..अशी वास्तूतली हळुवार ओढ नि जपणूक.. म्हणूनच वास्तू सोडताना मन गहिवरतं. वास्तूतल्या वस्तूंनाही मन असतं. त्या जपून वापराव्यात. दारे आपटू नयेत. पायांनी लावू नयेत. भांडं आपटलं तर दुखावून त्याला पोचा पडतो. प्रत्येक  वस्तूचं स्वत:चं असं महत्त्व असतं.

फु लांचे हार, माळा, पंचारती, रांगोळी.. अशी  केतकीने- माझ्या सुनेनं वास्तूच्या वाढदिवसासाठी सर्व तयारी केली. हो, वास्तूचा वाढदिवस केल्याने वास्तू सुखावते. वास्तूला भावना समजतात. वास्तूमधलं पर्यावरण, आपल्या चांगल्या-वाईट विचारांच्या श्वास-निश्वासांनी त्यांच्या लहरीने साकारत असते. व्यक्ती-व्यक्तीतील सामंजस्य, सुसंवाद, चांगले सूर, विचार वास्तू टिपत असते आणि ‘तथास्तू’ म्हणत असते. रोज येणारा ड्रायव्हर, मोलकरीणीची मुलगी, त्यांना दिलेला चहा, खाणं, अगत्यानं केलेली चौकशी, बाजूच्या चिमण्या-कबुतरांना टाकलेला चिमणखाऊ, पाणी, मोठय़ांशी सरळ व आदराने बोलणं, दारातले स्वस्तिक, गोपद्म, उंबऱ्याची पूजा यासारख्या गोष्टींनी जर घराला कुशीत घेतलं तर घरही लेकरांना माया लावतं. म्हणूनच काही वास्तू हसऱ्या, प्रसन्न वाटतात. उलट ज्या घरात धुसफूस, कागाळय़ा, आदळआपट त्या घरावर दारावरच्या सुकलेल्या तोरणासारखं नैराश्याचं मळभ दाटतं.
कितीएक स्मृतींना जतन करणारा वास्तुपुरुष तिथे नांदत असतो. म्हणून वास्तुशांती वेळी भटजी सांगतात की, ‘‘आम्ही तीन-चार वर्षांनी फ्लॅट विकणार, बंगला बांधणार,’’ अशा प्रकारचे शब्द काढू नका. वास्तू दुखावते.
माझे सातारचे घर बंद करून पुण्याला येताना भिंतीवर, झाडांवर आंब्याच्या मोहरावर प्रेमाचा हात फिरतोच, पण प्रत्येक भेटीत वास्तूतल्या निर्जीव वस्तूही सजीव होऊन माझ्याशी बोलतात जणू! शोकेसमधला माझ्या मामींनी दिलेला हसऱ्या डोळय़ांचा, टकलू- अगदी खराखुरा वाटणारा मुलगा त्याला म्हटलं, ‘‘एवढय़ा लांबून विमानात बसून आलास (कुवैतहून) आणि मी तुला सोडून जातेय. रागावू नकोस, येतेच अधूनमधून हं!
तर अशी वास्तूतली हळुवार ओढ नि जपणूक.. म्हणूनच वास्तू सोडताना मन गहिवरतं. वास्तूतल्या वस्तूंनाही मन असतं. त्या जपून वापराव्यात. दारे आपटू नयेत. पायांनी लावू नयेत. भांडं आपटलं तर दुखावून त्याला पोचा पडतो. प्रत्येक  वस्तूचं स्वत:चं असं महत्त्व असतं. पण फटाफट गाडय़ा नि फ्लॅट बदलणाऱ्या या पिढीने भावनिकतेने त्यांच्याशी स्वत:ला जोडूनच घेतलेलं नसतं. मग तोडण्याचा व मन तुटण्याचा संबंधच येत नाही. मनं कोरी व्हायला लागलीत.
पुण्याच्या घराची ‘बाल्कनी’ ही माझी खास आवडती जागा आहे. अस्ताचलाचे दृश्य पाहून ‘सांज ये गोकुळी’चे सूर मनात उमटतात. प्रत्येकाची स्व-वास्तूतली मनी जपलेली एखादी खास जागा असावी, अतूटपणे जोडणारी!
टापटिपीने स्वच्छतेने सजावटीने घराचे आंतरीक सौंदर्य खुलते. आणि घरातील वस्तूंना, व्यक्तींना, मोठय़ांना आदराने सांभाळून समाधानाचे सौंदर्य गवसते. आणि याच आनंद-लहरींनी वास्तूचा आत्मा हर्षांचा गंध लेवून मिरवतो.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…