजीपूर्वकपणे केला पाहिजे. कारण बेडरूम ही विश्रांतीसाठी असते. तिथे जर मेंदू अधिक कार्यक्षम असेल किंवा डोक्यात राग असेल, तर विश्रांतीऐवजी निद्रानाशाचा  त्रास जाणवेल. त्यामुळे त्या खोलीतल्या ज्या खुच्र्यावर किंवा बेडवर बसून वाचन करणार त्या बेडच्या मागच्या बाजूला तांबडय़ा रंगातली भिंत असावी, म्हणजे वाचताना मागच्या भिंतीवरून परावर्तित होणारा प्रकाश हातातल्या पुस्तकावर पडेल. पण बेडवर झोपल्यावर समोर किंवा आजूबाजूला तांबडा रंग दृष्टिपथात येणार नाही, अशी व्यवस्था केली पाहिजे. छायाचित्र ३ मध्ये दाखवलेल्या बेडरूम कम स्टडीरूमच्या उदाहरणात अशीच तांबडय़ा रंगातली भिंत बेडच्या मागच्या बाजूला आहे. ती बेडवर झोपल्यावर थेट नजरेसमोर येत नाही. उलट तिथून नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या या खोलीतल्या इतर भिंती मात्र थोडय़ाशा पांढरट क्रीम रंगात रंगवल्या आहेत. त्यामुळे दिवसाचा प्रकाशही या खोलीत चांगला मिळू शकेल. शेजारच्या खिडकीला पडदे असल्यामुळे दुपारी वामकुक्षी घ्यायची असेल, तर पडदे ओढले की, प्रकाश कमी करून घेता येईल. बेडशीट्ससाठीसुद्धा रंगांचं संतुलन साधण्यासाठी क्रीम रंगाचा वापर केला आहे. छायाचित्र ४ मध्ये स्वतंत्र स्टडीरूम दाखवली आहे. त्याच्या कारपेटमध्येही तांबडय़ा रंगाचा वापर केला आहे. खिडक्यांना बसवलेले व्हेनेशियन ब्लाईंड्स आणि भिंतीवर

लावलेल्या लाकडी पॅनेलिंगमध्येही खोलीतल्या प्रकाशयोजनेने तांबडट छटा आणण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. पण तरीही एकंदर खोलीत संतुलन साधण्यासाठी खुच्र्या आणि फ्लोअिरगसाठी पेस्टल रंगांमधल्या क्रीम कलरचा वापर केला आहे.

थोडक्यात, आज मोठय़ा शहरांमधून असलेल्या जागेच्या टंचाईमुळे आणि महागडय़ा जागांमुळे एकाच खोलीत दोन किंवा अधिक प्रकारची कामं करताना इंटेरिअरचा आणि त्यातल्या रंगांचा सुयोग्य वापर करून त्या खोल्या सर्व कामांसाठी सुसज्ज करणं आवश्यक असतं. त्याकरता रंगांचं सुयोग्य नियोजन आवश्यक असतं.

(इंटिरियर डिझायनर)

anaokarm@yahoo.co.in