असह्य उकाडय़ामुळे अनेकजण एसीचा पर्याय निवडतात. परंतु एसी कोणत्या कंपनीचा घ्यावा. त्यात कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याबाबत अनेक ग्राहक अनभिज्ञ असतात. योग्य एसी कसा निवडावा याविषयी..

तापमानाचा पारा चढायला लागल्यानंतर उन्हाळ्यामध्ये तुमचे घर थंड ठेवण्यासाठी घरात एसी लावणे हा एक पर्याय असू शतो. मात्र, एसी उत्तम प्रकारे कसा वापरायचा याबाबत अनेकजण फारसे जागरूक नसतात.
एसी खरेदी करण्याआधी लक्षात घेण्याजोग्या काही महत्त्वाच्या गोष्टी :
एसी लावण्याची खोली- एसी खरेदी करण्यापूर्वी ज्या खोलीत एसी लावायचा आहे तिचा आकार आणि एसी जिथे ठेवणार आहात ती जागा या दोन्ही गोष्टी जाणून घ्या.
क्षमता – ज्या खोलीत एसी लागणार आहे, त्या खोलीच्या जमिनीवरून एसीची क्षमता ठरवावी. सरासरी शंभर चौरस फुटांच्या खोलीसाठी १.० टीआर टन एसी बसवावा.
ऊर्जा कार्यक्षमता – एअर कंडिशनरबरोबर स्टार रेटेड ऊर्जा कार्यक्षमता येते. त्यामुळे तीन किंवा त्यापेक्षा जास्त स्टार असणारे उपकरण हे कमी स्टार असलेल्या एसीपेक्षा कमी वीज वापरते. दीर्घकाळात एसीची ही क्षमता टिकू राहील, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. स्वच्छ करण्यास व देखभाल करण्यास सोपा असलेला एसी खरेदी करून हे साध्य करता येईल. उदा. कंडेन्सर्स तांब्याच्या नळीपासून बनवलेले असल्यामुळे त्या स्वच्छ करण्यास तसेच दुरुस्त करण्यास सोप्या असतात. यामुळे ऊर्जा कार्यक्षमता दीर्घकाळ टिकून राहाते.
स्प्लिट किंवा विंडो एसी – विंडो युनिट्स बसविणे कमी खर्चीक असले, तरी स्प्लिट एसी जास्त शांत, दिसायला चांगले आणि खोलीत  हवा समान पसरविणारे असतात.
उत्पादनांची किंमत- किंमत हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण उच्च स्टार्स आणि जास्त वैशिष्टय़ांमुळे किंमतही वाढते. मात्र, उच्च स्टार असलेल्या एसीमुळे वीजबिल कमी होते आणि दीर्घकाळात असा एसी स्वस्त ठरतो.
इन्स्टॉलेशन – एअर कंडिशनर इन्स्टॉल करताना त्यात जोडणाऱ्या नळ्या तांब्याच्या आहेत की नाही याची खात्री करून घ्या. लक्षात ठेवण्याजोगा आणखी एक मुद्दा म्हणजे एसीमुळे येणारा इलेक्ट्रिक ताण संबंधित इलेक्ट्रिक सíकट पेलवू शकेल की नाही हे तपासा. एअर कंडिशनरसाठी कधीच एक्सटेन्शन कॉर्ड वापरू नये. त्यासाठी भिंतीत बसवलेले १६ एएमपीएस ते तीन रेटिंग असलेले पिन सॉकेट हवे.
हवेचा दर्जा – अंतर्गत हवेचा दर्जा सुधारण्यासाठी एसीचा फिल्टर चांगला असणे महत्त्वाचे आहे. मात्र, एअर कंडिशनरची कामगिरी ही त्याचा फिल्टर किती स्वच्छ आहे, यावर अवलंबून असते. त्यामुळे इव्हापोरेटर कॉइल बसलेली धूळ वेळोवेळी (तीन महिन्यांतून एकदा) साफ करून तो चोक होणे टाळावे.
एसी नीट चालावा म्हणून आवश्यक कराव्या अशा काही गोष्टी
* थर्मोस्टॅट कोल्डर सेटिंगवर ठेवल्याने वीजचा अनावश्यक खर्च होईल. त्यापेक्षा उन्हाळ्यात तुमचा थर्मोस्टॅट किमान सुसह्य
तापमान असताना (२४ ते २६ अंशांदरम्यान) हायवर ठेवावे.
* थंड हवा पसरण्यासाठी विंडो एअर कंडिशनरबरोबर तुमच्या खोलीतला  फॅनही वापरा.
* युनिट बंद केल्यानंतर परत सुरू करण्याआधी पाच मिनिटे थांबा, म्हणजे त्याच्या रेफ्रिजरेशनमधील सिस्टीम समान होईल आणि कॉम्प्रेसरवरचा ताण कमी होईल.
* कूलिंग चांगले होत नसेल, कॉम्प्रेसर सतत ट्रिप होत असेल तर कंडेन्सरवर धूळ जमली आहे का पाहा आणि तो स्वच्छ करा. म्हणजे कंडेन्सर कॉइलमधून हवा
व्यवस्थित पुढे जाईल.
*  जर खोलीतले तापमान हव्या त्या तापमानापेक्षा अधिक असेल, तर रेफ्रिजरेटचे काही प्रमाण गळून गेलेले असेल. अशा वेळेस गळती दुरुस्त
करण्यासाठी सेवा पुरवठादाराशी संपर्क करा आणि मशीन परत सुरू करा.  एसीबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी
* हाय एफिशियन्सी एअर कंडिशनर्स (स्टार रेटेड मशीन्स) वापरल्यास एअर कंडिशनर्सकडून वापरली जाणारी वीज २० ते २५ टक्क्यांनी कमी करता येईल.
* तांब्याच्या नळ्याच्या कंडेन्सरमुळे सिस्टीम बंद आणि सुरू मोडमध्ये स्विच होत असताना गरम होण्यास तसेच थंड होण्यास
मदत होते. उष्णता स्थलांतरित करण्यासाठी त्या अतिशय प्रभावी असतात.
* कॉम्प्रेसरमधील दोष
* कूलिंगमध्ये अडथळे
* जास्त वीज वापरणे
* वारंवार बिघाड होणे
* देखभालीचा जास्त खर्च
* फिल्टर तपासा
* प्रोग्रॅमेबल थर्मोस्टॅट इन्स्टॉल करा
*  वातावरणानुसार कंडेन्सर नियमितपणे (महिन्यातून किंवा तीन महिन्यांतून एकदा) स्वच्छ करा.
भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये विविध प्रकारचेवातावरण असते. कुठे धूळ, कुठे प्रदूषण जास्त, कुठे नाल्यातून दरुगधीचा वास, तर कधी समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या वाफा. अशा ठिकाणी कंडेन्सर गॅसगळती, आतील फिल्टर ठप्प होणे, ऊर्जा कार्यक्षमता कमी होणे असे प्रकार होतात. अशा ठिकाणी तांब्याच्या नळ्या वापरून बनवलेला कंडेन्सर सहज आणि चांगल्या प्रकारे स्वच्छ करता येतो. यामुळे गॅसगळती, ऊर्जाक्षमता कमी होणे असे धोके टाळता येतात.
तांबे मजबूत असते आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ते अधिक काळ टिकू शकते. एएमसीबरोबर त्याच्या देखभालीचा खर्च कमी येतो आणि ते टिकाऊ होते.
तेव्हा या उन्हाळ्यात जास्तीत-जास्त चालेल अशा एसीमध्ये गुंतवणूक करा आणि देखभालीचा खर्च तसेच वीजबिलावरील खर्च कमी करून पसे वाचवा.                 
– इंटरनॅशनल कॉपर असोसिएशन, इंडिया

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?