मित्रांनो, पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी करपत चाललेल्या पिकांना जीवनदान मिळून सगळीकडे सुजलाम् सुफलाम् होण्याच्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या वैशाख वणव्यानंतर पावसाच्या या शिडकाव्याने हवेत सर्वत्र हवाहवासा वाटणारा गारवा पसरलेला आहे. त्याचा आस्वाद घेत असतानाच तो त्याचे रौद्ररूपाचे दर्शनही घडवीत असतो.

वीज आणि पाणी यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण पाणी हे उत्तम वीजवाहक आहे. शेकडो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी संततधार पाऊस  व विजेचा प्रचंड कडकडाट झाला होता असे ऐकीवात आहे. आजही सामान्य माणूस विजेविषयी नेहमीच भीती बाळगून असतो. ही आकाशस्थ वीज कशी निर्माण होते व सामान्यत: त्यापासून शेतात आणि इतरत्र संरक्षण कसे करावे याची माहिती लोकांना असणे अत्यंत जरुरी आहे, म्हणूनच या लेखचा प्रपंच..

Why minimising or cutting out alcohol is one of the best fitness hacks
मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
palghar marathi news, dahanu sub district hospital marathi news,
डहाणू उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती वॉर्डातील खाटेवर कोसळले प्लास्टर; रुग्णांच्या जीवाला धोका
Tata Punch Car
ऐकलं का…टाटाची ‘ही’ सुरक्षित कार १ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा; किती भरावा लागेल EMI?  
People with diabetes Can Eat roasted or baked snacks Is this safe for blood sugar patients Need To Know What To Eat
मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

आकाशात चमकणारी वीज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे- जी आपण थांबवू शकत नाही. किंबहुना ती घडल्यास त्रास पण होऊ शकतो. विजा का चमकतात? चमकण्याचे काय फायदे, याविषयी जाणून घेऊ या. वीज पडू नये असे आपल्याला म्हणताच येणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या हातात फक्त एकच गोष्ट असते, ती प्रक्रिया समजून घेणे आणि काही गोष्टींची काळजी घेणे. कारण भीती आणि अज्ञान या दोन गोष्टी कोणत्याही आपत्तीपासून होणारे नुकसान ठरतात.

अज्ञानामुळे आपत्तीविषयी भीती निर्माण होते आणि भीतीमुळे जास्त नुकसान घडते. त्यामुळे आपल्या आपत्ती व्यवस्थापनात आपत्तीविषयी ज्ञानाला फार महत्त्व आहे. आकाशातील वीज ही एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे. तिचा अभ्यास करणे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग हा निगेटिव्ह चार्जड्असतो आणि वातावरण पॉझिटिव्ह चार्जड् असते. पृष्ठभागावरून वातावरणात सतत इलेक्ट्रोन जात असतात जर विजा पडल्या नाही तर पृथ्वी आणि वातावरणाचे विद्युत समतोल पाच मिनिटांत संपून जाईल. तसेच वीज चमकल्यावर नायट्रस ऑक्साईड तयार होते, जे पिकांसाठी खताचे काम करते, जे अत्यंत महत्त्वाचे आहे. आकाशातील वीज ही आपल्या घरातील विद्युत प्रवाहासारखी आहे, त्याची तीव्रता त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असते. (उदा. १०० मिलियन ते एक बिलियन) बरेचदा आपण एखाद्या प्लास्टिक खुर्चीवर बसल्यानंतर आपल्याला शॉक लागतो. कारण घर्षणामुळे विद्युतभार तयार होतो आणि आपण जेव्हा बसतो तेव्हा आर्थिगमुळे तो भार जमिनीत जातो. असेच काहीसे आकाशात घडते.

हवा जेव्हा गरम तापलेल्या जमिनीवरून जाते तेव्हा ती गरम होते आणि हलकी झाल्यामुळे वर जाते. ही हवा थंड झाल्यावर पावसाचे थेंब तयार होतात. आणखी थंड झाल्यावर त्यांचे हिमकण तयार होतात. थंड हवा वजनदार असल्यामुळे खालच्या दिशेने वाहू लागते. वरती जाणारा वारा आणि खाली येणारा वारा यामुळे पाण्याचे थेंब आणि हिमकण यात घर्षण होते, घर्षणामुळे विद्युतभार तयार होतात. ऋणभार हिमकणासोबत खाली येतो आणि धन भार आभाळाच्या वरील भागात जमा होतात. जमिनीवर आभाळाच्या वरील भागात जमा होतात. जमिनीवर आभाळाच्या खाली विरुद्ध भार म्हणजे धन भार तयार होतो. हवा ही विद्युत रोधक असते, पण जेव्हा भार वाढत जातो तेव्हा हवेचे आयोनायझेशन- ती विद्युत वाहक होते. दोन्ही भार एकमेकांकडे आकर्षित होतात आणि सर्वात जवळचा चांगला वाहक पाहून त्या ठिकाणी वीज पडते. वीज कुठे पडणार हे जमिनीपासून काही फुटांच्या अंतरावर ठरते.

सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. ९५ टक्के विजा आकाशातच असतात, फक्त ५ टक्के विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. विजा एकाच ढगामध्ये, दोन ढगांमध्ये किंवा ढग आणि जमिनीमध्ये पडतात. जमीन आणि ढगांमधील वीज सर्वात धोकादायक असते. पृथ्वीवर दर सेकंदाला ४० विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे प्रचंड प्रमाणात असून कित्येकदा सूर्याच्या तापमानाइतके असते. एवढय़ा मोठय़ा तापमानामुळे हवा प्रचंड दबावाखाली प्रसरण पावते आणि मोठा आवाज होतो. वीज तीन प्रकारे आघात करू शकते. ती सरळ अंगावर पडू शकते अथवा ती बाजूच्या वस्तूवर पडल्यानंतर तिचा झोत अंगावर येऊ शकतो किंवा ती लांब कुठेतरी पडल्यानंतर जमिनीखाली असलेल्या तारा, पाइपद्वारे तिचा धक्का बसू शकतो.

आकाशातील विजेसंदर्भात काही महत्त्वाचे पैलू आणि आकडेवारी : विजा पावसाळ्यापूर्वी जास्त पडतात, अशी माहिती बऱ्याचदा हवामान खात्यांच्या रेकॉर्डमध्ये आढळून आली आहे. तसेच विजा पडल्याचे प्रमाण दुपारनंतर जास्त असते. वीज पडून मरण्याचे प्रमाण हे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. २००३ ते २०१३ मध्ये भारतात विजेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७१.४८ टक्के पुरुष तर २८.५१ टक्के स्त्रिया होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर पण अशाच प्रकारचे प्रमाण दिसून येते. भारतात मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त वय वर्ष ३०-४४ (३४.५%) या वयोगटात आहे, त्यापाठोपाठ १५-२९ र्वष (२७.८%) आणि ४५-५९ (२१.५१%) वयोगटात आहे.

भारतात सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण मध्य प्रदेशामध्ये आहे. महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सर्वात कमी प्रमाण चंदिगड आणि लक्षद्वीपमध्ये आहे. मराठवाडय़ात २००४ ते २०११ मध्ये वीज पडून बाधित लोकांमध्ये साधारणत: ४० टक्के लोक जालना आणि लातूर जिल्ह्य़ातील होते. जागतिक स्तरावर वीज प्रभावित व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण १०% ते ३० % आहे व उर्वरित वाचलेल्या लोकांवर दीर्घकालीन परिणाम झाले आहेत, त्यामुळे वीज प्रभावित व्यक्तीस त्वरित इलाज केल्यास त्याचे प्राण वाचवता येतात. विजेचा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता, असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात (२७%) नंतर झाडाखाली (१६%) व पाण्याजवळ आहे (१३%) साधारणत: ५६% वेळेस व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी (डोंगर) किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना अशा दुर्घटना घडल्या आहेत.

मंडळी, अशी ही बहुआयामी, बहुप्रतापी वीज..! तिच्यापासून सुरक्षितता प्राप्त करून घेण्यासाठी वरील टिप्सबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी जनजागृती कार्यक्रम विविध ठिकाणी राबवल्यास विजेबाबतचे गैरसमज दूर होऊन सुरक्षा प्राप्त होईल, हे नि:संशय..!

आकाशातील विजेविषयी असलेले काही गैरसमज त्याचा खुलासा

  • वीज पडणे हा एक दैवी प्रकोप आहे. पायाळू माणसावर जास्त विजा पडतात हे चूक आहे. वीज पडणे ही एक नैसर्गिक व शास्त्रीय (Scientific) प्रक्रिया आहे. चुकीच्या समजामुळे पायाळू माणसांना घालण्यात येणाऱ्या धातूच्या कडय़ामुळे त्यांच्यावर वीज पडते. विजा चमकत असताना सोबत कुठलीही धातूची वस्तू बाळगू नये.
  • आपण गर्जनाकारी ढगाखाली असल्यास आपल्या अंगावर वीज पडते हासुद्धा चुकीचा समज आहे. बऱ्याचदा ढगाच्या वरील भागातून वीज पडते आणि ती ढगापासून बऱ्याच अंतरावर सुद्धा पडते. त्यामुळे जरी वादळ आपल्यापासून लांब अंतरावर असले आणि आपल्यावरील आकाश निळे असले तरीही सावध रहावे.
  • वीज एका ठिकाणी फक्त एकच वेळेस पडते, असे नसून वीज एकाच ठिकाणी अनेक वेळेस पडू शकते.
  • विजेमुळे प्रभावित झालेली व्यक्ती त्वरित मरण पावते हाही चुकीचा समज आहे. वीज प्रभावित व्यक्तींचे प्रमाण हे फक्त १०% ते ३०% आहे. त्वरित प्रथमोपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो.
  • वीज प्रभावित व्यक्तीच्या अंगात विद्युतभार (करंट) असतो व त्यास स्पर्श करणे धोकादायक असते हा समज चुकीचा आहे. त्या व्यक्तीस स्पर्श करणे धोकादायक नसते.
  • दुचाकी वाहनावर वीज पडत नाही, कारण त्याचे चाक रबराचे असते हा गैरसमज आहे. दुचाकी वाहन चालवत असताना वीज पडून मृत्यू पावल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.

आकाशात विजा चमकत असताना या गोष्टी कराव्यात :

  • शेतात काम करीत असल्यास शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा.
  • सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
  • पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • ओल्या शेतात अथवा ओपन मैदानात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरडय़ा व सुरक्षित ठिकाणी जावे.
  • पोहोणारे, मच्छिमारी करणाऱ्यांनी त्वरित पाण्याबाहेर जावे.
  • झाडापासून-त्याच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
  • एखादे उंच झाड (जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे असल्यास, त्या झाडाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.
  • पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज प्रतिबंधक (Lightning arrestor) ची यंत्रणा बसवावी.
  • आपले घर, शेत इत्यादीच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.
  • जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.
  • दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्रोत यापासून शक्यतो दूर राहा.
  • मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोटय़ा झाडाखाली आसरा घ्यावा. असे शक्य नसल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी आधी सांगितलेल्या
  • (क्र. २) पद्धतीने गुडघ्यात वाकून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास या गोष्टी टाळा :

  • खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त मैदानात पडतात.
  • झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.
  • विजेचा खांब, टेलिफोनचा खांब टॉवर, इ. जवळ उभे राहू नका.
  • गाव, शेत, आवार आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपन घालू नका. कारण ते विजेला आकर्षित करते.
  • दोनचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा वाहनावरून प्रवास टाळा.
  • वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.
  • एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तींमध्ये किमान १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
  • धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.
  • पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन, इ. ना. स्पर्श करू नका, शिवाय त्यापासून दूर राहा.
  • प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा कमीत कमी पावर करा. मोबाइलचा वापर टाळा.
  • टीव्ही बंद करून शक्यतो त्याचे प्रलग-सॉकेटपासून वेगळे करावे.
  • व्होल्टेजमध्ये चढउतार (Fluctuations) होत असल्यास मेन स्वीच बंद करावे म्हणजे पुढील नुकसान टळेल.

सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद

plkul@rediffmail.com