एखाद्या छोटय़ाने दोन्ही दारांना हात टेकवून वाट अडवावी तसा हा उंबरठा घराच्या प्रवेशद्वारात आडवा पसरलेला असतो. उंबरठय़ाच्या आत ‘घरपण’ असलेलं घर असतं, तर बाहेर अनोळखी, विशाल विश्व. उंबरठय़ाच्या आतील जागा आपली स्वत:ची, मालकीची असते. बाहेरच्या जागेवर आपला हक्क नसतो, म्हणून सहनिवासात दाराबाहेर वस्तू ठेवल्या की इतरांच्या डोक्यात खुपतात. त्यांची अडचण होते. उंबऱ्याच्या आत मायेचं छप्पर लाभतं. आपुलकीचे चार शब्द कानावर पडतात. आपली कोणीतरी वाट पाहात असतं

कोऱ्या कागदावरील एका बिंदूतून रेघ काढायची आणि ती वळवत पुन्हा बिंदूलाच जोडायची. या जोडणीतून एक ‘आकार’ निर्माण होतो. आकार काढणारी वक्ररेषा त्या कागदाचे दोन भाग करते. एक रेघेबाहेरचा आणि दुसरा रेघेच्या आतला. बाहेरचा भाग अमर्यादित असतो अणि आतला भाग मर्यादित असतो. जणू ती वक्ररेषा त्या आकाराची सीमा आखते, मर्यादा घालते. मग हा आकार किंवा नकाशा एखाद्या देशाचा असू शकतो, राज्याचा, जिल्ह्यचा, तालुक्याचा किंवा सहनिवासाचा, सहनिवासातील एखाद्या घराचाही असू शकतो. ही सीमारेषा खूप महत्त्वाची असते. तिच्या पलीकडलं जग दुसऱ्याचं असतं. परकं असतं, अनोळखी असतं. देशाच्या सुरक्षिततेसाठी या सीमारेषांवर सुरक्षा दल तैनात करावे लागते. ती हद्द ओलांडून कोणी येऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. अंतर्गत सीमा ओलांडताना आपण ‘टोल’ भरतो. आपल्या घराचा आराखडा वास्तुरचनाकाराने तयार केलेला असतो. वरती आकाश आणि खालती जमीन असं बिनभिंतीचं घर ही फक्त कवीकल्पना असते. आपल्यापुरता विचार केला तर घरच्या चारी सीमारेषांवर सुरक्षेसाठी आपण भिंती उभ्या करतो. फक्त थोडासा सीमारेषेचा भाग साधारणपणे तीन-चार फुटांच्या आसपास, घरांत जा-ये करण्यासाठी मोकळा ठेवतो. ती रेषा ठळकपणे नजरेत भरावी म्हणून तिच्यावर लाकडी रुंद पट्टी ठोकतो. ती पट्टी म्हणजेच उंबरठा. उंबराच्या झाडाचं लाकूड तसं हलक्या प्रतीचं असतं. त्या लाकडापासून केलेला तो उंबरठा किंवा उंबरा.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही

उंबरठा पूर्वी लाकडाचा असायचा. तो ‘‘२ ते ५-६’’ उंच आणि रुंद असायचा. घरात पाऊल टाकताना त्याला पाय न लावता तो ओलांडला जायचा. रोज सकाळी सडा संमार्जन करताना उंबऱ्यावर पाणी घालून रांगोळीने त्याच्याशी काटकोन करणाऱ्या दोन किंवा तीन समांतर रेषा आणि गोपद्म असं आलटून पालटून काढलं जाई. रोज केलेल्या पुजेमुळे त्याला पाय लावला जात नसे. लाकडी उंबरठय़ाची जागा आता दगडी उंबरठय़ाने घेतली आहे. पण रांगोळीने सजण्याचं त्याचं भाग्य मात्र दुर्मीळ होऊ लागलं आहे.

बाहेरच्या जगापासून उंबरठा घराला वेगळं करतो. उंबरठय़ापासून घराची हद्द चालू होते. हा उंबरठा पूर्वी लाकडाचा असायचा. तो ‘‘२ ते ५-६’’ उंच आणि रुंद असायचा. घरात पाऊल टाकताना त्याला पाय न लावता तो ओलांडला जायचा. रोज सकाळी सडा संमार्जन करताना उंबऱ्यावर पाणी घालून रांगोळीने त्याच्याशी काटकोन करणाऱ्या दोन किंवा तीन समांतर रेषा आणि गोपद्म असं आलटून पालटून काढलं जाई. रोज केलेल्या पुजेमुळे त्याला पाय लावला जात नसे. लाकडी उंबरठय़ाची जागा आता दगडी उंबरठय़ाने घेतली आहे. पण रांगोळीने सजण्याचं त्याचं भाग्य मात्र दुर्मीळ होऊ लागलं आहे.
एखाद्या छोटय़ाने दोन्ही दारांना हात टेकवून वाट अडवावी तसा हा उंबरठा घराच्या प्रवेशद्वारात आडवा पसरलेला असतो. उंबरठय़ाच्या आत ‘घरपण’ असलेलं घर असतं, तर बाहेर अनोळखी, विशाल विश्व. उंबरठय़ाच्या आतील जागा आपली स्वत:ची, मालकीची असते. बाहेरच्या जागेवर आपला हक्क नसतो, म्हणून सहनिवासात दाराबाहेर वस्तू ठेवल्या की इतरांच्या डोक्यात खुपतात. त्यांची अडचण होते. उंबऱ्याच्या आत मायेचं छप्पर लाभतं. आपुलकीचे चार शब्द कानावर पडतात. आपली कोणीतरी वाट पाहात असतं. लळा, जिव्हाळा, माया, काळजी, ओढ ही उंबरठय़ाच्या आत पाऊल टाकलं की जाणवते. आपलं हक्काचं माणूस, आपलं माणूस तिथे असतं. त्या रक्ताच्या, नात्यांच्या ओढीनेच दिवसभर वणवण करणारी व्यक्ती उंबरठय़ाबाहेर थांबू शकत नाही.
उंबरठय़ामुळे, त्याच्या उंचीमुळे कोणीही व्यक्ती, मग घरातून बाहेर जायचं असो किंवा बाहेरून घरात यायचं असू दे, तिथे क्षणभर थांबते. घरातून बाहेर जाताना आवश्यक त्या सगळ्या वस्तू घेतल्या आहेत ना, दार-खिडक्या, गॅस, पंखे बंद आहेत ना, असा विचार करून बाहेर पाऊल टाकते. त्रयस्थ व्यक्ती, फेरीवाले दार उघडं असलं तरी दारावर टकटक करतील, बेल वाजवतील, बोवारीन उंबऱ्याबाहेर बसून राहील, पण आत येणार नाही. ती तिथेच घुटमळेल. कारण उंबरठय़ाच्या आतलं आणि बाहेरचं विश्व सर्वस्वी वेगळं असतं. उंबरठय़ाच्या रूपाने जणू एक अदृष्य भिंतच उभी असते, धाक असतो. आणि म्हणून सर्वस्वी अपरिचित, वेगळ्या विश्वात, प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकताना ‘उंबरठा ओलांडला’ हा शब्दप्रयोग केला जाऊ लागला किंवा जातो.
घर व मूल यात गुरफटलेली स्त्री जेव्हा शिकू लागली, अर्थाजन करू लागली तेव्हा हाच उंबरठा तिने आत्मविश्वासाने ओलांडला. तिचा उंच झोका शब्दबद्ध करताना ‘थबकले उंबऱ्यात मी, पाहूनि नवी पहाट’ असे कवीला म्हणावेसे वाटले. हे थबकणं केवळ उंबऱ्यामुळेच घडून येतं. विचारपूर्वक कृती घडते. ठेच लागत नाही. लग्न झाल्यावर आपले जन्मदाते आपलं बालपण मागे ठेऊन एका सर्वस्वी अपरिचित अशा नव्या घरांत प्रवेश करताना ‘ती’ म्हणते, ‘उंबरठय़ावर माप ठेविले, मी पायांनी उलथून आले, आले तुझिया घरी, कराया, तुझीच रे चाकरी’. हा गृहप्रवेशाचा विधी उंबरठय़ाच्या साक्षीने पार पडतो. कधी ‘आत पाऊले येतील राया, उठेल जग हे तुजसी खाया, निशिदिनी भरल्या नयनी पहाया, वेडी माया उंबरठय़ात, प्रिया मी येऊ कशी रे आत? पाऊले घुटमळती दारांत’ असा प्रश्न पडतो, पण उंबरठा तटस्थ राहतो. एखाद्या घराने घेतलेलं कर्ज मुदतीत फेडलं नाही तर घेणेकरी सतत उंबरठय़ात हजर असतो. म्हणून सहज कोणी उंबऱ्यावर बसलं की त्याला लगेच उठवलं जातं. ‘आम्ही काही तुझे देणे लागत नाही’ अशी पुस्तीही जोडली जाते. उंबरठय़ात शिंकू नये, असंही म्हणतात.
मंदिराचा उंबरठा अतिशय पवित्र मानला जातो. त्याला हात लावून वंदन करूनच आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. अस्पृश्यांना कधी काळी मंदिरात प्रवेश नाकारला जात असे. इतकंच नाही तर उंबरठय़ाला शिवलेलं चालत नसे. अशा वेळी ती मानवाची व्यथा ‘उंबरठय़ासी कैसे शिवू आम्ही जाती हीन’ अशा शब्दांत अभंगातून व्यक्त व्हायची.

उंबरठय़ामुळे, त्याच्या उंचीमुळे कोणीही व्यक्ती, मग घरातून बाहेर जायचं असो किंवा बाहेरून घरात यायचं असू दे, तिथे क्षणभर थांबते. घरातून बाहेर जाताना आवश्यक त्या सगळ्या वस्तू घेतल्या आहेत ना, दार-खिडक्या, गॅस, पंखे बंद आहेत ना, असा विचार करून बाहेर पाऊल टाकते. त्रयस्थ व्यक्ती, फेरीवाले दार उघडं असलं तरी दारावर टकटक करतील, बेल वाजवतील, बोवारीन उंबऱ्याबाहेर बसून राहील, पण आत येणार नाही. ती तिथेच घुटमळेल. कारण उंबरठय़ाच्या आतलं आणि बाहेरचं विश्व सर्वस्वी
वेगळं असतं.

थोडं ‘दबून’ का असेना, पण प्रवेशद्वारातला उंबरठा आपलं अस्तित्व आजतागायत टिकवून आहे. परंतु घराच्या प्रत्येक खोलीच्या दारात असलेल्या उंबऱ्याने मात्र स्वत:ला मिटवून टाकले आहे. पूर्वी स्वयंपाकघर, माजघर, देवघर, कोठीची खोली असे स्वतंत्र विभाग उंबऱ्याच्या निमित्ताने आपली वैशिष्टय़े जपायचे. केर काढताना उडू नये, इकडचा तिकडे जाऊ नये, तिथल्या तिथे गोळा करायला सोयीचे पडावे म्हणून हा ‘अडथळा’ हवासा वाटे. बाहेरून आलेली व्यक्ती हातपाय धुतल्याशिवाय स्वयंपाकघरात जात नसे. देवघराचे पावित्र्य जपले जात असे. मनावर, गतीवर थोडासा संयम, बंधन, नियंत्रण उंबऱ्याच्या मध्ये वाटेत ‘उभं’ राहण्यामुळे येत असावं. स्वयंपाकघर वाळून गेल्यामुळे आता जेवणं स्वयंपाकघरात न होता हॉलमधील डायनिंग टेबलावर किंवा मांडीवर होऊ लागली आहेत. प्रसाधनगृहांच्या संख्येत वाढ होऊन ती प्रत्येक खोलीला चिकटली आहेत. प्रत्येक खोलीला ‘मी’च लेबल लागल्यामुळे तिची बंद दारं जणू उंबऱ्याच्या भूमिकेत शिरली आहेत. अंतर्गत सजावटकाराच्या दृष्टीने तर ‘तो’ घराच्या सौंदर्यात येणारा व्यत्ययच आहे.
घरातून त्याला हद्दपार केल्यामुळे त्याला आता रस्त्यावर उतरावं लागलं आहे. नुसते पिवळे पट्टे वेगावर नियंत्रण ठेवण्यात असमर्थ ठरल्यामुळे सुरक्षिततेला अग्रक्रम देण्याच्या हेतूने ‘अनब्रेकेबल स्वरूपात तो रस्त्यावर दिसू लागला आहे. चंद्रशेखर गोखले ह्यंची चारोळी त्याचे यथार्थ वर्णन करते.
‘मी आणि जग यामध्ये, माझ्या घराचा उंबरठा आहे
आणि छतापेक्षा मला त्याचाच मोठा आधार आहे.

सुचित्रा साठे – vasturang@expressindia.com