मोबाइल टॉवर उभारणीच्या वेळेस इमारतीवर विनाशाचे चक्र फिरवून इमारतीचे अतोनात नुकसान केले जाते. मग यावर उपाय काय? मोबाइल टॉवर असूच नये का? संबंधित इतर गोष्टी योग्य असल्यास मोबाइल टॉवरची उभारणी असावी, परंतु ही उभारणी काही कायदेकानून करून नियमबद्ध असावी. त्यावर विचारवंताचे मत मागवावे, जेणेकरून कोणाचे नुकसान होणार नाही.
मोबाइल फोनशिवाय आयुष्य, ही कल्पना छान असली तरी ती आता कल्पनेच्या पलीकडे आहे. श्वासानंतर जरुरीची गोष्ट काय, तर ती बहुधा मोबाइल फोनच असावी. या अशा अत्यंत महत्त्वाच्या मोबाइलला सतत कार्यमग्न राहण्यासाठी मोबाइल टॉवरच्या साखळीची गरज असते. टॉवरवर असलेल्या मोठय़ा मोठय़ा अ‍ॅन्टेना सिग्नल प्राप्त करून त्यांच्यावर संस्कार करून ते परिवर्तित करत असतात. या कामासाठी तिथे इतर प्रकारची सामुग्री- जशी की ट्रान्समीटर, ट्रान्सपाँडर लहान-मोठय़ा केबल्सची बंडले, वीज प्रवाह अर्थ करणाऱ्या पट्टय़ा वगैरे सामुग्री बसवलेली असते.
आतापर्यंत मोबाइल टॉवरच्या रेडिएशनची बरीच चर्चा झालेली आहे, होत असते. परंतु रेडिएशनशिवाय मोबाइल टॉवर जिथे उभारलेला असतो त्या बिल्डिंगची, तेथे राहात असलेल्या रहिवाशांची व त्यांना होत असलेल्या त्रासाची कोणी दखल घेतलेली दिसत नाही. अशा इमारती- ज्यावर मोबाइल टॉवर बसवलेले आहेत, भेगा व गळतीच्या त्रासांनी परिपूर्ण असतात. विशेष खबरदारी घेतलेल्या काही इमारती अपवाद असू शकतील, परंतु त्या इमारती या लेखाचा विषय नाहीत.
मोबाइल टॉवरमुळे इमारतीचे नुकसान कशा प्रकारे होते?
मोबाइल टॉवरची रचना ही लेटिस प्रकारच्या उभारणीची असून, ती संपूर्ण लोखंडाच्या पट्टय़ा एकाला एक जोडून केलेली असते. त्याबरोबर वरील नमूद केलेली सामुग्री बसवलेली असते. या सर्वाचे प्रचंड वजन हे काही टनांमध्ये असते व आरसीसी कन्सल्टन्टने इमारतीचा ढांचा बनवताना या अतिरिक्त वजनाचा हिशोब केलेला नसतो. बहुतेक वेळा असे दिसून येते की, इमारतीच्या अस्तित्वात असलेल्या ढाच्यांचा विचार न करता जिथे मोकळी किंवा उभारणीस सोईस्कर अशी जागा दिसेल तिथे यंत्रणा उभारली जाते. उभारणीअगोदर कॉलम, बीम यांची जागा व रचना यांचा अभ्यास न करता, यंत्रणेचे व्यवस्थित नकाशे न बनवता अर्धशिक्षित कामगारांकडून व कंत्राटदाराकडून काम करवून घेतले जाते. या अतिरिक्त वजनाची यंत्रणा असंतुलितपणे उभारली जाते. त्यामुळे भेगा प्रसरण पावतात. या भेगा वरच्यावर नसून ज्यांना ‘स्ट्रक्चरल क्रॅक’ असे म्हणतात त्या वर्गात मोडतात.
मोबाइल टॉवरला जरुरी असते जाडय़ा मोठय़ा केबल्सच्या बंडलाची. ही बंडले इमारतीच्या एकाच बाजूला उभी-आडवी बसवलेली असतात, ज्यामुळे इमारतीच्या एका बाजूवर कलता दाब येतो व त्यामुळे इमारतीची एक बाजू सतत त्या बाजूने खेचली जाते. यामुळे इमारतीच्या इतर कमी ताकदीच्या भागावर कमालीचा ताण येतो.
त्या केबल्स व त्यांना वाहवून नेणारे ट्रे, जाग्यावर बसवण्यासाठी खिळे अथवा निरनिराळ्या प्रकारचे फासनर ठोकून बसवले जातात. हे जिथे ठोकले जातात तिथे धातूची काँक्रीटबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन खिळ्यांच्या भोवती पोकळी निर्माण होते, जी हानीकारक असते. टेरेसच्या भागावर अ‍ॅल्युमिनियमच्या पट्टय़ा विद्युत प्रवाह अर्थ करण्याच्या उद्देशाने ठोकून बसवलेल्या असतात. खिळे अगोदरच फ्लोरिंग असलेल्या पाणीरोधक प्रणालीमध्ये भोके पाडून तिचा नाश करतात. अशा प्रकारे निरनिराळ्या तऱ्हेने मोबाइल टॉवर उभारणीच्या वेळेस इमारतीवर विनाशाचे चक्र फिरवून इमारतीचे अतोनात नुकसान केले जाते.
मग यावर उपाय काय? मोबाइल टॉवर असूच नये का? संबंधित इतर गोष्टी योग्य असल्यास मोबाइल टॉवरची उभारणी असावी, परंतु ही उभारणी काही कायदेकानून करून नियमबद्ध असावी. त्यावर विचारवंताचे मत मागवावे, जेणेकरून कोणाचे नुकसान होणार नाही अशा प्रकारे असावी.
येथे काही गोष्टी सुचवाव्या असे वाटते त्या खालीलप्रमाणे –
’ इमारतीचा प्लॅन टेबलावर असतानाच टॉवरचा विचार व्हावा. बिल्डर व मोबाइल कंपनी यांनी एकत्रित र्सवकश विचार करून टॉवरची जागा निश्चित करावी. त्याची सर्व सामुग्री व तिच्या लोड फॅक्टरचा विचार करून टॉवरच्या उभारणीची आखणी करावी. त्यात जसे- ओव्हरहेड पाण्याच्या टाकीसाठी वरपासून पायापर्यंत कॉलम्स घेतले जातात, त्याप्रमाणे टॉवरचे व सामुग्रीच्या लोड फॅक्टरची कॉलम ग्रिडमध्ये विभागणी व्हावी. महत्त्वाचे म्हणजे केबल्ससाठी मुख्य इमारतीपासून स्वतंत्र असा एक डक्ट असावा. त्यामुळे मुख्य इमारतीवर केबलच्या वजनाच्या खेच असणार नाही.

मोबाइल टॉवरच्या रेडिएशनची बरीच चर्चा होत असते. परंतु रेडिएशनशिवाय मोबाइल टॉवर जिथे उभारलेला असतो त्या बिल्डिंगची, तेथे राहात असलेल्या रहिवाशांची व त्यांना होत असलेल्या त्रासाची कोणी दखल घेतलेली दिसत नाही. अशा इमारती- ज्यावर मोबाइल टॉवर बसवलेले आहेत, भेगा व गळतीच्या त्रासांनी परिपूर्ण असतात. विशेष खबरदारी घेतलेल्या काही इमारती अपवाद असू शकतील.मोबाइल टॉवरला जरुरी असते जाडय़ा मोठय़ा केबल्सच्या बंडलाची. ही बंडले इमारतीच्या एकाच बाजूला उभी-आडवी बसवलेली असतात, ज्यामुळे इमारतीच्या एका बाजूवर कलता दाब येतो व त्यामुळे इमारतीची एक बाजू सतत त्या बाजूने खेचली जाते. यामुळे इमारतीच्या इतर कमी ताकदीच्या भागावर कमालीचा ताण येतो.

’ अशा प्रकारच्या इमारतीचे वॉटरप्रूफिंग हे एखाद्या जाणकाराकडून करून घ्यावे. कारण इथे टॉवर उभारणी अडचणीची व वॉटर पेनेट्रेशनची किचकट समस्या असते व त्याचे निराकारण अत्यंत बारकाईने विचार करून निरनिराळी रसायने व पद्धती वापरून करावी लागेल.
बिल्डरच्या दृष्टिकोनातून असे प्रस्ताव मान्य होण्यासारखे नाहीत. कारण तेथे गाळा विक्रीचा प्रश्न येईल. पण यालाच दुसरा कंगोरा असू शकतो. व्यवस्थित उभारलेल्या टॉवरमुळे सोसायटीला काही कमाई होऊ शकते व त्यातून इतर व्यवस्थापन खर्च निभावून दोन पैशांची शिल्लक राहू शकते. रेडिएशनबद्दल म्हणावयाचे झाल्यास तो कार्यभाग पाहण्यासाठी काही नियम व स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आहे व ती योग्य काळजी घेतच राहील. इमारतीवर टॉवर उभे केले जातात त्याचा विचार बांधकामाच्या वेळेस केल्यास फायदाच होईल.
अशी गोष्ट ऐकिवात आहे की, दक्षिण मुंबईतील एका सोसायटीने जाहिरात बोर्डाची वर्षोनुवर्षांची कमाई जमा करून नालासोपारासारख्या ठिकाणी जमीन विकत घेऊन इमारत उभी केली व सर्व सभासदास एक एक फ्लॅट विनामूल्य बक्षीस दिले, असेही होऊ शकते.
मोबाइल टॉवर उभारायचा असेल तर जरूर उभारावा, परंतु त्याअगोदर त्याचा सारासार विचार व्हावा व मगच त्यावर निर्णय घ्यावा.

शैलेश कुडतरकर- shaileshkudtarkar81@gmail.com