वास्तू, मग ते घर असो किंवा ऑफिस किंवा एखादं दुकान, इंटिरिअर करून आपण प्रत्येक वास्तू सुंदर, देखणी करू शकतो. मात्र घर आणि व्यवसायाची वास्तू इथलं इंटिरिअर अनेक दृष्टीने वेगळं असतं. त्यात सर्वच बाबतीत वेगळेपणा असतो, इथे गल्लत करून चालत नाही. घर हे घरासारखंच दिसायला हवं आणि ऑफिस किंवा दुकान हे व्यवसायाच्या दृष्टीनेच सजलेलं हवं.
ए केकाळी गर्भश्रीमंत, उच्चभ्रूंची मक्तेदारी मानली गेलेली अंतर्गत सजावट किंवा इंटिरिअर डिझायिनग ही संकल्पना आज सर्वमान्य झालेली आहे. इतकी की, घर घेताना किंवा एखादी वास्तू घेताना इंटिरिअरसुद्धा करायचंच याविषयी अनेकजण आग्रही दिसून येत आहेत. मुळात अंतर्गत सजावट फक्त राहती वास्तू, बंगला, फ्लॅट इथेच करता येते असं नव्हे, तर ऑफिसेस, दुकानं जसे की, ब्युटी सलोन, फॅशन बुटीक, कलात्मक वस्तूंची दुकानं अशा अनेक दुकानांमध्ये इंटिरिअर करून व्यवसायाच्या दृष्टीने घेतलेला गाळा आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेने प्रेझेंटेबल करता येतो. अर्थात घराचं इंटिरिअर आणि अशा दुकानांचं किंवा ऑफिसचं इंटिरिअर यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. इथे गल्लत होता कामा नये. घर हे घरासारखंच सजलेलं असावं, तर ऑफिस किंवा दुकान हे व्यवसायाच्या अनुषंगाने सजलेलं व आखीवरेखीव असावं.
घर आणि कार्यालय दोन भिन्न वास्तू आहेत. हा भिन्नपणा सर्वच बाबतीत आहे; जसं की, तिथली माणसं, तिथला वावर, तिथल्या माणसांच्या गरजा, कामाचं स्वरूप (घरातील कामं आणि कार्यालयीन कामं अशी विभागणी), त्या वास्तूच्या प्राथमिक गरजा वगरे. शिवाय प्लॅिनग, डिझायिनगही कमालीचं वेगळं. मटिरिअल्स, रंगसंगती, सजावटीतल्या मूलभूत गोष्टीही वेगवेगळ्या. हे मुद्दे विचारात घेऊन ऑफिस, दुकान यांचं इंटिरिअर करावं लागतं. आपल्या राहत्या घरासारखं इथे व्यक्तिगत आवडीनिवडी गृहीत धरता येत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या पर्सनल चॉइसला ऑफिस किंवा व्यावसायिक जागेत फारसं प्राधान्य नसतं. इथे मालकाची आवड, बजेट, टापटीपपणा, कामासंदर्भातले नियोजन यांचा विचार जास्त होतो.
आता समजा एखादं कार्यालय, जिथे दहा-पंधरा माणसं काम करतात. अशा वास्तूचं आकारमान, जागेची उपलब्धता, कोणत्या व्यवसायाशी निगडित ते ऑफिस आहे, मालकाची आवडनिवड, कशा स्वरूपाचं काम तिथे चालतं? म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तींना एका जागेवर बसून काम आहे किंवा त्या कार्यालयात माणसांची हालचाल खूप आहे याचाही विचार करावा लागतो. हल्ली सगळीकडेच संगणक महत्त्वाचा झालाय. कार्यालयातील काम करणाऱ्या व्यक्तींच्या टेबलाची रचना करताना तिथे संगणकासाठी जागा करणं, फायिलग किंवा व्यवसायासंबंधित वस्तूंच्या मांडणीसाठी व्यवस्थित जागा असणं, स्टोअरेज, कॉन्फरन्स रूम, पॅन्ट्री, उच्चपदस्थ व्यक्तींच्या केबिन्स, टॉयलेट्स अशा अनेक गोष्टी विचारात घेऊन ऑफिसची सजावट (प्लॅिनग व डिझायिनग) करावी लागते.
आता समजा एखादं बुटीक असेल तर तिथल्या गरजा या वेगळ्या आहेत. एखादं ब्युटी सलोन, स्पा सेंटर असेल तर तिथल्या गरजा, गोष्टी या निश्चितच वेगळ्या आहेत. किंवा एखादं दागिन्यांचं दुकान. म्हणूनच त्या त्या व्यवसायाची सौंदर्यदृष्टी नजरेसमोर ठेवून तिथली सजावट केली जाते. त्यामुळेच व्यवसायाचं स्वरूप काय आहे, ती जागा कशी आहे, तिचं आकारमान किती आहे, या ठिकाणी प्रकाशयोजना किती प्रमाणात असावी, कामाची पद्धती या सगळ्याचा विचार इंटिरिअर करण्याआधी होणं गरजेचं असतं. मगच खऱ्या अर्थाने व्यावसायिक वास्तूचं इंटिरिअर आपण अधिक सौंदर्यपूर्ण करू शकतो.