पूर्वीच्या काळी घर, इमारत अथवा उद्यानांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक पद्धतींनी कुंपणे तयार केली जात होती. चिरेबंदी वाडा असो, चक्रवर्ती सम्राज्याचा राजवाडा असो; कुंपणांनी मूळ वास्तूची सुंदरता आणि सुरक्षितता वाढविणे  हा उद्देश त्यातून लक्षात येतो.
प्राचीन काळापासून आतापर्यंतच्या कुंपणांचा इतिहास पाहिला, तर झोपडीपासून राजवाडय़ापर्यंत किती विविधता होती, हे दिसून येते. जमिनीची सीमा किंवा हद्द दाखविण्यासाठी, ती बंदिस्त करण्यासाठी, बाहेरची जनावरे आत येऊ नयेत अथवा आतील गुरेढोरे बाहेर जाऊ नयेत म्हणून विविध प्रकारची कुंपणे उभारली जातात.
घर, इमारत अथवा उद्यानांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक पद्धतींनी कुंपणे तयार केली जात होती. चिरेबंदी वाडा असो, चक्रवर्ती सम्राज्याचा राजवाडा असो. कुंपणांनी मूळ वास्तूची सुंदरता आणि सुरक्षितता वाढविणे हा उद्देश लक्षात येतो. शेत, मळे, राने, वने यांनाही कुंपणे होती. आताही असतात. गुरांची पैदास करणाऱ्या काही देशांत कुंपण घालण्यासंबंधी कायदे करण्यात आलेले आहेत.
कुंपणाकरिता पूर्वीची सामग्री पाहिली तर काय दिसते? गरिबाच्या झोपडीला बाभळीसारख्या झाडाच्या काटेरी फांद्या लावून सभोवार अंगण सुरक्षित ठेवले जात असे. तुळशी वृंदावन, एखाद्या झाडाला झोका, शेणाने सारवलेल्या अंगणातील रांगोळी दिसत असे. अजूनही गरिबांच्या वस्तीत किंवा पाडय़ांमध्ये हे चित्र दिसून येते.
तांत्रिक विकास हळूहळू होत गेला. सुरुवातीला दगड, काटेरी झुडपे, बांबू वगैरेंसारखे सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा उपयोग कुंपणासाठी केला जाऊ लागल्यावर पुढील काळात अधिक वैविध्य आले.
लोखंडाची विपुलता वाढत गेल्यावर तारा लावलेल्या दिसू लागल्या. सिमेंटचा शोध लागल्यावर काँक्रीटच्या आकर्षक जाळ्या, काँक्रीटचे खांब दिसू लागले.
एकोणिसाव्या शतकात कुंपणासाठी लोखंडी तारांचा वापर सुरू झाला. काटेरी तार इसवी सन १८६०च्या सुमारास आणि विणलेली तार १८८३ च्या आसपास प्रचारात आली. झाडाच्या, त्यातल्या त्यात काटेरी झाडाच्या फांद्या जमिनीत खोवून लावताना त्यांचा विस्तार एकमेकांत गुंतवून कुंपण तयार करण्यात येऊ लागले. अर्थात हे फारसे टिकाऊ नव्हते.
कायम स्वरूपाचे टिकाऊ कुंपण तीन प्रकारांनी अस्तित्वात आले, ते असे-
१)    काटेरी किंवा दाट झुडपांची वई (कुंपण).
२)    लाकडी, काँक्रीटचे किंवा लोखंडी खांब एक ते दोन मीटपर्यंत समान अंतरावर रोवून त्यांच्या दरम्यान गज, पट्टय़ा, पत्रे, तारा अथवा जाळ्या भरून ‘कुंपण’ केले जाऊ लागले.
३)    गडगा किंवा दगड, विटा किंवा काँक्रीटच्या वाडेभिंती बांधलेल्या दिसू लागल्या. काही ठिकाणी एकाच प्रकारच्या कुंपणात यांपैकी एकापेक्षा अधिक प्रकार वापरूनही विविधता आणलेली दिसून येते.
वई
झुडपांची ‘वई’ काढून कायमचे कुंपण म्हणून पूर्णपणे उपयुक्त होण्यास वर्षां-दोन वर्षांचा कालावधी लागतो. वईकरिता निवडुंग, घायपात, चिल्हार यांसारख्या काटेरी वनस्पतींचा किंवा मेंदी, डिडोनिया कोयनेल अशा प्रकारच्या दाट झुडपांचा उपयोग करतात. याशिवाय प्रिव्हेट, लोकस्ट, ऑसेज, ऑरेंज, बकथॉर्न यांसारख्या पानझडी वनस्पतींचा आणि आर्बर व्हिटी, ज्यूनिपर, बॉक्स, हेमलॉक, स्प्रूस अशा सदापर्णी वृक्षांचाही वापर देशात, विदेशांत केला जातो.
कुडण
वन्यपशूंपासून आणि लष्करी साधनसामग्री यांच्या संरक्षणासाठी ‘कुडण’ उभारतात. त्याची उंची सुमारे १ ते १.५ मीटर ठेवतात. यासाठी लाकडी खांब वापरतात; परंतु खांबांचा जमिनीखालचा भाग कुजतो. थोडय़ाच वर्षांत ते निरुपयोगी होतात. त्यापेक्षा लोखंडी खांब अधिक टिकाऊ आणि भक्कम असतात. आगीची भीती नसते. लोखंड गंजू नये म्हणून वेळोवेळी रक्षक रंग लावतात.
सध्या सर्वत्र काँक्रीटचे खांब दिसतात. ते जमिनीत सुमारे अर्धा मीटर रोवतात. जमिनीतील भागास डांबर लावून लाकडी खांब रोवल्यास कुजण्याला प्रतिरोध होतो, म्हणून १. पेंटा क्लोरोनिनॉल, २. मोरचूद, ३. सोडियम आर्सेनेट ही आणि अशी रसायने लावतात. लोखंडी खांब काटकोनी छेदाचे असल्यास अतिमजबूत असतात. लोखंडी सळ्या घालून अधिक सामथ्र्यवान करतात. बहुतेक खांब हे निमुळते असल्यास अधिक सुंदर आणि दीर्घकाळ टिकतात. त्या खांबांना काटेरी तारा लावतात किंवा मजबूत शिगा/ सळ्यांची नक्षीदार जाळी करून बसवतात. तारा लावल्यास त्या कमी-जास्त पिळाच्या असतात. खांबांना मळसूत्री आकडे लावून तारा ताणून घेतात. अधिक आकर्षकता आणण्यासाठी गुणाकार चिन्हाप्रमाणे तारा लावल्या जातात.
वाडेभिंती
दगड-विटांच्या किंवा काँक्रीटच्या समान जाडीच्या वाडेभिंती बांधल्या जातात, त्या बहुतेक टुमदार बंगल्यास किंवा आलिशान हवेलीच्या बांधलेल्या दिसतात. दुसरा प्रकार असा असतो की, समान अंतरावर जाड खांब दगड-विटांचे बांधून दोन खांबांमधील अंतर कमी जाडीच्या जाळीने किंवा भिंतीने बांधतात. प्रत्येक खांबावर काही जण फुटबॉलप्रमाणे दुधी विद्युत दिवे लावून आत-बाहेर प्रकाशाची योजना करतात, तर काही कुंपणांच्या केवळ फाटकावर दोन दिवे (डावे-उजवे) लावतात. हे सगळे करताना वाडेभिंतीवर एक रुंद पट्टी सपाट, अर्धवर्तुळाकार किंवा त्रिकोणी वरच्या भागावर करून त्यावर काचेचे धारदार तुकडे लावून सुरक्षितता वाढवतात.
विद्युत-कुंपण
कुंपणाच्या लोखंडी तारांना विद्युतभारित केल्याने सुरक्षितता अधिक वाढते. अशा ठिकाणी खूप खबरदारी घ्यावी लागते. विद्युतप्रवाह जमिनीत जाऊन बागेतील झाडांना पाणी शिंपताना ‘शॉक’ लागणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. सध्या दरोडेखोरांची भीती खूपच वाढल्याने अशी कुंपणे काही थोरामोठय़ांना अपेक्षित असली तरी त्याबरोबरच धोक्याची सूचना देणारी विद्युतयंत्रणा जोडल्यास योग्य ठरते. याबाबतीत संबंधित सल्लागारांचा सल्ला घेऊन ही कुंपण रचना केली जाते. शिवाय विद्युतप्रवाह दिवसभर हवा आहे की, फक्त रात्रभर हवा आहे, हेही निश्चित करावे लागते. विजेच्या बिलात वाढ होते, तो खर्चही आधीच गृहीत धरावा लागतो.
कवाडे
कुंपणास फाटक असतेच. लाकडी, लोखंडी किंवा बांबूंचे. फाटक म्हणजे कुंपणातून गाडी आत जाऊ शकेल असे मोठे दरवाजे. त्याला लागूनच माणसे ये-जा करू शकतील अशा छोटय़ा दरवाजाला म्हणतात- कवाड! कुंपणाशी सुसंगत अशी त्याची उंची आणि नक्षी असल्यास घराचे सौंदर्य दुरूनच नजरेत भरते.
कुडणातील कवाडाकरिता दोन स्वतंत्र खांब बसवतात. त्यापैकी एकास बिजागरीचा आणि दुसऱ्यास कडीकोयंडय़ाचा खांब म्हणतात. बिजागरीचा खांब अधिक मजबूत असावा लागतो. लाकडी कवाडाच्या झडपांचे सांधे कवाडाच्या वजनाने ढिले होऊन ओळंबा सोडतात. लोखंडी झडपांचे सांधे वितळजोडीने (वेलडिंगने) केलेले असतात, ते भक्कम राहतात. अधिक वजनदार कवाडांना चाकांचा आधार देतात. चाके सहजपणे उघडझाप होण्यासाठी/ फिरण्यासाठी जमिनीवर काँक्रीटमध्ये सपाट पट्टी गोलाकार बसवितात.
ओळंबा सोडून बसविलेले फाटक आपल्या वजनाने आपोआप बंद होऊ शकते. आधुनिक जगात विद्युत कळ दाबून स्वयंचलित फाटक/ कवाडे लावलेली दिसू लागली आहेत. पुढील काळात आणखी शोध लागतील. कुंपणे आणि कवाडांची रचना बदलतील.

Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?