मित्रांनो, कित्येक वर्षांपासून चित्रपटगृहे (सिनेमा वा थिएटर) हे आपल्या दैनंदिन जीवनातील करमणुकीचे प्रमुख साधन बनले आहे. मध्यंतरी टीव्हीच्या पदार्पणानंतर सिनेमागृहावर थोडा परिणाम झाल्याचे जाणवले. परंतु नंतर मल्टिप्लेक्सच्या आगमनानंतर प्रेक्षक पुनश्च थिएटरकडे वळले आहेत. या प्रेक्षागृहात (Theatres) असलेली वीज संचमांडणी कशी असावी, ज्यामुळे विद्युत सुरक्षा प्राप्त होईल याबाबतची चर्चा आपण आज करणार आहोत.
तांत्रिक बाबींची चर्चा करण्यापूर्वी थिएटर लायसेन्स व इतर Administrative Points  सांगणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कुठल्याही थिएटरला ‘Performance Licence’ ‘ देण्यापूर्वी दोन खात्यांच्या परवानग्या (NOC) आवश्यक असतात. पहिली म्हणजे त्या एरिआचे PWD  चे Civil Executive Engineer जे बांधकामांच्या  Norms प्रमाणे तपासणी करून मग त्यांना प्रमाणपत्र देतात ज्याची एक प्रत पोलीस कमिशनर/जिल्हाधिकारी यांना पाठविली जाते. दुसरी परवानगी असते ती विद्युत निरीक्षकांची. महाराष्ट्र चित्रपटगृहे नियम १९६६ (Maharashtra Cinema Rules 1966) नुसार, वीज  संचमांडणीचे दर वर्षी इन्स्पेक्शन केल्यानंतर ती वरील नियमानुसार सुरक्षित असल्यास त्या Theatre ला विद्युत निरीक्षकाकडून तसे प्रमाणपत्र (NOC) देण्यात येते ज्याची एक प्रत त्या प्रभागाचे पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी यांना देण्यात येते.
वरील दोन (NOC) आल्यानंतर संबंधित पोलीस कमिशनरकडून त्या थिएटरला एका वर्षांसाठीचे लायसेन्स देण्यात येते. कुठलेही चित्रपटगृह सुरू करण्यापूर्वी त्यातील विद्युत संचमांडणीची रचना ज्या प्रकारे केली असते त्याचे नकाशे महाराष्ट्र सिनेमा रुल (एमसीआर) २६ अनुसार, त्या प्रभागाच्या विद्युत निरीक्षकांकडून मंजूर करून घेणे आवश्यक आहे व त्यानंतर एम.सी.आर. २७ नुसार त्यांच्याचकडून निरीक्षण झाल्यावर त्या सिनेमास (NOC) देण्यात येते. एम.सी.आर. २८ ते ३३ मध्ये स्टेज व ऑडिटोरियममध्ये करावयाची वायरिंग, मेन स्विचेस, अर्थिग डिस्ट्रिब्युशन बोर्ड्स इत्यादी कशा प्रकारे उभारावे याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
सिनेमातील दारांवर आतल्या बाजूस एकळ असे लिहिलेले बोर्ड तुम्ही सर्वानी पाहिले असतीलच, त्यातल्या दिव्यांना वीजपुरवठा हा वीज कंपनीचा असतो. तो गेल्यानंतर एका बॅटरीतून त्याला दुसरा वीजपुरवठा दिला जावा असे निर्देश एम.सी.आर. ३४ प्रमाणे देण्यात आले आहेत. एखादा चित्रपट अथवा शो चालू असताना लाइट गेले तर सर्व दारांवरील एकळ लाइट्स हे बॅटरीमुळे प्रकाशमान राहतील व त्यामुळे लोकांना चित्रपटगृहातून बाहेर पडता येईल. मित्रहो, १९८६ मध्ये दिल्ली येथील ‘उपहार’ या सिनेमागृहात या नियमाचा भंग झाल्यामुळे लाइट गेल्यानंतर संपूर्ण अंधार झाल्यामुळे लोकांना बाहेर कुठून पडायचे हे कळले नाही व त्यामुळे शेकडो जीव दुर्दैवाने त्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत बळी पडले.
चित्रपटगृहातील महत्त्वाचे नियम पुढीलप्रमाणे आहेत –
वीजसंच मांडणी
विद्युत अभियंता, महाराष्ट्र शासन यांच्याकडून विद्युतविषयक सर्व कामांकरिता मंजुरी घेणे. विजेचे दिवे किंवा विजेची कोणतीही उपकरणे यांची संच मांडणी करण्यापूर्वी आणि वीजसंच मांडणीमध्ये फेरफार करण्याचे किंवा त्यात भर घालण्याचे काम सुरू करण्यात येण्यापूर्वी लायसन्स देणाऱ्या प्राधिकाऱ्यामार्फत विद्युत अभियंता, महाराष्ट्र शासन यांची मंजुरी मिळविण्यात येईल. आणि या प्रयोजनासाठी दिवे, पंखे व इतर साधने यांचे अंदाजित स्थान दर्शवणारे नकाशे व प्रस्तावित कामाचा पूर्ण तपशील देणारे विनिर्देश विद्युत निरीक्षक, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवण्यात येतील. काम पूर्ण झाल्यानंतरचे यासंबंधीचे पूर्ण आराखडेही त्यांच्याकडे पाठवण्यात येतील.
काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत निरीक्षक किंवा सहायक विद्युत निरीक्षक यांच्याकडून ते संमत करण्यात येईल.
निरीक्षण आणि चाचणी- विजेचा दिवा, पंखा किंवा इतर उपकरण चित्रपटगृहात बसवण्यात आले असेल अशा वेळी ते दर बारा महिन्यांमध्ये एकदा विद्युत निरीक्षक किंवा त्याचा सहायक या सर्व रचना व्यवस्थितपणे काम करीत असल्याचे लेखी प्रमाणपत्र लायसन्स देणाऱ्या प्राधिकाऱ्याकडे पाठवील. या शर्तीच्या अधीन राहूनच बसविण्यात येईल, असे निरीक्षण करण्याचे व चाचणी घेण्याचे काम विद्युत निरीक्षकाने वेळोवेळी नेमलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यासह करता येईल.
मुख्य सर्किट – विजेचे दिवे असलेल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये विशेष करून तीन निरनिराळे मुख्य सर्किट असावेत. ते पुढीलप्रमाणे असावेत :-
(अ) रंगमंचाकरिता
(ब) व (क) श्रोतृगृह, छत्रमार्ग, निर्गममार्ग आणि लोकांना खुल्या असलेल्या इतर जागा यांच्याकरिता.
श्रोतृगृह, छत्रमार्ग, निर्गममार्ग आणि लोकांसाठी खुल्या असलेल्या जागा यामधील दिव्यांची विभागणी या दोन सर्किटांमध्ये, शक्यतोवर सम प्रमाणात होईल, अशा प्रकारे (ब) आणि (क) सर्किटांची रचना करण्यात येईल.
(ब) आणि (क) हे दोन सर्किट्स जोडणीमध्ये एकत्र करण्यात येणार नाहीत किंवा एका सर्किटातील तारा किंवा तारांची टोके दुसऱ्या सर्किटांच्या तारा किंवा तारांची टोके यांच्याबरोबर एकाच वेष्टनिकेत (केसिंग) किंवा नलिकेत घालण्यात येणार नाहीत.
श्रोतृगृहातील दिव्यांचे रंगमंचावरून नियंत्रण – श्रोतृगृहातील दिव्यांच्या काही भागांचे नियंत्रण रंगमंचाच्या स्विचफलकावरून (सर्किट (अ)) करावयाची इच्छा असल्यास, तशी परवानगी सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रोतृगृहाच्या प्रत्येक भागाकरिता रंगमंचापासून पूर्णपणे स्वतंत्र असलेले पुरेशा संख्येतील दिवे (ब) आणि (क) सर्किटावर ठेवण्यात आलेले असल्यास देण्यात येईल. अशा दिव्यांची संख्या आणि त्यांची स्थाने विद्युत निरीक्षकाच्या मान्यतेच्या अधीन राहतील.
निर्गम मार्गदर्शक चिन्हांकरिता साह्य़कारी वीजपुरवठा – (१) सर्व निर्गम मार्गदर्शक चिन्हांना ती चिन्हे योग्य प्रकारे प्रकाशित करू शकतील असे साह्य़कारी बल्ब जोडलेले असावेत. आणि या बल्बांना संचायकांमधून (Accumulators)  वीजपुरवठा करण्यात येईल. ही संचायके कोणत्याही दिवशी लोकांना प्रथम प्रवेश देण्यापूर्वी पूर्णपणे विद्युत प्रभारित अवस्थेत असला पाहिजेत.
(२) लोक चित्रपटगृहात असेपर्यंत जिने, छन्नमार्ग आणि निर्गम मार्गदर्शक चिन्हे यांचे सर्व दिवे पूर्णवेळ प्रकाशमान ठेवण्यात यावेत.
विजेऱ्या (टॉर्चेस)- मान्यताप्राप्त नमुन्याच्या व वर्षभर योग्य प्रकारे काम देतील अशा किमान सहा विजेऱ्या या जागेत ठेवण्यात याव्यात आणि त्या द्वारपालांना मिळू शकतील अशा प्रकारे त्यांचे इमारतीमध्ये वाटप करण्यात आलेले असावे.
रंगमंचावरील तळदिवे इत्यादी – चित्रपटगृहाची जागा जेव्हा नाटय़प्रयोगासाठी वापरण्यात येते तेव्हा फळ्यांवरील दिवे आणि तळदिवे शॉर्टसर्किट होण्यास कारणीभूत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून योग्यरीत्या संरक्षित केले जावेत आणि दृश्यांचे कोणतेही सामान किंवा इतर ज्वालाग्राही साहित्य यांचा दिव्यांशी संबंध येऊ शकणार नाही, अशा रीतीने ठेवलेल्या लोकरी संरक्षकांच्या (स्टफ गार्ड्स) साह्य़ाने दिवे संरक्षित केले जावेत.
रंगमंचाकरिता प्लग सॉकेट्स- रंगमंचाकरिता असलेले प्लग सर्किट हे बॅकेलाइटचे किंवा तत्सम अग्निरोधक सामग्रीचे बनविलेले असावे आणि त्यांची रचना भक्कम असावी.
भंजक (कट-आउट)- (१) सर्व सर्किट्स, कर्मचाऱ्यांना सहज जाता येईल; परंतु लोकांना जाता येणार नाही अशा ठिकाणी ठेवलेल्या भंजकांनी सक्षमपणे संरक्षित करण्यात यावेत. सर्व भंजक हे त्वरित बदलता येतील अशा प्रकारचे व अशा ठिकाणी असावेत.
(२) सर्व भंजक हे खाली पडणाऱ्या वितळलेल्या धातूमुळे शॉर्टसर्किट किंवा ठिणगी निर्माण होणार नाही अशा प्रकारे बनवलेले असावेत.
(३) सर्व स्विच आणि भंजक यांच्यावर ते कोणता सर्किट किंवा दिवा नियंत्रित करतात हे दर्शविणाऱ्या खुणा केलेल्या असाव्यात.
(४) सर्व स्विच, भंजक (कट-आउट), सीलिंग रोज आणि भिंतीतील सर्किटांचे दीपाधार यांची बैठक व आवरणे अग्निरोधक असतील. सर्व स्विच आणि भंजक पुरेशा लांबी-रुंदीचे असावेत आणि यांच्यामुळे प्रज्योत (आर्क) निर्माण होण्याचा धोका उद्भवणार नाही, अशा रीतीने त्यांची रचना केलेली असावी.
(५) स्विचमधून जेवढा विद्युत प्रवाह नेण्याचा उद्देश असेल तेवढा विद्युत प्रवाह त्यामधून न तापता जावा यासाठी सर्व स्विच पुरेशा विस्तृत आकाराचे असावेत आणि चालू (ल्ल) आणि बंद (ऋऋ) या दरम्यानच्या मधल्या स्थितीत राहून प्रज्योत (आर्क) निर्माण होण्यास किंवा शॉर्टसर्किट होण्यास वाव मिळणार नाही अशा प्रकारे त्यांची रचना केलेली असावी.
संचायके (अ‍ॅक्युम्युलेटर्स)- संचायके ही बाहेरची हवा पुरेशा प्रमाणात खेळती असलेल्या खोल्यांमध्ये ठेवण्यात येतील. या खोल्या अग्निरोधक सामग्रीने बांधलेल्या असाव्यात व त्यांना अग्निरोधक दारे असावीत आणि त्या दुसऱ्या कोणत्याही प्रयोजनासाठी वापरल्या जाता कामा नये.
तारांचा आराखडा- वीजसंच मांडणीचे सर्व सर्किट, सब-सर्किट यांची रचना, वितरण फलकांच्या जागा आणि केबल्सचा आकार दर्शविणारा एक चौकटीत बसविलेला आराखडा चित्रपटगृहाच्या जागेत लावण्यात येईल व तो अद्ययावत ठेवण्यात येईल.
तात्पुरती प्रकाशयोजना- (१) तात्पुरती प्रकाशयोजना करण्याची इच्छा असेल अशा सर्व बाबतीत. कामास सुरुवात करावयाची असेल त्याच्या ७ दिवस अगोदर विद्युत निरीक्षकाला लेखी नोटीस देण्यात येईल.
(२) तारा आणि केबल या पुरेशा प्रमाणात व पक्क्या बसवलेल्या असाव्यात आणि त्या या नियमांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या तारा व केबल यांच्यासारख्या असाव्यात आणि जेथे या तारांशी लोकांचा संबंध येतो तेथे यांत्रिक इजा होण्याचे टाळण्यासाठी त्या लोखंडी किंवा पोलादी कवचामध्ये सुरक्षित ठेवण्यात येतील.
(३) एक आठवडय़ापेक्षा अधिक काळपर्यंत वापरात असल्यास, सर्व जोडांना डाग देण्यात येईल व पट्टी गुंडाळण्यात येईल आणि एक आठवडय़ापेक्षा कमी काळपर्यंत वापरात असल्यास, तार ७:२० एस. डब्लू. जी. किंवा तत्सम यापेक्षा मोठी असल्यास तिला डाग देण्यात यावा. काही असले तरी हलवण्याजोग्या जोडण्याच्या आणि विशेष उपकरणांच्या जोडांना पट्टी गुंडाळण्यात यावी.
(४) सर्व तात्पुरते काम ते ज्या प्रयोजनाकरिता उभारण्यात आले असेल ते प्रयोजन संपल्यानंतर ताबडतोब तेथून दूर करण्यात यावे. रंगभूमीवरील तात्पुरत्या कामाच्या बाबतीत कायम वीजसंच मांडणीशी असलेले त्याचे सर्व जोड, ज्या कामासाठी त्यांचा वापर करण्यात आला ते काम आटोपल्यानंतर तद्विरुद्ध परवानगी मिळवलेली असेल ते खेरीजकरून ताबडतोब काढून टाकण्यात यावेत. प्रत्येक प्रकरणात आवश्यक असतील अशा विशेष शर्ती तात्पुरत्या विजेच्या कामाच्या वापरासाठी विद्युत निरीक्षकाने दिलेल्या संमतीसोबत जोडता येतील.
सुरक्षा पडदा- नाटय़प्रयोगांसाठी ज्यांचा वापर केला जातो, अशा चित्रपटगृहांच्या जागी जेव्हा जेव्हा सुरक्षा पडदा खाली येतो; तेव्हा तेव्हा श्रोतृगृहातील सर्व दिवे ताबडतोब लावण्यात यावेत.
विजेच्या धक्क्यावरील उपचाराच्या सूचना आणि निरोधक हातमोजे- विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तींना पूर्वस्थितीत आणण्यासंबंधीच्या सूचना इंग्रजीत व जिल्ह्य़ाच्या स्थानिक अशा दोन्ही भाषांमध्ये स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी लावण्यात याव्यात आणि इंडिया रबरच्या चांगल्या स्थितीत असलेल्या हातमोज्यांचा कमीतकमी एक जोड वीजतंत्र्यांच्या वापरासाठी देण्यात यावा.
चालक- विद्युत संयंत्र आणि प्रक्षेपण उपकरण हे या प्रयोजनाकरिता चित्रपटगृहाच्या लायसन्सधारकांकडून लेखी नामनिर्देशित केलेल्या अर्हताप्राप्त व्यक्तीच्या हाती असावे. हे नामनिर्देशन विद्युत निरीक्षकांच्या मान्यतेच्या अधीन असेल. परंतु असे की, राज्य तंत्र शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेली चलचित्र प्रक्षेपण अभ्यासक्रमाची पदविका धारण करणाऱ्या व्यक्ती, या नियमाच्या प्रयोजनार्थ अर्हताप्राप्त आहेत असे मानले जाईल. वीजसंच मांडणी ही योग्यरीत्या अर्हताप्राप्त व्यक्तीच्या (वर्ग दोन या तारतंत्री) प्रभारात असेल आणि व्यक्तीचे नाव व अर्हता मान्यतेसाठी विद्युत निरीक्षकास अधिसूचित करण्यात यावी.
रकाश कुलकर्णी =plkul@rediffmail.com
विद्युत सल्लागार आणि सदस्य,
राष्ट्रीय सुरक्षा परिषद,

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..