रियल इस्टेटमध्ये तर दसऱ्याच्या मुहूर्तावर घरखरेदीला जास्त मन्यता आहे. कारण दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्याचा ट्रेंड गेल्या पाच वर्षांत झपाटय़ाने वाढताना दिसतोय. नेरळमध्ये घरांची मागणी आधीपासूनच वाढलेली आहे. कर्जतही त्यात मागे नाही. कारण पुणे आणि मुंबई महामार्गामुळे दोन्ही बाजूंना सारखे आहे. तसेच कॉलेजेस, पॉलिटेक्निकल कॉलेज झाल्यामुळे जागेचे भाव वाढले आहेत.
सध्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नेरळ हे ठिकाण उत्कृष्ट समजले जात आहे. या ठिकाणावर तसेच आजूबाजूच्या परिसरावर मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईतील अनेक नामवंत विकासकांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येथे अनेक दर्जेदार गृहसंकुलं आपल्याला पाहायला मिळतील.
माथेरान व्हॅलीत येणारा नेरळचा परिसर इतर नव्या ठिकाणांप्रमाणेच हळूहळू विकसित होतोय. येथील जागेच्या किमती मुंबई उपनगर आणि नवी मुंबईच्या तुलनेत अनेक पटींनी स्वस्त असल्याने इथले प्रोजेक्ट्स आणि त्यात उपलब्ध होणारी घरंही तुलनात्मकरीत्या स्वस्त आहेत. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय ग्राहकापासून ते अगदी कुणालाही येथील जागेत गुंतवणूक करणे सोयीचे जाऊ शकते. जसजसा हा भाग विकसित होत जाईल तसतशी ही गुंतवणूक ग्राहकाला भविष्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या नेरळ रेल्वे मार्ग आणि नेरळ माथेरान रोडद्वारे इथे दीड ते दोन तासांत मुंबईहून पोहोचणे सहज शक्य होते.
कर्जत, पनवेल, रायगड परिसरात अनेक मोठय़ा इंडस्ट्रीज तर आहेतच; पण त्याचबरोबर एन.डी. स्टुडिओसारखे अनेक स्टुडिओ येथे तयार होत असल्याने शूटिंगच्या व्यवसायातील अनेकजण येथे स्थलांतरीत होत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय हॉटेल्स, शाळा-कॉलेजेस, हॉस्पिटल्स, आयटी पार्क या परिसरात उभे राहत असल्यामुळे भविष्यात इथला चेहरामोहराच बदलणार आहे. साहजिकच त्याचा नेरळसारख्या नजीकच्या परिसराला नक्कीच लाभ मिळू शकेल. एमएमआरडीए या भागात अनेक विकास कामे हाती घेत आहे ते पाहता नजीकच्या काळात इथल्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावून त्याचा बांधकाम व्यवसायालाही महत्त्वाचा हातभार लागणार आहे.
बांधकाम व्यवसायामधला कुठलाही प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी संबंधित ठिकाण हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यानुसार नेरळ रेल्वे स्टेशनला लागून असलेला निर्माण नगरी, उल्हास नदीच्या किनारी वसलेला निसर्ग निर्माण अणि माथेरानच्या कुशीत सामावलेला माथेरान व्हॅली हे निर्माणचे तीनही प्रोजेक्ट उत्तम ठिकाणावर उभारलेले दिसून येतात. या ठिकाणी वन बीएचकेपासून लक्झरिअस बंगलोपर्यंत म्हणजे चार लाखांपासून चार कोटींपर्यंतचे ऑप्शन्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. जवळच असलेली माथेरान व्हॅली, कोंडेश्वर धबधबा, बारवी धरण, चंदेरी इ. ठिकाणांमुळे येथे निसर्गाचा ओलावा मिळतोच, पण नव्याने विकसित होत असलेल्या या शहरात बँकिंग, शॉपिंग, एन्टरटेण्मेंट, स्कूल कॉलेजेस  या सर्वाची सुविधा असल्याने दर्जेदार राहणीमानाचा अनुभवही घेता येतो.