प्रचंड उष्णता आणि दमटपणा आणि त्याबरोबरच पावसाचा मारा यामुळे इमारतीला फटका बसू शकतो. इमारतींना तडे जाणे आणि परिणामी होणारी पाण्याची गळती, हे प्रश्न अनेक इमारतींमध्ये प्रामुख्याने आढळून येतात. काही वेळा इमारतींच्या बांधकामाचा दर्जाच अशा प्रकारचा असतो, की निवासी संकुलातील मोठमोठय़ा गगनचुंबी इमारतींतही पाणी गळण्याचे प्रकार होऊ  शकतात आणि हे सगळे योग्य वॉटरप्रूफिंगचा व बाह्य भिंतीच्या प्रतिबंधात्मक काळजीचा अभाव यामुळे घडते.   
पाणीगळतीमुळे भिंतींच्या बाहेरच्या बाजूला तडे जातातच, शिवाय इमारतीची संरचनाही कमकुवत होते. हे त्या इमारतीत राहणाऱ्यांसाठी धोकादायक आहे. इमारत पूर्ण झाल्यापासून पहिल्या पाच वर्षांमध्ये बाह्यभिंतींतून पाणी झिरपते, असे साधारणत: निरीक्षण आहे. दमटपणा आणि प्रचंड पाऊस याव्यतिरिक्त गगनचुंबी इमारतींना सोसाव्या लागत असलेल्या सोसायटय़ाच्या वाऱ्यामुळेही हे घडते. यामुळे पाणी झिरपण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पाण्याचा शिरकाव टाळण्यासाठी इमारतीची रचना व बांधकाम विचारपूर्वक करणे गरजेचे आहे.
गळती रोखण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे भिंतीची जाडी पुरेशी असावी, बांधकामाच्या सांध्याजवळ डिझायनिंग योग्य असावे. काही वेळा भिंतींमधील फटीमुळे बाह्य भिंतींमधून गंभीर स्वरूपाची गळती होऊ शकते. यामुळे महागडा रंग आणि फिनिशिंग यांना फटका बसू शकतो.

पाणीगळतीमुळे भिंतींच्या बाहेरच्या बाजूला तडे जातातच, शिवाय इमारतीची संरचनाही कमकुवत होते. हे त्या इमारतीत राहणाऱ्यांसाठी धोकादायक आहे. इमारत पूर्ण झाल्यापासून पहिल्या पाच वर्षांमध्ये बाह्यभिंतींतून पाणी झिरपते, असे साधारणत: निरीक्षण आहे. दमटपणा आणि प्रचंड पाऊस याव्यतिरिक्त गगनचुंबी इमारतींना सोसाव्या लागत असलेल्या सोसायटय़ाच्या वाऱ्यामुळेही हे घडते. यामुळे पाणी झिरपण्याची शक्यता वाढते.

एका पाहणीच्या नुसार, पाणी गळण्याचे सर्वात सामायिक कारण विटांच्या भिंतींचा एकेरी थर असल्याचे निदर्शनास आले आहे. अंदाजे ९० टक्के पाणीगळती विटांच्या प्लास्टर्ड भिंतींना गेलेल्या तडय़ांमधून होते.
तज्ज्ञांच्या मते, तुमच्या इमारतीसाठी सिमेंट किंवा सर्वसाधारण बाह्य आर्किलिक रंग संरक्षणासाठी पुरेसा नसतो. बाह्य़ भिंतींच्या प्रभावी वॉटरप्रूफिंगसाठी कोटिंग साहित्याने इमारतीच्या रचनेभोवती मजबूत थर म्हणून काम केले पाहिजे. त्यामुळे अत्यंत दर्जेदार आर्किलिक इमल्शन पॉलिमरची निवड करायला हवी. यामध्ये हवामानाच्या संदर्भात टिकाऊ  पिग्मेंट, ग्रेडेड फाइन फिलर व अ‍ॅडिटिव्ह यांचा उत्तम मेळ घातलेला असतो आणि त्यामुळे जल स्वरूपातील पाणी व कार्बन डाय ऑक्साइड वायू यांना रोखले जाऊ  शकते.  
पाणी गळण्याचा आणखी एक मुख्य स्र्रोत म्हणजे टेरेस, परंतु टेरेसकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. आधीच मोठय़ा प्रमाणात गळती होऊनही बहुतांश रहिवासी टेरेसची तपासणीही करत नाहीत. दर ४-५ वर्षांनी आपण आपल्या इमारतीला बाहेरून रंग देतो तेव्हाही टेरेसकडे दुर्लक्ष करतो. योग्य प्रकारे देखभाल केली तर टेरेस आपल्यासाठी बरीच उपयोगी ठरू शकते.  
काही खास वॉटरप्रूफिंग उत्पादनांमुळे उष्णता, दमटपणा आणि पाऊस यांच्यापासून भिंतींचे संरक्षण होऊ शकते. या उत्पादनांमुळे  बाह्य भिंतींच्या व टेरेसच्या बांधकामाभोवती एक थर निर्माण केला जातो. या उत्पादनांमुळे आधीच्या असलेल्या भेगाही बुजवल्या जातात. विविध प्रकारच्या तापमानांमध्ये लवचिकता व क्षमता राखली जाते, बुरशीच्या वाढीला रोखले जाते.
भिंतींच्या बाह्य भागांतून पाणी गळण्याची काही सामायिक कारणे :
* उष्णतेमुळे भिंतींमध्ये निर्माण झालेले तडे व सांधे
* भिंतीतील बांधकामाचे सांधे
* पावसामुळे दमटपणा राहणे
* निकृष्ट दर्जाचे बांधकाम; विटांच्या भिंतीचा एक थर
* भिंतींमधील फटी