हॉट वॉटर हीटरविना मान्सूनची कल्पना करणे अशक्य आहे. तापमान अतिशय कमी होण्याच्या या काळामध्ये हॉट वॉटर हीटरचा वापर अत्यंत गरजेचा असतो. पावसाळ्यात देशभरातील अनेक ग्राहक नवा वॉटर हीटर खरेदी करतात. परंतु आपल्या गरजा पूर्ण करेल आणि पैसेही वाचवेल, अशा योग्य वॉटर हीटरची निवड कशी करायची, ते आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते. इलेक्ट्रिक वॉटर हीटरमुळे तुम्हाला पाणी लवकर आणि आपल्या गरजांनुसार गरम करणे शक्य होते. आजकाल, बहुतांश संघटित ब्रँडसोबत स्टार रेटिंग्स असते व त्यामुळे विजेमध्ये लक्षणीय बचत करण्यासाठी मदत होते.

योग्य हॉट वॉटर हीटरची निवड करण्यास मदत करण्यासाठी पुढे काही टिप्स दिल्या आहेत.

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा
Cyber Criminal, Small Amount Fraud, target, Cyber Police, Maharashtra, Unwilling to Register, small fraud cases,
सायबर फसवणुकीच्या हजारो तक्रारींची नोंदच नाही; कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या घशात

अनेक कंपन्या ऊर्जाक्षम इलेक्ट्रिक वॉटर हीटर देतात. यामुळे खर्च व ऊर्जा यांची बचत करणे शक्य होते. स्टार रेटेड उत्पादने ऊर्जा बचतीच्या बाबतीत उत्तम दर्जाची असतात. काही अतिशय सक्षम मॉडेल (पाच स्टार्स रेटेड) कदाचित महागडी असू शकतात. दीर्घकाळ चालणारे आणि पैसे वाचवण्याच्या दृष्टीने त्यांची रचना केलेली असते. आणि हे काम ते पर्यावरणपूरक पद्धतीने करतील. घरांतील सरासरी वीजबिलांमध्ये वीज बचतीचे १५ ते २५% (हिवाळ्यात अधिक, उन्हाळ्यात कमी) प्रमाण वॉटर हीटरचे असते. विजेच्या बजेटमध्ये हीटिंग व कूलिंग यांचे योगदान दुसऱ्या क्रमांकाचे असते. जुन्या युनिटच्या जागी नवे वीजबचत करणारे मॉडेल वापरल्याने तुमचे पैसे वाचतील आणि घरातील एकंदर विजेचा वापर कमी केला जाईल.

चार सदस्यांच्या कुटुंबासाठी १० ते १५ लिटर क्षमता पुरेशी असते. वापरानुसार आणि कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार क्षमता वेगवेगळी असते. तुम्हाला अंघोळीसाठी तातडीने गरम पाणी हवे असेल तर ३-६ लिटर क्षमतेच्या इन्स्टंट वॉटर हीटरची निवड करावी.

शॉवर उपकरणांसाठी, ३५-५० लिटर्स अशा अधिक क्षमतेच्या वॉटर हीटरची निवड करावी.

इलेक्ट्रिक वॉटर हीटर ५ वर्षांहून अधिक काळ टिकतात. तुमच्या परिसरातील पाण्याच्या दर्जानुसार वॉटर हीटर युनिटची योग्य देखभाल करणेही (हीटिंग एलिमेंट्समधून स्केल रिमूव्हल, एमजी नोड्स बदलणे) अतिशय महत्त्वाचे असते.

शहरीकरणातील आरामदायी जीवनशैलीचा वाढता कल यामुळे अनेक ग्राहकांना कोणतीही खरेदी करताना स्टाइल महत्त्वाची वाटते. तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर आकर्षक डिझाइन असलेले वॉटर हीटर गरजेचे ठरतात.

अनेक ब्रँड विविध रंगांमध्ये आणि डिझाइनमध्ये वॉटर हीटर देतात. इलेक्ट्रिक वॉटर हीटरमध्ये, तुमच्या बाथरूमनुसार, तुम्हाला लंबवर्तुळाकार, चौकोनी आकाराच्या किंवा प्रिझमच्या आकाराच्या हीटरची निवड करता येईल.  पाणी तापविण्याची वेळ निश्चित करणे, तापमान नियमित करणे आणि गजर लावणे ही काही जास्तीची वैशिष्टय़े इलेक्ट्रिक वॉटर हीटरमध्ये दिली आहेत.

तुमच्या गरजांनुसार, उभा/आडवा हीटर, आकार, रंग, वीजबचतीबाबत रेटिंग, टँकवरील कोटिंग, वापरलेल्या टँकचा प्रकार (स्टेनलेस स्टील वा कॉपर), हीटिंगचा वेग (हीटिंग एलिमेंट क्षमता – किलोवॅट) आणि आवश्यक क्षमता यांची चौकशी करावी. रिकव्हरी स्पीड म्हणजे संपूर्ण पाणी गरम होण्यासाठी लागणारा वेळ ही काही अतिरिक्त वशिष्ट्ये आहेत. तुम्हाला गरम पाण्याची आवश्यकता जास्त लागत असेल तर जलद रिकव्हरी स्पीड आणि अधिक क्षमता असलेले मॉडेल पाहावे.

(राकोल्ड थर्मो प्रायव्हेट लिमिटेड- संशोधन प्रमुख)