दोन बहिणींमधील अतूट नातं गुंफणारी.. मोठय़ा बहिणीच्या प्रेमाची कसोटी पाहणारी.. नात्यांमधील प्रेम-द्वेषाचे हळूवार पदर उलगडणारी स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’ ही मालिका.. या मालिकेतील घटना प्रामुख्याने घडतात त्या  सूर्यवंशींच्या घरामध्ये.. चित्रीकरणा दरम्यान या घराविषयी निर्माण झालेला जिव्हाळा, तिथल्या आठवणींविषयी सांगताहेत या मालिकेतील प्रमुख व्यक्तीरेखा- मैथिली आणि दुष्यंत..

आमच्या ‘दुहेरी’ या मालिकेतलं घर एखाद्या महालासारखंच आहे. हे घर मालाडच्या चिंचोळी बंदर येथे आहे. इतकं मोठं आणि देखणं घर मनाला सुखावून जातं. या घरात हॉल, स्वयंपाकघर आणि दोन खोल्या आहेत. इथे एक मोठी खोली आहे- जी आमची मॅजिक रूम आहे. या रूमला मॅजिक रूम म्हणण्याचं कारण म्हणजे, या खोलीत प्रसंगानुसार वेगवेगळा सेट-अप तयार केला जातो. कधी तो परसूचा अड्डा असतो, तर कधी बल्लाळचं घर. तर कधी इंदिरा काकूची खोली.. ही खोली मालिकेच्या गरजेप्रमाणे अनेक भूमिका निभावत असते. त्या मोठय़ा खोलीत आमची धम्माल सुरू असते. सेटवर आणखी एक खोली आहे- निवेदिता सराफ यांची मेकअप रूम. तिथं आमची मजा-मस्ती चालू असते.  या मेकअप रूममध्ये पाच जण बसू शकतील इतकीच जागा आहे. पण आम्ही एका वेळी बारा जण या खोलीत जाऊन दंगा करीत असतो. कोणी सोफ्यावर बसतं, कोणी खुर्चीवर, कोणी स्टुलावर तर कोणी उभंच असतं. आम्ही त्या खोलीत असलो की आमचा इतका आवाज असतो की दुसऱ्या कोणाचा सीन चालू असेल तर त्यांना आम्हाला ‘आवाज कमी करा’ असं सांगावं लागतं. अशीच मजा आम्ही या बंगल्याबाहेर असलेल्या मोकळ्या जागी करत असतो. या बंगल्याच्या आजूबाजूला आयटी पार्क, कॉल सेंटर्स, हॉटेल्स आहेत. या बंगल्यात शिरल्यावर लगेचच एक मोठं वडाचं झाड आहे. त्या झाडाखाली अनेक जण त्यांच्या गाडय़ा पार्क करतात. या पार्किंग एरियापासून बंगल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत थोडी मोकळी जागा आहे. याच मोकळ्या जागेत आम्ही सगळेच कधी कधी संध्याकाळी वेगवेगळे खेळ खेळतो. अशा खेळीमेळीच्या वातावरणात रोज त्या सेटवर आम्ही वावरत असतो. आता हा बंगला आणि परिसरातील छोटय़ा-छोटय़ा जागाही माहीत झाल्या आहेत.

Use This Epsom Salt Looking Like Rice For Flower Plants Anant Mogra Jaswandi
Video: तांदळासारखी दिसणारी ‘ही’ वस्तू वापरून फुलवा अनंताच्या रोपाची शोभा; भरपूर कळ्यांनी सजेल कुंडी
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज
Learn How To Cook instant rava kurdai At Home
रवा न भिजवता, चीक न पाडता बनवा झटपट चौपट फुलणारी रवा कुरडई; जाणून घ्या कृती
How to make Cheese Thalipeeth recipe in Marathi
गरमा गरम चविष्ट चीज थालीपीठ खा अन् जीभेचे चोचले पुरवा! ही घ्या रेसिपी

मला आजही माझा या सेटवरचा शूटिंगचा पहिला दिवस आठवतो. आमचा पहिलाच सीन हा होमहवनाचा होता. सूर्यवंशींच्या घरात होमहवन चालू आहे, असा प्रसंग आम्ही शूट करीत होतो. खूप प्रसन्न वातावरण होतं. तेव्हापासून आजवर या सेटशी घट्ट नातं जुळलंय. माझं ते मालिकेतलं घर असलं तरी माझ्यासाठी ते माझ्या खऱ्या घराइतकंच जवळचं आहे.