एखाद्या वास्तूमधील दरवाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फार प्राचीन काळी मानव गुहेत राहत असे. त्या गुहेत केव्हाही हिंस्र पशू घुसून आपणास मारण्याची चिंता त्याला लागलेली असायची. शिवाय ऊन, वारा, पाऊस व हिमवृष्टी या नैसर्गिक संकटापासूनसुद्धा त्यास संरक्षण हवे होते. त्याकरिता मानवाच्या कल्पक डोक्यात दरवाजाचा शोध लागला असावा. शिवाय, दरवाजा हा घराच्या सजावटीतला एक महत्त्वाचा असा भाग आहे. घराच्या सौंदर्यात दरवाजामुळे एक प्रकारचे पूर्णत्व येते.     वास्तुकलेप्रमाणे दरवाजा हा एका चौकडीत, एखाद्या खोलीला किंवा घर अथवा इतर प्रवेश जागेत उघडू किंवा बंद करू शकतो. जेव्हा दरवाजा उघडा असतो त्या वेळेस बाहेरील हवा, प्रकाश आणि आवाज आत प्रवेश करतात. फार पूर्वी काही दरवाजांना तो उघडू नये म्हणून त्याच्या मागे अडसर लावीत असत. प्राचीन काळी आदिवासी लोक झाडाच्या काठय़ा, चामडे, किंवा चटईचा वगरे पडद्याचे दार म्हणून उपयोग करीत. गरज संपल्यावर चटई गुंडाळून ठेवत असत. दरवजात लटकणाऱ्या चटईवर नक्षीकाम केले जाई. पुढे दरवाजा बंद करण्यासाठी अडसर व साखळीचा उपयोग होऊ लागला.
नंतर गरजेनुसार दरवाजाचे विविध उपयुक्त प्रकार बनविण्यात येऊ लागले. पूर्वी किल्ल्यांची प्रवेशद्वारं मजबूत अशा सागवानी लाकडापासून बनवीत असत. हत्तीसारख्या बलाढय़ प्राण्याने मुसंडी मारूनसुद्धा तुटू नये म्हणून त्यास लोखंडी अणकुचीदार बळकट खिळे लावीत असत. असा हा प्रचंड दरवाजा शत्रुसन्य आले असता, बंद करण्यास एका माणसाने नुसती कळ दाबली असता बंद करता येत असे. परंतु तो जर उघडावयाचा असल्यास दोन बाजूला एक-एक हत्तीच्या सहाय्याने उघडला जाई. असे प्रचंड व भक्कम दरवाजे मोंगल व शिवाजीच्या काळात किल्ल्यांना व तटबंदींना बांधण्यात आलेले होते. किल्ल्याच्या भव्य प्रवेश दरवाजास आणीबाणीच्या वेळी उपयुक्त असा लहानसा दिंडी दरवाजाही असे. त्याचा उपयोग फक्त माणसांना  येण्या-जाण्यासाठी करीत असत.
अकबर बादशहाने गुजराथच्या विजयाप्रीत्यर्थ जगातील भव्य असा ५३.६३ मीटर उंच आणि ३५ मीटर रुंद  दरवाजा  फत्तेपूर सिक्री  येथे इ. स. १५६९ ला बांधला. त्या सबंध दरवाजाला घोडय़ाचे नाल शुभचिन्ह म्हणून बसविले होते. त्या प्रचंड दरवाजास horse shoe gatel म्हणूनही संबोधित असत. हिंदू आणि फारसी स्थापत्यकलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. बंगाल मध्ये १८३७ साली नबाब हुमायून झा बहादूरच्या काळात हजारद्वारी नावाचा एक हजार दरवाजे असलेला महाल, बंगालमधील मुíशदाबाद येथे भागीरथी नदी काठी बांधण्यात आला होता, त्यातील नऊशे दरवाजे खरे व शंभर दरवाजे खोटे होते. हे शत्रुसन्यापासून संरक्षण करण्यासाठी होते. मुंबई बंदरात, इंदिरा गोदीत, समुद्रामधून हजारो टन मालाच्या भरलेल्या मोठमोठय़ा परदेशी बोटी माल उतरविण्यासाठी व भरण्यासाठी लॉक गेट येथे येतात. त्या पाण्यातून आत शेडमध्ये व बाहेर जाण्याच्या मार्गावर पाणी अडवून, उघड-बंद करण्याच्या ठिकाणी भव्य यांत्रिक दरवाजे बसविले आहेत. त्यामुळे आतील पाणी समपातळीत स्थिर राहून बोटीची ये-जा सुरळीत चालू राहते. शिवाय त्या कालव्याच्या किनाऱ्यावर उघडझाप करणारा जपानी कंपनीचा यांत्रिक पूल (दरवाजा) बसविला असून त्यावरून भरलेले मालवाहू ट्रक ये-जा करीत आसतात.  
दरवाजाचे स्वरूप हे निरनिराळ्या उपयोगावर अवलंबून असते. दगडविटांपासून बांधलेले बुलंद किल्ल्याचे प्रवेशद्वार फार रुंद व उंच असून, बलाढय़ शत्रुसन्यांपासून संरक्षण करण्यासाठी प्रचंड शक्तिशाली महाद्वार बांधत असत. त्या काळी असेच एक भव्य प्रवेशद्वार हैद्राबाद येथील गोवळकोंडा किल्ल्याला बांधले होते. ते हत्तींकरवी उघडले जाऊ नये याकरिता त्या दरवाजासमोर काही अंतरावर गोलाकार िभत बांधण्यात आली आहे. जेणेकरून हत्तीस मागे सरून पुढे दरवाजास जोरदार मुसंडी मारता येऊ नये, अशी योजना केली होती. त्याचप्रमाणे मोठमोठे वैभवशाली राजवाडे, चर्च, मंदिरे आणि आलिशान बंगले यासाठी  देखणे व आकर्षक असे विविध प्रकारचे दरवाजे लावीत. त्यामुळे त्या इमारतींची भव्यता व सौंदर्य यात अधिक भर पडत असे. िहदूंच्या काही मंदिरांतील सभागृहातून, गाभाऱ्यात प्रवेश करणारा दरवाजा लहान ठेवीत असत, जेणेकरून माणसे नम्र होऊन देवालयात प्रवेश करतील.
मुस्लिम देशात दरवाजाला फार मोठे महत्त्व असते. बुऱ्हानपूरला फारुकी शासन काळात अनेक इमारती आणि मशिदी  बांधल्या  गेल्या होत्या. त्यातील सर्व श्रेष्ठ व सुंदर इमारत म्हणजे शाही जामा मशीद होय.  इ. स. १८६५ (हिजरी) मध्ये भोपाळमध्ये राहात असलेली, हुशार व कर्तबगार, बेगम सिकंदर जहां साहिबा एकदा हजसाठी मुंबईला चालली होती. परंतु वाटेत बुऱ्हाणपूर येथे थोडे दिवस थांबली. त्या वेळी तिने पाहिले की मशिदीचे  प्रवेशद्वार १२ फूट उंच होते. तिने तो दरवाजा मशिदीला योग्य नसल्याचे पाहून २५ फूट उंच व ३४ फूट रुंद दरवाजा बनविला व त्याच्या छतावर सुंदर वेलबुट्टी व नक्षीकाम  केले. असे हे दरवाजावरील आकर्षण व विलक्षण प्रेम दिसून येते. पसे व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ नये म्हणून लोक घरांना बळकट दरवाजा लावून टिकाऊ कुलूप लावतात. इतके असूनही  शनिशिंगणापूर हे महाराष्ट्रातील असे एक गाव आहे की, ज्या ठिकाणी घराला दरवाजाची सोय ठेवीत नाहीत.  सिरिया, पॅलेस्टाइन, मेसोपोटोमिया त्याचप्रमाणे भारतात लाकडाच्या दरवाजावर धातूचा पत्रा लावण्याचा परिपाठ आहे. लाकडी दरवाजे शक्तिशाली करण्यासाठी त्याच्यावर लोखंड, कांसे किंवा पितळेच्या पट्टय़ा लावत असत. काही वर्षांपूर्वी लेबर ऑफिसर, कॉलेज प्रिन्सिपॉल व कंपनी मॅनेजर यांच्या ऑफिस रूमला आत-बाहेर हलणारा बिजागरी छोटा दरवाजा लावीत असत. त्यामुळे त्यास विशिष्ट महत्त्व व थोरपणा प्राप्त होत असे ते त्या दरवाजामुळेच.
आधुनिक युगात विविधता आणि नावीन्य आले. ’‘  look good on the outside, and feel good on inside प्रमाणे प्रवेशद्वार, ढकलून उघडणारे दरवाजे, फायबर ग्लास एंट्री दरवाजे ज्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ये-जा असते उदा. बिग बझार, पंचतारांकित हॉटेल, अशा ठिकाणी आकर्षणाकरिता Motion sensing sliding door बसविण्यात  आले. क्लासिक क्राफ्ट, स्टील, घडीचे सरकते दरवाजे, सोयीनुसार लावण्यात आले. बहुमजली इमारतींना तर आगप्रतिबंधक दरवाजे लावणे सक्तीचे झाले आहे. मंगल प्रसंगी अशा या बहुउपयोगी दरवाजाचे आपण आंब्याचा टाळ व फुलांचे तोरण बांधून, दिवे लावून मनोभावे वंदन करून मान देतो.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?