टाइल्स हा गृहसजावटीचा आवश्यक भाग आहे. लिव्हिंग रूममधील फ्लोअरिंग टाइल्सचा रंग आणि प्रकार यामुळे रूप खुलू शकते. किमान जॉइंट्स असलेल्या मोठय़ा टाइल्समुळेही जागा मोठी असल्यासारखे वाटते. तसेच स्वयंपाकघर किंवा बाथरूमचा विचार करता विविध प्रकारच्या, रंगांच्या आणि अगदी म्युरलच्याही टाइल्स उपलब्ध आहेत. यातून त्या खोलीला आपल्याला हवे तसे रूप देता येऊ शकते!
टाइल्सबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे, त्या दीर्घकाळ टिकतात आणि योग्य उत्पादनासह त्या योग्य प्रकारे लावल्या तर जीवनभरही टिकू शकतात. परंतु आपलीच इच्छा-आकांक्षा बदलते आणि काही वर्षांनी त्याच टाइल्स व सजावट बदलावीशी वाटू लागते. तुम्ही घरातील फर्निचर बदलायचे ठरवता आणि घराला दिल्या जाणार असलेल्या नव्या रूपाला टाइल्सची रंगसंगती कदाचित साजेशी ठरणारे नाही. घराचे रूप बदलण्यासाठी रीटायलिंग हा चांगला पर्याय आहे आणि ते कायमस्वरूपी ठेवायला हवे असे नाही, तर टाइल-ऑन-टाइल पर्यायाचा स्वीकार केला तर काही विचकाही होणार नाही.
टायलिंग पद्धत : अनेकदा घरमालकांना टाइल्समध्ये बदल करण्याची इच्छा नसते. याचे कारण म्हणजे, जुन्या टाइल्स तोडून आणि त्या काढून टाकून तसेच नव्या टाइल्स बसवून पारंपरिक पद्धतीने टाइल्स बदलल्या जातात. यामुळे खोलीतील भिंतींना काही प्रमाणात धक्का बसू शकतो आणि रंगावर एक हात मारावा लागू शकतो किंवा वॉलपेपरची गरज भासू शकते. पूर्वी स्लिपेजची शक्यता असल्याने कंत्राटदार टाइल्सवर टाइल्स बसवण्याचा सल्ला देत.
सुलभ पर्याय : रॉफ नॉन-स्किड अ‍ॅडेसिव्ह टाइल-ऑन- टाइल पर्याय अशी अत्याधुनिक उत्पादने अतिशय सुलभ व सुरक्षित आहेत. रॉफ नॉन-स्किड अ‍ॅडेसिव्ह हे ब्लेंडेड पॉलिमर मॉडिफाइड सिमेंट आधारात पावडर टाइल्स अ‍ॅडेसिव्ह आहे आणि त्यामुळे दोन पृष्ठभागांमध्ये वॉटरप्रूफ अडथळा निर्माण होतो आणि त्यामध्ये धरून ठेवण्याचे गुणधर्म लक्षणीय आहेत. त्यामुळे आता तुम्हाला जुन्या टाइल्स काढताना अनेक दिवस मोठा आवाज ऐकण्याची गरज नाही आणि नव्या बसवण्यासाठी बरेच दिवस घरात गैरसोय सोसावी लागणार नाही. टाइल-ऑन-टाइल पद्धतीमध्ये अतिशय कमी वेळ लागतो आणि नक्कीच कमी गोंधळ होतो. टाइल्स चिकटवण्यासाठी चांगल्या उत्पादनांचा उपयोग केल्यास टाइलच्या मेकओव्हरच्या टिकाऊपणाबद्दल काळजी करावी लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला जुनाट किंवा खराब दिसणाऱ्या टाइल्ससोबत जगावे लागणार नाही. जुन्या टाइल्सवर नव्या टाइल्स चिकटवून तुमच्या फ्लोअरचा व भिंतींचा झटपट मेकओव्हर करा.

– मूळ टाइल्सपैकी काही टाइल्स सैल असतील तर त्या पुन्हा बसवून घ्याव्यात व नंतर रीटायलिंग करावे.
– नव्या टाइल्सचे सांधे जुन्या सांध्यांवर असावेत.
– मूळ टाइल्स स्वच्छ असतील, याची खात्री करा आणि एखादी सैल किंवा खराब असेल तर ती काढून टाका.
सरफेस ग्लेझ टाळण्यासाठी मूळ टाइल्स सँडेड कराव्या.
संजय बहादूर