अनेक ग्राहक उपनगरांमध्ये राहण्याचा पर्याय निवडत असल्याने  पालघर-बोईसर या भागांमध्ये निवासी प्रकल्पांना असणाऱ्या मागणीतही वाढ झाली आहे.
मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (एमएमआर) ४,३५५ चौ. किमींवर पसरलेला असून, त्यात आठ महापालिका, नऊ नगरपालिका आणि ठाणे व रायगड जिल्ह्य़ांतील १०००हून अधिक गावे मोडतात. गेल्या काही वर्षांमध्ये संपर्काची उत्तम साधने, जमिनीची उपलब्धता आणि भविष्यात या भागामध्ये उभ्या राहणाऱ्या पायाभूत सुविधा यांमुळे मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (एमएमआर)च्या उपनगरांमधील निवासी मालमत्तांना विलक्षण मागणी येऊ लागलेली आहे. २०११च्या जनगणनेत एमएमआर भागाच्या परिघावर वसलेल्या शहरी भागांचाही विस्तार होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
ws01
शहरी भागांमधील जमिनीची मर्यादित उपलब्धता, गगनाला भिडलेल्या किमती यांमुळे लोक शहराच्या बाहेर राहणे पसंत करू लागलेले आहेत. अनेकांनी उपनगरांमध्ये राहण्याचा पर्याय निवडलेला असल्याने या भागांमधील निवासी प्रकल्पांना असणाऱ्या मागणीतही त्या पटीत वाढ झाली आहे. विरार-पालघर-बोईसर हा पट्टाही त्यातच मोडतो. एमएमआरच्या बाहेरच्या प्रदेशात वसलेल्या या पट्टय़ाला आता घर खरेदीदारांचे वाढते प्राधान्य मिळू लागलेले आहे.
पालघर मुंबईच्या जवळ वसल्याने गेल्या काही वर्षांमध्ये इथे प्रामुख्याने छोटय़ा आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांची भरभराट झालेली आहे. मुंबई-अहमदाबाद (राष्ट्रीय महामार्ग ८) ने मुंबईला पालघरशी जोडलेले आहे. मुंबईच्या बाहेर वसलेला आणि तुलनेत जवळचा असलेला जिल्हा म्हणून नवे उद्योग, निवासी प्रकल्प आणि विस्तार प्रकल्प यांच्याकरिता हे एक आदर्श ठिकाण आहे.
ws03एमएमआरमधील सर्वात विकसित शहरी केंद्र  असलेल्या विरारपासून जवळ असणे हेदेखील या भागाच्या विकासामागील एक प्रमुख कारण ठरते. इथून मुंबईच्या पश्चिम उपनगरांना मिळणारी कनेक्टिव्हिटी आणि वाजवी दरांमधील मालमत्तांची उपलब्धता यांमुळे अनेकजण राहण्याकरिता पालघरला पसंती देतात.
विरार आणि पालघर यांच्यामध्ये पालघरला झुकते माप मिळते, कारण या तुलनेत अधिक विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेला आणि तुलनेत अधिक विकसित भाग आहे. तुम्हाला बजेटमध्ये दर्जेदार घर हवे असेल तर पालघरशिवाय पर्याय नाही. सध्या, पालघरमध्ये ७,५०० युनिट्सचे ८ निवासी प्रकल्प आहेत. एकूण ४००० युनिट्सपकी अवघी १,९५० युनिट्स विकायची बाकी आहेत, यावरून उपलब्धतेबरोबरच युनिट्स विकले जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे हे दिसून येते. थोडक्यात, घर खरेदीदार पालघरमध्ये आपल्या स्वप्नांचे घर खरेदी करण्यास प्राधान्य देतो हे ठळक होते.
ws05
पायाभूत सुविधा : १ ऑगस्ट, २०१४ला महाराष्ट्र राज्य सरकारने पालघरला महाराष्ट्रातील ३६वा जिल्हा म्हणून अधिकृत मान्यता दिली. जुन्या ठाणे जिल्ह्य़ातून नवा पालघर जिल्हा तयार करण्यात आला. या जिल्ह्य़ामध्ये पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आणि वसई-विरार यांचा समावेश होतो. राज्य सरकारने या नव्या जिल्ह्य़ाला महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनवण्याच्या दृष्टीने या जिल्ह्य़ातील पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता जवळपास ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. सध्या पालघर जिल्ह्य़ातील विकास काय्रे सुरू आहेत. पालघरमध्ये एक महापालिका (वसई-विरार) आणि तीन नगरपालिका (जव्हार, डहाणू आणि पालघर) आहेत.
ws02कनेक्टिव्हिटी : पालघर लोकल ट्रेन्सने मुंबईला जोडले गेलेले आहे. चर्चगेटपासून सुरू होणाऱ्या ट्रेन्स डहाणूपर्यंत धावतात. याखेरीज सर्व ईएमयू (दररोजच्या शटल्स) आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा पालघरला थांबतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनलाही पालघर हा थांबा असावा, असा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. मुंबई-अहमदाबाद (राष्ट्रीय महामार्ग ८) वर दररोज धावणाऱ्या एमएसआरटीसी बस सेवेने मुंबईला पालघरशी जोडलेले आहे. आता पालघर जिल्हा म्हणून घोषित झाल्याने आणि तारापूर अणू प्रकल्प असलेल्या बोईसरचा औद्योगिक शहर म्हणून विकास होत असल्याने पालघर आणि मुंबईतील अजून काही महत्त्वपूर्ण स्थळे यांना जोडणाऱ्या काही ट्रेन्स आणि बस सेवा भविष्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे.
घरांच्या किमती : विरार, डोंबिवली, वसई इ. भागांमधील ४५००-५५०० रुपये प्रति चौ. फूट इतक्या किमतींच्या मानाने पालघरमधील निवासी मालमत्तांची किंमत २२००-३००० प्रति चौ. फूट इतकी आहे. परवडण्यायोग्य दरामध्ये निवासी मालमत्ता उपलब्ध असल्याने येथील मालमत्तांना मोठी मागणी आहे. पालघर आणि बोईसर भागांमध्ये काम करणारे व पालघरमध्ये राहण्यास पसंती देणारे आणि येथे मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेले मुंबईतील गुंतवणूकदार यांची १ बीएचके आणि २ बीएचके घरांना सर्वात जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे.
वाढती मागणी लक्षात घेता अनेक बिल्डर्सनी १ आणि २ बीएचके स्वरूपाची छोटी युनिट्स देणारे प्रकल्प दाखल केले आहेत. त्यामुळे, येत्या काळात मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेमधील पालघरचा भाव वधारेल, यात काही शंकाच नाही.

बजेटमध्ये दर्जेदार घर हवे असेल तर पालघरशिवाय पर्याय नाही. सध्या, पालघरमध्ये ७,५०० युनिट्सचे ८ निवासी प्रकल्प आहेत. एकूण ४००० युनिट्सपकी अवघी १,९५० युनिट्स विकायची बाकी आहेत, यावरून उपलब्धतेबरोबरच युनिट्स विकले जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे हे दिसून येते. थोडक्यात, घर खरेदीदार पालघरमध्ये आपल्या स्वप्नांचे घर खरेदी करण्यास प्राधान्य देतो हे ठळक होते.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’
High Court
घोटाळा हा शब्द सध्या परवलीचा बनला आहे!

लघर मुंबईच्या जवळ वसल्याने गेल्या काही वर्षांमध्ये इथे प्रामुख्याने छोटय़ा आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांची भरभराट झालेली आहे. मुंबई-अहमदाबाद (राष्ट्रीय महामार्ग ८) ने मुंबईला पालघरशी जोडलेले आहे. मुंबईच्या बाहेर वसलेला आणि तुलनेत जवळचा असलेला जिल्हा म्हणून नवे उद्योग, निवासी प्रकल्प आणि विस्तार प्रकल्प यांच्याकरिता हे एक आदर्श ठिकाण आहे.
विवेकानंद बाबू
(लेखक ‘व्हीबीएचसी व्हॅल्यू होम्स’चे विक्री व विपणन विभागाचे अध्यक्ष आहेत.)