ही वास्तू या साहित्यिकांच्या जन्माने पावन झालेल्या असतात, तर काही त्यांच्या मृत्यूने. जरी त्या वास्तूत त्यांचा निवास अल्पकाळ असला तरी त्या इतिहासात नोंदल्या जातात. अशीच एक वास्तू म्हणजे भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचे ‘सावनेर’ येथील घर.
नागपूरपासून ४५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावनेर येथील राज्य महामार्गावर नगर परिषदेसमोर एक जुनी वास्तू आहे, ती म्हणजे सावनेर येथील ‘गडकरी वाडा’. राम गणेश गडकरी यांचे मोठे बंधू विनायक गणेश गडकरी यांचे हे निवासस्थान. ते सावनेर येथील न्यायालयात वकिली करत असत. त्यामुळे या वास्तूला ‘गडकरी वकिलांचे घर’ असेही ओळखले जाई. साधारण दुमजली असलेल्या या वास्तूची रचना तशी जुनी आहे.
सुरुवातीस आत प्रवेश करताना जाळीचे दार असून आत गेल्यावर प्रथम जोता लागतो. हा पूर्वी बैठकीचा दिवाणखाना होता. या ठिकाणी भिंतीत एकूण तीन कपाटे आहेत. या ठिकाणी डाव्या बाजूस माडीवर जाण्यासाठी दगडी जिना आहे. दिवाणखान्यात उजव्या बाजूस पूर्वी खिडकी होती. त्या जागी आता राम गणेश गडकरी यांची मोठी तसबीर आपल्या दृष्टीस पडते. दिवाणखान्याच्या पुढे गेल्यावर एक खोली लागते; पण या दोघांच्या मध्ये उजव्या बाजूला मोठय़ा पायऱ्यांचा लाकडी जिना लागतो. हा जिना त्या खोलीच्या वरील खोलीत जातो. या जिन्याच्या समोर व दिवाणखान्याच्या व खोलीच्या डाव्या बाजूला सामान ठेवण्यासाठी दोन कप्पे आहेत. ही खोली म्हणजे पूर्वीचे माजघर. याच्या उजव्या बाजूस एक खिडकी आहे. तसेच खोलीत पाळणा अडकविण्यासाठी कडय़ा आहेत. माजघराच्या डाव्या बाजूला एक लहान खोली असून त्यात पूर्वी देवघर होते. याच खोलीत गडकरी यांचे निधन झाले. त्या समोरील खोलीत गडकऱ्यांच्या मातोश्री सरस्वतीबाई, गडकऱ्यांच्या पत्नी रमाबाई व लेखनिक पांडुरंग बापट रहात होते. वरच्या मजल्यावर गडकऱ्यांचे मोठे बंधू विनायकराव, त्यांच्या पत्नी व त्यांची चार मुले यांचे वास्तव्य होते. याच ठिकाणी गडकरी यांनी त्यांच्या ‘भावबंधन’ या नाटकाचा शेवटचा अंक पांडुरंग बापट या साहाय्यकाच्या मदतीने लिहून नाटक पूर्ण केले.
माजघरातून पुढे गेल्यावर स्वयंपाकघर लागते. येथे भिंतीत दोन कपाटे असून डावीकडे लहान जिना आहे. हा जिना स्वयंपाकघराच्या वरील खोलीत जातो. असे या वास्तूत एकूण तीन जिने असून ते त्या त्या खोलीत जातात. घराच्या मागच्या बाजूस पूर्वी फुलझाडे होती. मागील बाजूस मोठे अंगण व विहीर आहे.
दिवाणखान्याच्या वरील मजल्यावर उजवीकडे दोन देवळ्या व एक कोनाडा व भिंतीत कपाटे आहेत. तेथे तीन मोठय़ा खिडक्या.. त्या उघडल्यावर लहान, पण लांब बाल्कनी आहे. बाल्कनीत उभे राहिल्यावर समोर नगर परिषद दिसते.
माजघराच्या वरील खोलीत भिंतीत कपाटे, देवळ्या व कोनाडेही आहेत. याच खोलीत भिंतीत कपाटासारखी दिसणारी, पण आतील बाजूस पाच फूट खोल अशी कपाटे आहेत. या ठिकाणी पूर्वी महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान ऐवज अशा वस्तू ठेवत असत. तेथे दोन्ही बाजूंच्या जाळीच्या खिडक्या आहेत.
या खोलीच्या वर जाण्यासाठी भिंत व खोली याच्या मध्ये लाकडी जिना असून तो वर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जातो. या खोलीत दोन्ही बाजूला बैठी खिडकी असून ती जाळीची आहे. खोलीच्या मागील बाजूस व पुढील बाजूस लांब कोठीघर आहे. पूर्वी तेथे धान्य ठेवत असत. या घरात गडकरी यांचे मोठे बंधू विनायक यांच्या पत्नी, त्यांची चार मुले यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते.
२ जानेवारी १९१९ रोजी राम गणेश गडकरी, त्यांच्या पत्नी रमाबाई व गडकरींच्या मातोश्री सरस्वतीबाई या वास्तूत राहावयास आले. गडकरी यांची प्रकृती येथे सुधारेल म्हणून त्यांचे भाऊ विनायक यांनी त्यांना बोलावले; पण गडकरी यांची प्रकृती सुधारली नाही. या वास्तूत गडकऱ्यांचे २१ दिवस वास्तव्य होते. ३ जानेवारी १९१९ रोजी गडकऱ्यांचे निधन झाले.
सध्या ही वास्तू पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून ते राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आहे. या स्मारकात सर्व खोल्यांत गडकऱ्यांचे अनेक दुर्मीळ फोटो, त्यांच्या नाटकांतील प्रसंगांचे फोटो, तसेच काही प्रसिद्ध नाटककारांचे फोटो येथे लावले आहेत. या वास्तूत असलेली जुनी कागदपत्रे, गडकऱ्यांची अनेक पत्रे सध्या नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाकडे आहेत.
राम गणेश गडकरी यांच्या इच्छेप्रमाणे नवसारीतील गणदेवी येथील जन्मस्थानाची थोडी माती त्यांच्या दहनस्थळी चिंतामणराव कोल्हटकरांनी विसर्जित केली. त्यामुळे जन्म आणि मृत्यूचे शाश्वत नाते गडकऱ्यांनी सावनेरला जोडले. गडकऱ्यांचा जीवनप्रवास जर आपण पाहिला, तर तो गुजरातमधील नवसारीतील गणदेवी, कर्जतमधील सांगवी-कोंदीवडे, पुणे व नागपूर येथील सावनेर असा आहे.
अशा या सरस्वतीच्या दरबारातील प्रतिभासम्राटाच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूचे दर्शन एकदा तरी घ्यावेच. ल्ल ल्ल
ंेी८ंॠ४स्र्३ी66@८ंँ.ूे

caribbean writer maryse conde profile author maryse conde information zws
व्यक्तिवेध : मारिस कॉण्डे
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!