वर्षभर मालमत्ता बाजारपेठेने खूप चढ-उतार पाहिले. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने या बाजारपेठेला उभारी आल्याचे चित्र आहे.

भा रतात सणांचे महत्त्व खूप आहे. दसरा आणि नवरात्रोत्सव संपल्यावर आता लोक उत्साहाने दिवाळीच्या सणाच्या प्रतीक्षेत आहेत. हा दिव्यांचा सण अनेकांसाठी नवीन घरात गुंतवणूक करण्यासाठी सर्वाधिक उत्तम काळ मानला जातो; आणि तसाच तो विकासकांसाठीही एक आशेचा किरण ठरतो.
दिवाळीच्या निमित्ताने मालमत्ता बाजारपेठेच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या सणामुळे बाजारपेठेतील मंदीची लाट कमी होईल आणि विक्रीत वाढ होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. या काळात बाजारपेठेत सामान्यत: नवीन घरांच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.
दिवाळी हा एक असा सण आहे, ज्या वेळी अनेक विकासक आपले अनेक गृह प्रकल्प बाजारात आणतात. आणि दिवाळीच्या सणाची संधी साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्तमोत्तम सवलती देतात. सणांच्या पाश्र्वभूमीवर ‘रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया’ने व्याजदर कपात करण्याचा निर्णय आधीच घेतल्याने विकासक आणि ग्राहक घर विक्री व खरेदी करण्यात उत्सुक आहेत. परिणामी विकासक आणि खरेदीदार या दोघांसाठीही एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे.
या दिवाळीत घरांच्या विक्रीचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा केली जात आहे. मालमत्ता बाजारपेठेत एक प्रकारचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मध्यम किमतीच्या घरांमध्ये नवीन गृह प्रकल्पांमध्ये ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे चित्र आहे. भविष्यात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रातील सरकारही कररचना सुलभ करण्यावर वचनबद्ध असल्याचे दिसत आहे. टप्प्यांतील जबाबदारी आणि पारदर्शकता यांच्यामुळे या उद्योगासाठी (मालमत्ता बाजारपेठ) एक चांगली आशा आहे.
आयबीईएफच्या मते, भारतीय मालमत्ता उद्योग हा सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपकी एक झाला असून, २०२० सालापर्यंत १८० बिलियन अमेरिकन डॉलर्स सीएजीआर (कॉमन अ‍ॅन्युअल ग्रोथ रेट) ११.२ टक्के राहील, अशी अपेक्षा आहे.

लेखक ‘व्हीबीएचसी व्हॅल्यू होम्स’चे विक्री आणि मार्केटिंग विभागाचे अध्यक्ष आहेत.