अनेक जण आपल्या मनाप्रमाणे घरात फर्निचर, बाजारात आवडलेल्या वस्तूंनी घर सजवतात. पण अशी सजावट आकर्षक दिसत नाही. काही वेळा तर ते हास्यास्पद होतं. हॉलच्या जागेपेक्षा सोफा अथवा इतर फर्निचर बोजड दिसतं. हॉलची जागा अशा बोजड वस्तूंनी भरून जाते. त्यामुळे मोकळी जागाच मिळत नाही. तीच गोष्ट बेडरूमची आणि किचनची.

‘घर दोघांचं असतं, ते दोघांनी सावरायचं असतं, एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं.’ चंद्रशेखर गोखले यांची ही चारोळी खरंच प्रत्येक घरासाठी किती समर्पक आहे ना? प्रत्येकाला एक छोटंसं का होईना पण आपलं हक्काचं घर असावं असं नेहमीच वाटत असतं. पण सध्या जागांचे भाव अगदी गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ईएमआय भरता भरता अक्षरश: नाकी नऊ  येतात.
आपलं घर इतरांपेक्षा आगळंवेगळं दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आपल्याला एका हाती घरातल्या सगळ्याच गोष्टी करणं जमतंच असं नाही. म्हणूनच अंतर्गत सजावट अर्थपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण करण्यासाठी इंटिरियर डिझायनिंग ही महत्त्वाची पायरी आहे.
अनेकांच्या मनात इंटिरिअर डिझायनिंग का करावं, त्याची गरज काय, कुशल इंटिरिअर डिझायनर का किंवा मुळात कसा निवडावा याविषयी एक ना अनेक प्रश्न असतात. आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीला एक सुसूत्रता असावी असं वाटत असेल, तर इंटिरिअर डिझायनिंग हे माहीतगार व्यक्तीकडून करून घेणं नेहमीच फायद्याचं ठरतं.
सगळी कामं वेगवेगळ्या व्यक्तींकडून करून घेण्यापेक्षा तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घ्यावीत. इंटिरिअर डिझायनर हा ग्राहक, कंत्राटदार आणि कामगार यामधील दुवा असतो. आता असा कुशल डिझायनर निवडायचा कसा? इंटिरियर डिझायनरची निवड करताना त्याचा त्या क्षेत्रातील अनुभव विचारात घेणं महत्त्वाचं असतं. त्याने दिलेल्या कोटेशनवरून त्याची पारख न करता त्याच्या कामाची छायाचित्रं पाहून, जमल्यास त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची गुणवत्ता तपासून पाहावी. कारण नवशिके डिझायनर्स कामं मिळवण्यासाठी कायम कमी किमतीचं कोटेशन देतात. पण त्याला भुलून न जाता चांगल्या गोष्टींची पारख असणं जास्त महत्त्वाचं असतं.
घर नियोजनबद्ध पद्धतीने सजवावं. नियोजनबद्ध म्हणजे काय, तर आपल्या गरजा, आवडीनिवडी, माझं घर मला कसं सजलेलं बघायला आवडेल याविषयीच्या कल्पना इत्यादींची अभ्यासपूर्ण मांडणी. आजकाल इंटरनेटच्या अति वापरामुळे अनेक जण गुगलवरून फोटो पाहून तसंच्या तसं घर सजवण्याचा अट्टहास करतात. पण वास्तविक पाहता ते फोटोतलं घर आणि प्रत्यक्षातलं आपलं घर यांच्यात प्रचंड तफावत असते. तरीही आपण ते फोटो डिझायनरला दाखवावेत, जेणेकरून त्या पद्धतीने विचार करून एखादा छानसा सुवर्णमध्य साधता येईल.
अनेक जण आपल्या मनाप्रमाणे घरात फर्निचर, बाजारात आवडलेल्या वस्तूंनी घर सजवतात. पण अशी सजावट आकर्षक दिसत नाही. काही वेळा तर ते हास्यास्पद होतं. हॉलच्या जागेपेक्षा सोफा अथवा इतर फर्निचर बोजड दिसतं. हॉलची जागा अशा बोजड वस्तूंनी भरून जाते. त्यामुळे मोकळी जागाच मिळत नाही. तीच गोष्ट बेडरूमची आणि किचनची. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने विचारपूर्वक, अभ्यासपूर्ण आखणी करून अंतर्गत सजावट करावी.
घराच्या संदर्भात विचार केला तर हल्ली अनेक विकासक घरं बांधताना काही सोयीसुविधा देतात. एक सरधोपट डिझाइन ते करून देतात. पण ते सगळ्यांनाच आवडेल असं नाही. म्हणून असं घर घ्यावं की जिथे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सजावट करायला वाव मिळेल.
इंटिरिअर डिझायनिंगमध्ये महत्त्वाचे दोन भाग आहेत. १ रचना (प्लानिंग), २ सजावट (डिझायनिंग). यातील रचना किंवा प्लानिंग हा भाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. घराच्या सजावटीची रचना करताना खालील गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यात डिझायनिंगसाठीचं बजेट हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा! कारण यावर इंटिरिअर किती दर्जेदार, टिकाऊ, आकर्षक करता येईल, हे ठरत असतं.
घराचं काम सुरू करताना अनेक गोष्टी बघाव्या लागतात. सिव्हिल वर्क करून घ्यायचं आहे का, कुठे खूपच आवश्यक अशी तोडफोड करावी लागणार आहे का, फक्त कारपेंट्री वर्कच करावं लागणार आहे? काम कसंही असो, ते एकाच वेळेस करून घ्यावं. कारण असं केल्यानं कामात एकसूत्रता राहाते. सजावट सौंदर्यपूर्ण व अर्थपूर्ण होऊन पैशाची बचत होते. मुळात म्हणजे तुम्ही त्या घरात राहायला जाण्यापूर्वीच सगळी कामं उरकून घ्यावीत, जेणेकरून आपल्याला राहायला गेल्यावर धूळमातीचा त्रास होणार नाही.
कुशल डिझायनरसुद्धा प्रथम तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घेईल; त्या म्हणजे, तुमच्या गरजा, आवडीनिवडी, रंगसंगती, विशिष्ट काही सोयी (उदा. वयस्कर व्यक्ती घरात असतील अथवा लहान मुले घरात असतील तर त्या प्रकारे फर्निचर करावे लागते). असे केल्याने त्याला रचना व सजावट करणं अधिक सोयीचं होतं. तुमच्या घराच्या  सजावटीला तो अधिक चांगल्या प्रकारे न्याय देऊ  शकतो. डिझायनरबरोबर मीटिंग ठरविण्याआधी घरात आपापसांत चर्चा होणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही डिझायनरशी चर्चेला बसावं. जेणेकरून प्रत्येकाला या कामात सहभागी होता येईल. घरातल्या व्यक्तींनी आधी आपापसांत चर्चा केलेली असल्याने डिझायनरला तुम्ही तुमची मतं, मनातलं घर याविषयीचं चित्र, तुमच्या गरजा या सर्व गोष्टी कमी वेळेत ठळकपणे मांडू शकता. याच वेळी आपल्या बजेटविषयी डिझायनरला पूर्ण कल्पना द्यावी. या वेळी प्रामुख्याने एक मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो की, प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर अनेकदा बजेटच्या बाबतीत कमी-जास्त होत असतं. कारण डिझायनर तुम्हाला एस्टिमेट म्हणजे अंदाजपत्रक देत असतो. डिझायनर याची तुम्हाला आधीच कल्पनाही देतो. त्या वेळी त्याला योग्य ते सहकार्य करणं आवश्यक असतं. कामात अनेक अडचणीसुद्धा येत असतात. अशा वेळी तिथल्या तिथे निर्णय घ्यावे लागतात. त्या अनुषंगाने रचनेमध्ये बदल होतात. अर्थात याची संबंधितांना पूर्ण कल्पना दिली जाते. या सगळ्याचा विचार करून देखणं इंटिरिअर करून घ्यावं.
केतन निमकर -knassociates9@gmail.com
इंटिरियर डिझायनर
शब्दांकन : मानसी आकेरकर

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Mom Finds Three Month Old Baby Rarest Cancer In Eyes By Mobile Flash Light What Are Signs Of Cancer Seen In Eyes Be Alert
मोबाईलचा फ्लॅश वापरून आईने बाळाला झालेला कॅन्सर ओळखला, काय होती लक्षणं, तुम्हीही काय काळजी घ्यावी?
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता