वीरगळ स्मारक कदाचित फारसे कलात्मक नसेल, पण त्या निर्जीव दगडाला स्वत:चा जिताजागता इतिहास आहे.युद्धभूमीवर रणसंग्रामात ज्यांना वीरगती प्राप्त झाली ते असल्या वीरगळांनीच लोकांच्या स्मरणात राहिले. हजारो वर्षांपूर्वीचे आढळणारे वीरगळ म्हणजे गतेतिहासाचे साक्षीदार आहेत. वीरगळांवरील सचित्र लिपींनीच अज्ञात इतिहासाची दालने उघडली गेली. या वीरगळांचा मागोवा घेत-घेतच इतिहासकारांना अज्ञात काळातील प्रसंगांचे लख्ख दर्शन घडण्यास मदत झाली..

इ. स. पूर्व काळापासून ते गेल्या शतकातील अखेरच्या पर्वातील कारगील युद्धापर्यंत आपल्या भारताने अनेक रणसंग्राम अनुभवले. कोणत्याही युद्धात जसा जय-पराजय असतो, तसा त्यातील मानवी संहारही अपरिहार्य आहे. त्यात देशाशी एकनिष्ठ राहून लढणाऱ्यांना वीरगती मिळाल्यावर त्यांचे स्मरण करून त्यांची उभारलेली स्मृतिस्थळे ही जशी इतिहासाची साक्षीदार ठरतात, तशीच पुढच्या पिढीला प्रेरणादायीही होतात. या स्मृतिस्तंभानाच ‘वीरगळ’ नावाने संबोधले जाते. थोडक्यात, युद्धप्रसंगी वीरगती प्राप्त झालेल्या योद्धय़ांच्या स्मरणार्थ उभारलेल्या वैशिष्टय़पूर्ण पत्थराला ‘वीरगळ’ हे नाव आहे.
हे वीरगळ स्मारक कदाचित फारसे कलात्मक नसेल, पण त्या निर्जीव ws03दगडाला स्वत:चा जिताजागता इतिहास आहे. युद्धभूमीवर रणसंग्रामात ज्यांना वीरगती प्राप्त झाली ते या असल्या वीरगळांनीच लोकांच्या स्मरणात राहिले. धार्मिक अधिष्ठानाच्या कर्नाटक भूमीवर हजारो वर्षांपूर्वीचे आढळणारे वीरगळ म्हणजे गत इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्या वीरगळांवरील सचित्र लिपींनीच अज्ञात इतिहासाची दालने उघडली गेली. या वीरगळांना कर्नाटकातील कलात्मक मंदिर शिल्पांचे वैभव नसेल, पण त्यांचे ऐतिहासिक मूल्य अनमोल आहे. गत इतिहास कथन करणारी बखर, त्यावेळची प्रचलित नाणी, अनेक प्रकारची शस्त्रे, शिल्प वैभवाइतकेच वीरगळांना मोल आहे. या वीरगळांचा मागोवा घेत-घेतच इतिहासकारांना अज्ञात काळातील प्रसंगांचे लख्ख दर्शन घडण्यास मदत झाली.
‘वीर-कल’ या कन्नड शब्दांवरून वीरगळ हा शब्द तयार झाला आहे. तसेच वीरगळाचा उगम कर्नाटकात झाल्याचे समजले जाते. कर्नाटकात जेथे राष्ट्रकुट- चालुक्य राजघराण्याची अधिसत्ता होती, त्याच प्रदेशात वीरगळ मोठय़ा प्रमाणावर आढळतात. तर महाराष्ट्रात मराठवाडा, खानदेश, कोकण प्रदेशात अजूनही वीरगळ सापडताहेत.
आपल्या देशात आतापर्यंत आढळलेल्या वीरगळात कर्नाटक- आंध्र प्रदेशातील वीरगळांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रासहित देशभरात सापडलेल्या वीरगळांतून फक्त लिखित स्वरूपाची माहितीच प्राप्त झाली आहे असे नव्हे, तर ज्या घनघोर रणसंग्रामांत धारातीर्थी पडलेल्या वीरांचे स्मरण करताना त्या संग्रामप्रसंगाची कल्पना येण्यासाठी संदर्भानुसार उचित शिल्पाकृतीही निर्माण करण्याची शिल्पकारांची कल्पकता वाखाणण्यासारखी आहे.
ws04महाराष्ट्र प्रदेशात आढळलेल्या वीरगळांचे दोन प्रकारांत वर्गीकरण होऊ शकते. काही वीरगळ स्तंभांवर चौकही कोरून त्यातून युद्धप्रसंगीचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी वीर धारातीर्थी पडला, तेथील युद्धप्रसंगाचे सजीव सादरीकरणाचा शिल्पकारांचा प्रयत्न खूपच बोलका आहे. समरप्रसंगी आमने-सामने लढणारे सशस्त्र सैनिक, लढाईसाठी सज्ज असलेले आक्रमक घोडदळ, तर सागरी युद्धाचा अनोखा प्रसंग चितारताना सागराच्या पाश्र्वभूमीवरील अनेक वल्ह्य़ांच्या नावा दाखवल्या गेल्यात.
काही वीरगळांच्या शिरोभागी मंदिर शिखर शिल्पांची प्रतिकृती कोरलेली आहे, आणि त्याच्या दोन्ही बाजूंस चंद्र-सूर्य ठळकपणे दाखवण्याचा प्रयत्न तर लाजवाब आहे. ‘‘विश्वामध्ये जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत या वीरगती प्राप्त झालेल्या वीरांची कीर्ती कायम राहणारच,’’ हा संदेश त्यापाठीमागे अभिप्रेत आहे. सापडलेल्या काही वीरगळांतील चौकटीतून वीरांचा महिमा चित्र-लिपीतून दाखवण्याचा शिल्पकारांचा प्रयत्न आहे.
वीरगळातील दुसऱ्या प्रकारातून मानवी शिल्पाकृतीचे बोलके-सजीव सादरीकरण करण्यात आले आहे. काहीही असले तरी कर्नाटक-महाराष्ट्रात सापडलेल्या वीरगळांत बरेच साम्य आहे. मात्र कर्नाटकातील आढळलेल्या वीरगळांवर मंदिर शिल्पाचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे तेथील वीरगळांवर द्रविडी शैलीच्या मंदिर शिल्पाचा प्रभाव जाणवतो.
‘‘जान जाय, पर वचन न जाय,’’ म्हणत देश-धर्मासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या राजस्थान भूमीतील धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या वीरगळांना ‘पालिया’ या नावाने ओळखले जाते. मात्र या वीरगळांचे स्वरूप स्मृतिस्तंभ असून, ते दगडांचे नाहीत. त्यांच्या निर्मितीसाठी टिकाऊ लाकडांचा उपयोग केला गेला आहे.
रणांगणावर प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी वीरगळ उभारण्यासाठी इंग्रज राज्यकर्ते बरेच दक्ष होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी दिल्ली-लखनौ येथे जे स्मृतिस्तंभ (वीरगळ) उभारले गेले, त्यापाठीमागे इंग्रज शास्ते आहेत. पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिक- अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारलेले ‘इंडिया गेट’ म्हणजे दिल्ली महानगरीची ओळखच झाली. ग्रीक-रोमन कमान कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ते प्रसिद्ध आहे.
रणांगणावरील शूर-वीरांच्या स्मरणार्थ प्रारंभी सरळ उभे दगड, लाकडी ठोकळे, मूर्ती उभारण्याची पद्धती तशी पुरातन काळापासूनची. कालांतराने आपल्या संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याची मनोभावे पूजा-प्रार्थना करण्याचा परिपाठ होताच. काही वीरगळांवर तर भावनेला आवाहन करणारी वाक्येही कोरल्याचे दिसते. उदा. ‘हे व्यर्थ न हो बलिदान’, ‘रणांगणावर बलिदान/ वीरगती प्राप्त झालेला स्वर्गाला जातो’  इ. सापडलेल्या वीरगळांतून एकसूत्रीपणा जाणवत नाही. त्यातून कलात्मकतेपेक्षा पुढील पिढय़ांसाठी तो एक कायमस्वरूपी दस्तावेज राहावा हा त्यापाठीमागे प्रधान हेतू आहे. वीरगळ स्मृतिस्तंभ आणि ज्या स्मारकशिळा सापडल्यात त्याआधारे त्या त्या प्रदेशातील त्यांच्या सांस्कृतिक जीवनावरही प्रकाश पडतो, ही आणखी एक जमेची बाजू.
कटू-दु:खद प्रसंगाचं कायमस्वरूपी स्मारक मुंबईतही आहे. मुंबईच्या दक्षिण टोकाला उभे असलेले आर. सी. चर्च हीच ती वास्तू. रोमन कॅथॉलिक वास्तूशैलीची इमारत मुंबईसह साऱ्या देशात प्रख्यात आहे. या भव्य चर्चच्या लाल-पिवळसर दगडांच्या रंगसंगतीने ही इमारत चित्ताकर्षक वाटते. ‘जॉन द इव्हँजलिस्ट’ हे चर्चचे मूळ नाव होते. या चर्चवास्तूला घडलेल्या समरप्रसंगाच्या कटू-दु:खद आठवणीची किनार आहे. इ. स. १८३८ ते १८४३ या काळात सिंध-अफगाण युद्धात भारतीयांबरोबर अनेक इंग्रज सैनिक अधिकाऱ्यांची आहुती पडली. या समरप्रसंगाची कायमची आठवण राहावी म्हणून इ. स. १८५८ मध्ये या चर्चची कल्पकतेने उभारणी करण्यात आली. अफगाण भूमीवर झालेल्या युद्धात मनुष्यहानी झाली म्हणूनच हे ‘अफगाण चर्च’ नावाने ओळखले जाते. युद्ध पाश्र्वभूमीची ही वास्तू म्हणजे वीरगळच. दीडशे वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतरही ही वास्तू आपले वैभव टिकवून आहे. या वास्तूच्या उभारणीसाठी बेसाल्ट आणि लाइमस्टोन दगड वापरण्यात आले आहेत. ही प्रत्यक्ष वास्तू व सभोवतालच्या परिसरावर ब्रिटिश आमदनीची छाप आहे. चर्चनिर्मितीसाठी निवडलेली जागा म्हणजे इंग्रजांची शांतताप्रियताच त्यातून अधोरेखित होतेय.
सुमारे २१० फूट उंचीचा, देखणा मनोरा हे या चर्चचे वैशिष्टय़ आहे. ख्रिश्चन प्रार्थनास्थळांच्या शिरस्त्याप्रमाणे या मनोऱ्याच्या शिरोधारी धर्माचे प्रतीक असलेल्या क्रॉसचे चिन्ह आहे. मात्र हा मनोरा प्रमुख चर्च वास्तूवर नसून तो नजीकच्या दालनावर आहे. चर्चच्या परिसरातील स्वच्छतेसह, डेरेदार वृक्ष म्हणजे चर्च वास्तूचे वैभव खुलवताना ब्रिटिशांचे निसर्गप्रेमही त्यातून दिसून येते. चर्चच्या प्रांगणात प्रवेश करताच त्याचा प्रत्यय येतो. प्रत्यक्ष चर्च वास्तूत प्रवेश करताना नीरव शांतता जाणवायला लागते. प्रारंभी कलाकुसरीच्या प्रवेशद्वाराने कलात्मकतेची झलक जाणवते. आत मार्गस्थ झाल्यावर सामुदायिक प्रार्थना मंडप लागतो. या भव्य मंडपात आठ खांबांच्या वीस कमानी असून, त्यावर गॉथिक वास्तुशैलीची छाप आहे. येथेच एका फलकांवर चर्चची माहिती दिली आहे. चर्चच्या ऐसपैस अंतर्गत भागात प्रार्थना-प्रवचनासाठी येणाऱ्या सशस्त्र सैनिकांसाठी त्यांच्या बंदुका ठेवण्याकरिता खास खोबणीही केल्या आहेत.
प्रवचनकार फादर धर्मगुरूंना उभे राहण्यासाठी एका देखण्या संगमरवरी व्यासपीठाची योजनाही मध्यभागी केली आहे. चर्च वास्तूच्या काचेच्या तावदानावरील रंगीबेरंगी चित्राकृतींनी वास्तुसौंदर्यात भर टाकली आहे. त्याद्वारे नेत्रसुखद छाया-प्रकाशाचा मेळही साधला गेलाय. अर्थात, या चित्राकृतीतून येशू ख्रिस्ताच्या जीवनप्रवासातील घटना दाखवल्या आहेत.
काचेवरील या प्रकारच्या चित्राकृतीला ‘स्टेन्डग्लास’ चित्रकला म्हणून संबोधले जाते. अफगाण चर्चच्या दालन, तावदानावर प्रख्यात स्टेन्डग्लासतज्ज्ञ विल्यम वेल्स यांनी सर्व चित्रे चितारली आहेत.
विविध आकारांचे आणि रंगांचे काचेचे तुकडे शिशाच्या साच्यात घट्ट ठेवून तयार केलेली ही कलाकृती मध्ययुगीन युरोपातील चित्रकला प्रकार आहे.
इतिहासाच्या पाऊलखुणा ठरलेल्या अनेक पुरातन वास्तू, गड, किल्ले, लिखित स्वरूपाचे साहित्य या बाबतीत आपल्याकडे उदासीनता आहे. एखादा वीरगळ स्वरूपाचा स्तंभ-शिळा सापडल्यास तेव्हा तो एक-दोन दिवसाच्या बातमीचा विषय होतो. पण झोकून देणाऱ्या इतिहासकाराच्या जातकुळींनी त्याचा शोध घेत त्याचे ऐतिहासिक मूल्य जाणणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. शासनदरबारीही त्यासाठी प्रतिसाद नाही. बरे, जी वीरगळे अनेक ठिकाणी आढळताहेत त्यांची आजची स्थिती वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक स्थित्यंतरामुळे दयनीय आहे.
गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुक्यातील चिरनेर येथे शेतकरी-आदिवासींनी इंग्रज सरकारच्या जुलमी जंगल कायद्याला विरोध करण्यासाठी जो लढा दिला (२५ सप्टेंबर १९३०) त्यात आठ जणांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या स्मारकाची आता पडझड- दुरवस्था झाली आहे. या स्मारकाची योग्य देखभाल करण्यासाठी सरकारदरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने त्या धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या वारसांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी आपल्याकडे देण्याची मागणी केली आहे.
८५ वर्षांपूर्वीच्या वीरगळांची ही आजची स्थिती, तर हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे साक्षीदार-मापदंड ठरलेल्या अज्ञात वीरगळांच्या संवर्धनाच्या बाबतीत सारा आनंदी-आनंदच आहे..

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!