पर्यावरणास अनुकूल निवास म्हणजे इको फ्रेंडली होम. पारंपरिक ऊर्जा साधनाचा अपव्यय हा पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी कारणीभूत असलेली एक बाब आहे. वसुंधरेच्या ऊर्जा साधनांचा अपव्यय वेळीच रोखला नाही तर आपला विनाशकाळच घडवून आणेल.
इको हाऊसची परिभाषा तशी गोडच आहे. आजूबाजूच्या पर्यावरणाच्या स्रोतांची कमीत कमी नासाडी करून बनवलेले निवासस्थान, की जे टिकाऊ, सुखदायी, आरोग्यदायी असेल. पर्यावरणातल्या स्रोतांचाच उपयोग करून देखभालीचा खर्च कमीत कमी असेल. निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे रिसायकलिंग करण्याची क्षमता असेल.
* बांधकामासाठी सामग्री :
वास्तूला दीर्घकालीन भक्कमपणा आणणारी, वास्तूला लवचीकता, सुखदायी वातावरण, धक्केविरहितपणा व ऊर्जा बचतीची क्षमता देणारी असावी. तसेच ती नॉनटॉक्सिक व रिसायकल करता येणारी असावी. डायमेन्शन दगड, रिसायकल केलेले दगड किंवा ब्लॉक्स, मेटल्स, डेब्रिस विटा, सिमेंट, बांबू, थर्ड पार्टी सर्टिफाईड लाकडे इ. या सामग्रीची उदाहरणे आहेत.
* छप्पर :
शक्यतो खूप साधे असावे. सफेद किंवा फिक्क्या रंगाचे वापरले तर घर थंड राहते. देखभालीचा खर्च कमी येतो कारण फिक्क्या किंवा सफेद रंगांमध्ये सूर्य किरणांना परतवून लावण्याची क्षमता सर्वात जादा असते. छप्परांसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे स्लेट टाईल्स, धातूचे पत्रे ज्यामुळे आपल्याला अग्निरोधकता हा महत्त्वाचा गुण मिळवता येतो व पावसाच्या पाण्याचे संकलन करून जमिनीत साठवणे शक्य होते. तसेच काही ठिकाणी जुन्या टायर्सचे रिसायकल केलेले शिट्सही वापरता येतात.
* पडवी :
वास्तूभोवती असणारी पडवी वास्तूमध्ये शिरणाऱ्या उष्णतेचा ९० टक्के प्रभाव कमी करते. यासाठी बांबू, मातीची कौले, पागोळ्या इ. साहित्य वापरले जाते. वातावरण व वास्तू यांच्यामधला दुवाच म्हणा ना पडवी किंवा छपरी. वास्तूला शोभा तर देतेच आणि शीतलताही.
*  सोलार पॅनेल्स :
एकदम साधे तत्त्व वापरून सौर ऊर्जा, विद्युत ऊर्जेत रूपांतरित केली जाते. या रूपांतरणासाठी फक्त छोटय़ा मेकॅनिझमची आवश्यकता असते. सोलार पॅनेल्स घराच्या छतावर फीट केले जातात. जे सौर ऊर्जेचे वीजेत रूपांतरित करतात. ही ऊर्जा कन्ट्रोल डिव्हाईसमध्ये साठवून ठेवतात. तिथून ब्रेकर बॉक्समध्ये नेतात. या बॉक्समधून घरातल्या फ्रिज, एसी, ओव्हन व इतर विद्युत साधनांना पुरवतात.
* खिडक्या :
खिडक्यांना टिंटेड, टोन्ड किंवा परावर्तित काचा जास्त योग्य असतात. डबल काचा असणाऱ्या खिडक्यांमधून थंडी, उष्णता व आवाजदेखील आत बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे घरातल्या ऊर्जेची नासाडी (४०% नी वाचते) व आवाजाचे प्रदूषणसुद्धा!
* स्वयंपाकघरातील उपकरणे :
अ. फ्रिज व फ्रिजर्स – हवा त्याच आकाराचा घ्या. उगाच मोठा नको. निष्कारण विजेचे बिल वाढत जाते. उन्हाची किरणंसद्धा येणार नाही अशी जागा फ्रिजसाठी योग्य आहे. कमीत कमी टॉप व तिन्ही बाजूंना ५ सेंटिमीटरची मोकळी जागा ठेवणे अत्यंत आवश्यक असते. फ्रिज घेताना एनर्जी फाइव्ह स्टार रेटिंगवालाच घ्या. कमीत कमी वेळा उघडा. अन्नपदार्थ बंद डब्यातच ठेवा. कमीत कमी जागेत जास्त स्टोअरेज करण्याचे व्यवस्थापन मनात तयार करा.
ब. दिवे – मुख्यत्वे एलईडीचा वापर जास्त योग्य ठरतो.
क. गॅस शेगडी, ओव्हन –  तुमचे भांडे हे गॅसच्या बर्नरपेक्षा मोठेच असले पाहिजे, म्हणजे उष्णता वाया जाणार नाही. फक्त बेकिंगसाठी ओव्हन आधी गरम करून ठेवण्याची आवश्यकता असते. हायब्रिड सोलर ओव्हन्स, प्रचलित ओव्हनच्या ७५% कमी ऊर्जेत काम करतात. तसेच इंडक्शन गॅस शेगडय़ा ९०% ऊर्जा वाचवतात.
ड. रिसायकिलग व कंपोिस्टग –  रिसायकिलगमुळे प्रदूषण टळते. ग्रीनहाऊस गॅस निर्माण होत नाही. किचनमधले सर्व कचरे, शिल्लक राहिलेले अन्न, भाज्यांचे वेस्ट, फळांच्या साली, बिया इ. सर्वापासून कंपोस्ट खत उत्तम बनते जे बागेसाठी अत्युत्तम मानले जाते.
इ. ग्रीन पॉवर – पारंपरिक ऊर्जा म्हणजे वीज, गॅस, पेट्रोल याला आता अपारंपरिक ऊर्जेने उत्तम पर्याय निर्माण केला आहे. उदा. बायोगॅस, छोटा हायड्रोप्लॅन्ट, पवनचक्की, लॅण्डफील गॅस इ. बाबी ग्रीनपॉवरमध्ये अंतर्भूत होतात. आता ही ऊर्जा चांगला पर्याय ठरू लागली आहे.
ई. जुने फिटआऊटस् – जुने फिटआऊट्स्, फíनचरमधील लाकडे, बाथरूमची उपकरणे, किचनची सिंक इ. चा पुनर्वापर करता येतात. किंवा आपल्या घराच्या नूतनीकरणात सेकंड हॅण्ड वस्तूंचाही वापर फार कलात्मकतेने करता येतो, तोही अत्यंत नगण्य किमतीत.
*  रेन वॉटर हार्वेस्टिंग – पावसाचे वाहून जाणारे पाणी कायमस्वरूपी संवर्धन केले जावे यासाठी खूपच सोप्या पद्धतीचा अवलंब करता येतो. छप्परावरून वाहून जाणारे पाणी छपराला असणाऱ्या पन्हाळीतून पाईपने खाली उतरवले जाते. साध्या २०० लिटरच्या ड्रमने तळाला मोठे पेब्लस नंतर छोटे पेब्लस नंतर जाड वाळू व सर्वात वर बारीक वाळू असे थर वापरून बनवलेल्या फिल्टरमधून ते मोठय़ा टाक्यांमध्ये साठवावे लागते. पुढचा टप्पा म्हणजे बोअरवेलच्या सभोवताली साधारण ५ फूट व्यासाचा १० फूट खोल खड्डा खणतात, त्यात रेडीमेड रिंगवेल्स टाकतात. बोअर वेलच्या पाईपला ड्रिलने छिद्रे पाडतात. त्याला नॉयलॉन जाळी गुंडाळतात व नंतर ही टाकी मोठय़ा टाकीतले पाणी नियंत्रित पद्धतीने सोडून भरलेली ठेवतात. ज्यामुळे बोअरवेल २४ तास आरामात पाणी घेत राहते व तिचा वॉटरटेबल वाढत राहतो. हाच वाढलेला वॉटरटेबल उन्हाळ्यात आपल्याला आपणच पाजलेले पाणी परत देतो. बरेच वेळा बोअरवेलमध्ये डायरेक्ट पाणी टाकण्याची पद्धत आहे, पण त्यामुळे ती बुजायचा जास्त संभव असतो. म्हणून सिंथेक्सच्या मोठय़ा टाक्या वापरणे योग्य ठरते. अशाच प्रकारे हॅण्डपंप किंवा मोठय़ा विहिरी पण चार्ज केल्या जातात.
* सांडपाणी – स्वयंपाकघर, स्नानगृह, वॉशिंग मशीन, वॉश बेसीन इ. ठिकाणहून वाहून जाणाऱ्या पाण्याचे नीट संवर्धन करता येते. हे पाणी गाडय़ा धुणे, टेरेस धुणे व बागेला देणे इ. अनेक उपयुक्त कारणासाठी वापरता येत.
*  कंपोस्ट खत – टपोरी फुले, रसरशीत फळे व चमकदार रंगाच्या पालेभाज्या ज्या बागेत फुलतात, ती आपल्या मनातील बाग असते. थोडेसे लॅण्ड स्केपिंग व थोडेसे नियोजन बस झाले. बागेसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीचा पोत आपल्याच हातात असतो. गरज असते इच्छाशक्तीची. स्वयंपाकघरातून निघणारा ओला कचरा जसे- भाज्याची देठे, फळाच्या साली, शिल्लक राहिलेले अन्न, चहाचा चोथा, झाडाची गळून पडलेला हिरवी पाने असे कितीतरी. अशाचे कंपोस्ट खत फार लवकर बनवता येते. साधारण ३ ७ ३ ७ ३ खड्डा किंवा खोका, तळाला नारळाच्या शेंडय़ा किंवा नसतील तर न्यूजपेपर, थोडीशी तळातून खेळणारी हवा, थोडा ओलावा आणि थोडेसे बायोकल्चर बास हाते. ही पद्धत घराच्या बाल्कनीतही वापरता येते. यामुळे घाण किंवा दरुगध अजिबात येत नाही. दुधाचे विरजण लावले असता छानपकी दही मिळते तसेच बायोकल्चर मस्त खत बनवून देते. ओला स्पंज असावा तेवढी आद्र्रता व उन्हाळ्याचे टेंपरेचर असते तेवढी उष्णता (४० degree c) ) या दोन गोष्टी उत्तम खत देण्यास समर्थ असतात.
* अग्निरोधक झाडे – जी झाडे खूप ओलावा धरून ठेवतात, शिवाय क्षारांचे प्रमाण ज्याच्यात जास्त आहे व जे चटकन पेट घेतात असे पदार्थ म्हणजे होलॅटाईल अईल्स ज्यांच्या पानांत अजिबात नसते. अशी झाडे वास्तूलगत लावल्याने आपल्या वास्तूला अग्नीपासून संरक्षित कवच प्राप्त होते. या झाडांना नियमित पाणी दिले पाहिजे. ही झाडे निवडताना सौंदर्यदृष्टी अगदी बाजूलाच ठेवली पाहिजे असेही नाही. फक्त ज्वलनशील पदार्थ साठवणारी झाडे म्हणजे कॅम्फर ऑईल वॅक्स इ. पदार्थ असणारी झाडे निवडू नयेत. लॉनदेखील अग्नीविरोधाची भूमिका बजावत असते.
* किचन, गार्डन किंवा ऑरगॅनिक गार्डन- लॅण्डस्केपिंग, पाणी, वारा या प्रकारांची झाडांच्या जीवन शैलीनुसार माहिती जाणून घेऊन तशी झाडांना उपलब्धता करून देणं, म्हणजेच कोणती झाडे कोठे लावावीत याचा शास्त्रशुद्ध विचार करणे. कोणाला प्रखर ऊन नको असते तर कोणाला अतिपाणी नको असते. तर कोणाला विशिष्ट झाडासोबतच बहरायला आवडते ते लक्षात घेतले पाहिजे. शिवाय सकस बियाणे, खते, किटकनाशके (शक्यतो नसíगकच) काळजीपूर्वक निवडले तर ५०% काम सोपे होते. कोथिंबीर, पुदिना, लेमनगास,कढीपत्ता, पालक, आंबट चुका माठ, मुळा, सिमला मिर्ची, वाटाणे, भेंडी, वांगी, कारली, काकडी, भोपळा, दोडकी एक ना दोन कितीतरी गुणी भाज्या चटकन रुजतात अन् आपल्या स्वयंपाकाला स्वादिष्ट व आरोग्यवर्धक बनवतात. याशिवाय रेनवॉटर गार्डन्स्, व्हर्टिकल गार्डन्स, टेरेस गार्डन्स, बाल्कनी गार्डन्स म्हणजे वास्तूचे हिऱ्यामोत्यांचे अलंकारच मानले जातात.
* रिसायकलिंग – आपल्या वास्तूमधून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत राहतो.
अ. काच – बशा, मग, बल्ब, बाटल्या एक ना दोन कित्येक फुटत असतात.
ब. मेटल्स – अॅल्युमिनीअमचे कॅन्स, फुटकी भांडी, इलेक्ट्रिक वायर्स व एसीचे निरुपयोगी पाईप यातले तांबे शिवाय लोखंडासारखे धातू, खिळे.
क. प्लॅस्टिक – रोजच घरात या ना त्या निमित्ताने येणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, कॅरीबॅग, तेला तुपाचे तुटके डबे असे कितीतरी.
ड. कागद – न्युजपेपर, खोकी, पॅकिंग पेपर,
क्राफ्टपेपर इ.
इ. जैविक कचरा – स्वयंपाकघरातून निर्माण होणारा सर्व कचरा एकत्र न साठवता वेगवेगळ्या ठिकाणी साठवावा म्हणजे रिसायकलिंग सोपे होते; जेणेकरून टाकाऊतून उपयुक्त पदार्थ तर बनतील, पण ऊर्जा निर्माण करता येते. हवेचे प्रदूषण टळते म्हणून स्वयंपाकघर, गॅरेज आणि परसात वेगवेगळी कचरा कुंडी आवश्यक असते.
इको हाऊस बांधताना पर्यावरणाचा तोल सांभाळून ते अगदी जादूई, रोमँटिक इनोव्हेटिव्ह बनवता येतं हे मात्र विसरू नका.
* इको हाऊसचे टेरेस – चक्क उघडय़ा आकाशाखाली चंद्र चांदण्याच्या रोमँटिक प्रकाशाची मजा घेता येतेच किंवा पावसाळ्यात रिमझिमणाऱ्या पावसाची. स्वप्नातल्या कल्पना आपण प्रत्यक्षात आणू शकतो. टेरेसवर चहूबाजूंनी काचेच्या िभती आणि छप्पर अन् आत मखमली बेड. अशा अनोख्या कल्पनांची लज्जत इको हाऊसच्या टेरेसवरच घेता येते. सिमेंट कॉँक्रीटच्या जंगलातल्या बिल्डिंगच्या टेरेसवर नव्हे.
* इको हाऊसचे पॉन्ड – फार्म हाऊसच्या पडवीतसुद्धा छान रोमँटिक बेडरूम सेट करता येते. अगदी वृक्षवल्लरीच्याच िभती तयार करता येतात. फक्त आवश्यकता असते तुमच्या रसिकतेची.
* इको हाऊसच किचन – तेही असंच रसिकतेने सजवता येतं. म्हटलं तर घरात, म्हटलं तर वनात. काचा वापरून निसर्गाशी जवळीक साधता येते. चक्क सरकत्या भिंती वापरून अख्खे इको हाऊस आजूबाजूच्या निसर्गाशी थेट मैत्री करता येते.  
अशा सर्वगुणसंपन्न इको हाऊसचे करावे तितके कौतुक थोडेसे. नेहमीच्या काँक्रीट जंगलापासून दूरवर निसर्गाच्या जवळ असलेले हे इको हाऊस बांधणे ही बहुतेक सर्वाच्या मनातली एक छुपी इच्छा नक्कीच असेल. या इको हाऊसमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक गोष्टींची अगदी योग्य पद्धतीने मांडणी करणारा आíकटेक्ट अतिशय महत्त्वाचा ठरतो
आर्किटेक्ट

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती