िभतीची सजावट म्हटले की, रंगकाम, वॉलपेपर इतकेच पर्याय आपल्याला माहीत असतात. पण घराच्या िभतीची सजावट अधिक परिणामकारक आणि तितक्याच कलात्मक रीतीने साकार करायची असेल तर अलीकडच्या काळात विकसित झालेला टॅटू आर्ट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तेव्हा या आर्टविषयी थोडक्यात जाणून घेऊया झ्र्

कलाचित्र खऱ्या अर्थाने उठून दिसतं ते िभतीवर. एखादी झाडाची विस्तीर्ण पसरलेली फांदी, त्यावर बसलेला छोटासा पक्षी, त्या झाडावरून अलगद खाली पडणारी फुले.. खरं तर ही कल्पना खूपच साधी आहे, परंतु, िभतीवर या साध्याशा कल्पनेचे चित्र रेखाटताच ही िभत एकदम जिवंत होऊन जाते आणि अशा वेळी घराच्या िभती खऱ्या अर्थाने तुमच्याशी बोलू लागतात.

बऱ्याचदा आपण बघतो की, िभतीना रंगकाम केल्यानंतर काही वर्षांनी त्यांचे रंग उडणे, िभतीचे फोपडे पडणे अशा समस्या निर्माण होऊ लागतात. या समस्येवर तोडगा म्हणून पुन्हा नव्याने रंगकाम किंवा वॉलपेपर लावणे यांसारखे पर्याय निवडले जातात. पण तुम्हाला नावीन्याची हौस असेल तर टॅटू आर्ट खास िभतीसाठी या कलात्मक प्रकाराचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील िभतीचे सौदर्य वाढवू शकतात.

अलीकडेच विकसित झालेला टॅटू आर्ट हा प्रकार आहे. यात हाताने तसेच टॅटू मशीनच्या सहाय्याने विविध प्रकारच्या कल्पना सहजपणे रेखाटता येतात. या प्रकाराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, यात प्रत्यक्ष त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनातील कल्पनादेखील टॅटू चित्राच्या आधारे प्रत्यक्षात साकारता येतात.

घराच्या सजावटीसाठी टॅटू डिझाइनची निवड करताना ती नीट काळजीपूर्वक करावी. हे डिझाइन घराच्या इतर िभतीच्या दृष्टीनेदेखील तितकेच पूरक आहे की नाही ते पाहावे. त्याचबरोबर हे डिझाइन पाहताना डोळ्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे ते सहज सुलभ असावे.

टॅटू  डिझाइन प्रामुख्याने दोन प्रकारात उपलब्ध होतात. एक म्हणजे विनायल फिल्मच्या स्वरूपात. यात विनायल फिल्मचा वापर करून डिझाइन तयार केले जाते. तर दुसरे स्टेनसील प्रकारातले असते. यात स्टेनसील कटआउटचा वापर करून डिझाइन तयार केले जाते आणि मग ते िभतीवर रेखाटले जाते. प्रामुख्याने एखादी कथा कल्पना साकार करण्यासाठी स्टेनसील कटआउटस्चा वापर केला जातो .

टॅटू डिझाइनमुळे घरातल्या िभती खऱ्या अर्थाने बोलक्या होतात, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळेच टॅटू डिझाइनची निवड काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे असते. यात अनेक प्रकार पाहायला मिळतात, जसे संस्कृत मंत्रातील विाविध श्लोकांच्या ओळी, रेखाचित्रे, निसर्गावर आधारित कल्पना, काही अर्थपूर्ण कल्पना की ज्यात घरातील दिव्याचे झुंबर, सोफासेट किंवा तत्सम वस्तूंच्या अनुषंगाने टॅटू डिझाइन केले जाते.

टॅटू डिझाइन फक्तघराच्या हॉलमध्येच शोभते असे नाही तर ते बेडरूम, लहान मुलांची खोली इतकेच काय तर किचन किंवा बाथरूमच्या िभतीवर देखील शोभून दिसते. लहान मुलांच्या विश्वात पक्षी-प्राण्यांना विशेष स्थान असते. त्यामुळे त्यांच्या आवडीचा एखादा पक्षी झाडाच्या फांदीवर बसला आहे आणि त्याची फांदी पलंगावर आली असून तिथेच तो आवडता पक्षी बसला आहे. आपला आवडता पक्षी चित्र स्वरूपात का होईना, पण घरात आपल्याबरोबर असल्याच्या कल्पनेनं लहान मुले चांगलीच सुखावतात.

कधी स्वयंपाकघरातल्या एखादया िभतीवर छानसा श्लोक लिहिला असेल, तर त्यामुळेदेखील तिथल्या वातावरणात एक वेगळाच बदल जाणवितो. भले आपण रोज तिथे कामासाठी वावरत असलो तरी दरवेळी आपली मनस्थिती वेगळी असते. अशा वेळी हेच श्लोक आपली मन:स्थिती सुधारण्यास कारणीभूत ठरतात.

कधी डायिनग टेबलाजवळील भौमितिक रचनेमुळे आपण एखाद्या आलिशान हॉटेलच्या टेबलावर बसून जेवणाचा आस्वाद घेत आहोत, असा फिल अगदी घरच्या घरी अनभवू शकतो. टॅटू आर्ट हा गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झालेला प्रकार आहे आणि या प्रकाराच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घराची सजावट नुसतीच परिणामकारक नाही तर अधिक कलात्मक रीतीने साकारू शकता.

निलंजन गुप्तो

शब्दांकन : सुचित्रा प्रभुणे