वारंवार घडत असलेल्या आगीच्या घटना लक्षात घेता विजेचा सुरक्षित वापर महत्त्वाचा ठरतो. कित्येकदा या घटनांमागे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटचे कारण दिले जाते. बहुतेकवेळेस सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा उपकरण चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे असे घडू शकते. काहीतरी गंभीर घडेपर्यंत या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची वृत्ती माणसात नसते.

विजेचा धक्का किंवा आगीच्या दुर्घटनेमुळे मृत्यू होऊ  शकतो आणि त्यामुळे बऱ्याचदा चुकीच्या किंवा सदोष पद्धतीने केलेली वायरिंग किंवा वीज यंत्रणा जबाबदार असते. त्याशिवाय, आग किंवा विजेचा धक्का बसू नये याकरता नॅशनल इलेक्ट्रिकल कोड (एनईसी) तरतुदींची माहिती असणे आणि या कोड्सची यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे की नाही, हे तपासणारी पडताळणी प्रक्रिया आवश्यक असते.

Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

घरात विजेची यंत्रणा हाताळताना वा बसवताना पुढील उपाययोजना लक्षात ठेवा.

उपकरणांची सुरक्षितता-

तुमची वैद्यकीय उपकरणे आणि त्यांच्या वायर्सची नियमित तपासणी करा. खराब झालेल्या, फाटलेल्या वायर्समुळे मोठा अपघात होण्याआधीच त्या बदला. विजेच्या उपकरणांजवळ पेट घेऊ  शकणारे कोणत्याही प्रकारचे साहित्य, विशेषत: स्वयंपाकघरामध्ये ठेवू नका. कारण स्वयंपाकघरात गॅस/सिलेंडरमुळे वीज व आग दुर्घटना होण्याची मोठी शक्यता असते. अडॉप्टर्सचा अतिरेकी वापर करून विजेच्या पॉइंटवर दाब आणू नका.

योग्य अर्थिग-

अर्थिग हे सर्वात महत्त्वाची सुरक्षा जबाबदारी आहे. अर्थिग यंत्रणा कार्यक्षम ठेवा आणि तिची वेळोवेळी तंत्रज्ञांकडून तपासणी करून घ्या. विजेची गळती रोखणारी उपकरणे ही अशा परिस्थितीतल्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी सर्वोत्तम उपाययोजना आहेत.

अती तापमानाचा धोका-

विजेची सर्व उपकरणे विशिष्ट विद्युत प्रवाहावर काम करतात. जर प्रवाह जास्त झाला, तर अर्थिग किंवा विजेचा अती दाब किंवा शॉर्ट सर्किटमुळे उपकरण खूप तापते व पेट घेते. विजेच्या बहुतांश उपकरणांसाठी काही प्रकारचा थंडावा किंवा हवा खेळती राहाणे आवश्यक असते.

निवासी वायरिंग-

संपूर्ण वायरिंग प्रक्रियेत मुळात चार घटकांचा समावेश असतो. वीज (मुख्य व्होल्टेज), दाब, सुवाहक आणि स्विच. यंत्रणा बसवताना वापराच्या वेगवेगळ्या गरजांनुसार सर्किटचे उपविभाजन करणे अतिशय आवश्यक असते. निवासी जागांमध्ये लायटिंग आणि विजेच्या पॉईंट्सवर मर्यादा असायला हवी. वीज उपकरणे आणि यूपीएससारख्या वस्तूंचा घरातील वाढता वापर लक्षात घेता न्यूट्रल सुवाहक हा फेजच्याच आकाराचा असणे आवश्यक आहे.

बा वायरिंग-

तुमच्या परिसरातील, इमारतीबाहेरील, विजेच्या दिव्यांवरील बा वायरिंगवर कायम लक्ष ठेवा. झाड किंवा खांबातून वायर लोंबकळत असतील तर त्याकडे लक्ष द्या. अशा प्रकाराकडे लक्ष गेल्यास स्थानिक सेवा पुरवठादाराला तातडीने संपर्क साधून त्याची दुरुस्ती करून घ्या.

उंच इमारती-

वरील उपाययोजनांखेरीज उंच इमारतींमध्ये पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

वीज वितरण नेटवर्क-

बसबार आधारित नेटवर्कचा वापर करा, कारण ते सर्व मजल्यांच्या उंचीवरून वर गेलेल्या वायर्सपेक्षा जास्त विश्वासार्ह व सुरक्षित आहे. केबल जॉइंट्स आणि कनेक्शन्स नियमितपणे तपासा म्हणजे हॉटस्पॉट्स टाळता येतील.

लिफ्ट आणि आपत्कालीन यंत्रणा-

सर्वोत्तम उपकरणे आणि अ‍ॅक्सेसरीजचा वापर करा, नाहीतर सुरुवातीच्या काळात थोडे पैसे वाचवण्याच्या नादात आपत्कालीन परिस्थितीत ते दगा देतील.

रिन्यूएबल्स-

रिन्यूएबल्सचा समावेश असलेल्या इमारतीत इंटरकनेक्शन्स समस्या, त्यामुळे नंतर होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक ते उपाय राबवा.

त्याशिवाय, तुमच्या घरी विजेचे कोणतेही काम सुरू असल्यास ही खबरदारी घेण्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना टाळता येऊ  शकतील.

* इलेक्ट्रिकल परमिट आणि इलेक्ट्रिकल यंत्रणा तपासणी आवश्यक असते.

* कनेक्टेड लोडला सप्लाय करण्यासाठी पुरेशी क्षमता सव्‍‌र्हिस उपकरणात असायला हवी.

* सर्व्हिस उपकरण सुरक्षिततेच्या नियमांनुसार वापरले गेले पाहिजे.

लेखक बिल्डिंग वायर- इंटरनॅशनल कॉपर असोसिएशन इंडियाचे मुख्य व्यवस्थापक आहेत.

विजेच्या बाबतीत थोडी खबरदारी बाळगल्यास तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना सुरक्षित आणि विनाअडथळा आयुष्य जगता येऊ  शकते.

* एकच पॉईंट असलेल्या प्लगमध्ये मल्टीपिन प्लग्स खोचू नका.

* प्लग घट्ट बसवल्याची खात्री करा, ठिणगी उडत असल्यामुळे आगीची मोठी दुर्घटना घडू शकते.

* अग्निशमन उपकरणे सुस्थितीत आहेत का याची खात्री करा.

* टय़ूब लाइट्सऐवजी ऊर्जा संवर्धन करणारे एलईडी बल्ब्स (योग्य तेच) वापरा.

* सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वापरात नसताना विजेचे दिवे बंद करा (यामुळे तुमच्याही पैशांची बचत होईल).

* इलेक्ट्रिक जोडण्यांसाठी कायम प्रशिक्षित आणि प्रमाणित इलेक्ट्रिशयनची मदत घ्या.

* आपत्कालीन प्रसंगात वापरण्यासाठी पायऱ्या तसेच रेफ्युज एरिया कायम मोकळा ठेवा.

अमोल काळसेकर