‘‘वस्तुरंग’मध्ये प्रकाश कुलकर्णी यांचा ‘विद्युत सुरक्षा : बिल्डर, आर्किटेक्ट आणि विद्युत सुरक्षा’ हा माहितीपूर्ण लेख वाचला. लेखात म्हटल्याप्रमाणे सबस्टेशन हे मुख्य इमारतीपासून दूर बांधणे नियमाप्रमाणे आवश्यक आहे हे आíकटेक्ट व बिल्डरने जाणून तशीच कार्यवाही करावी, अन्यथा नियमभंगाच्या कारवाईस त्या दोघांनाही सामोरे जावे लागते. या अनुषंगाने आमच्या एका समस्येचा उल्लेख करणे रास्त ठरेल.
आम्ही सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता बाधित नवीन टिळक नगर म्हाडाच्या प्रकल्पग्रस्तांनी मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाच्या त्रिपक्षीय सलोखा न्यापन प्रविष्टय़ेनुसार मुं.म.पालिका दि. १४ ऑक्टोबर २००१ च्या मंजूर अभिन्यास (ले-आउट) आराखडय़ात तसेच मुं.म.पालिका दि. १५ ऑक्टोबर २०१२च्या मंजूर इमारत बांधकाम आराखडय़ातदेखील ‘इलेक्ट्रिकल उपकेंद्र’बाबत नोंद नाही.
म्हाडा कार्यकारी अभियंता कुर्ला मुं. मंडळ विभागाच्या दि. २७ नोव्हेंबर २०१४ रोजीच्या पत्रातदेखील मुं.म.पालिका इमारतीच्या मंजूर नकाशाप्रमाणेच किंवा टिळक नगर वसाहतीमध्ये पूर्वीपासून अस्तित्वात (२५ ते ३० फुटांवर) रिलायन्स एनर्जीच्या विद्युत उपकेंद्रातूनच पुरवठा घेण्याबाबत मुं.म.प्र.वि.प्राधिकरण विभागास स्पष्ट आदेश आहे.
परंतु प्राधिकरण नवीन इमारतीच्या तळमजल्यावर रिलायन्स एनर्जीच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल उपकेंद्र ((Electrical Substation)) बसविण्याचे काम करीत असल्याबद्दल आम्ही रिलायन्स एनर्जी, प्राधिकरणच्या कार्यालयात संदर्भीय तपशिलासह कागदपत्रे सादर करून नवीन टिळक नगर वसाहतीमध्ये २५ ते ३० फुटांच्या अंतरावर पूर्वीपासून अस्तित्वात रिलायन्स एनर्जीच्या विद्युत उपकेंद्रातूनच क्षमता वाढवून पुरवठा घेण्याबाबत विनंती केली होती. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रहिवासी राहण्याच्या खोल्या असून छताची जाडी १५० एमएम (६ इंच) व  धारणक्षमता १५ टन आहे.
सदर बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वांद्रे (पूर्व) येथील विद्युत निरीक्षण कार्यालयात संदर्भीय तपशिलासह कागदपत्रे सादर केली, तसेच श्री. विद्युत निरीक्षकसाहेबांच्या प्रत्यक्ष भेटीत मांडल्या असता त्यांनी सी.ई.ए. रेग्युलेशन २०१०च्या कलमप्रमाणे कोणताही नियमभंग होत नसल्याचे सांगितले.
या लेखामुळे आम्हाला न्याय मिळेल असे वाटते.
उत्तमदास वानखेडे,  सतीश गझीनकर –  नवीन टिळक नगर कृती समिती