* इच्छापत्राद्वारे अचल मालमत्तेची विल्हेवाट लावता येते का? तसेच इच्छापत्र वैध ठरण्यासाठी ते नोंद करणे आवश्यक आहे का?
-विद्या मोने, मालाड (प) मुंबई.
* इच्छापत्र म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये विल असे म्हणतात त्या दस्तऐवजाने कोणत्याही चल/अचल मालमत्तेची विल्हेवाट लावता येते. मात्र ज्या मालमत्तेची विल्हेवाट लावायची ती मालमत्ता इच्छापत्र कर्त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता असली पाहिजे. वडीलोपार्जित मालमत्तेची विल्हेवाट सर्वसाधारणपणे इच्छापत्राद्वारे लावता येत नाही. मात्र वडीलोपार्जित मालमत्तेचे वाटप होऊन एखाद्या व्यक्तीकडे तिचा भाग आला व त्याला पुढे कोणी वारस नसेल तर त्याची विल्हेवाट त्याला इच्छापत्राद्वारे लावता येते. त्यासाठी इच्छापत्र नोंद केलेलेच पाहिजे असा काही नियम नाही.
* इच्छापत्राद्वारे को ऑप. हाऊसिंग सोसायटीमधील सदनिकेचे हस्तांतरण होऊ शकते का? अशा प्रकारच्या हस्तांतरणाला केव्हा अडथळा निर्माण होतो?
-विद्या मोने, मालाड (प) मुंबई.
* हो. इच्छापत्राद्वारे हाऊसिंग सोसायटीमधील सदनिकेचे हस्तांतरण करता येईल. ज्या वेळेला बनवलेल्या इच्छापत्राला जर त्या मृत व्यक्तीच्या अन्य वारसानी आव्हान दिले तर अशाप्रकारच्या हस्तांतरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो. जर एखाद्या इच्छापत्राला कोणी आव्हान दिले तर अशावेळी इच्छापत्रावर (विलवर) प्रोबेट घेणे आवश्यक असते. मात्र मुंबई शहरामध्ये प्रत्येक इच्छापत्रावर प्रोबेट (न्यायालयाचा हुकूम नामा) घेणे बंधनकारक आहे.
* इच्छापत्राने एखाद्या हाऊसिंग सोसायटीमधील मालमत्ता (उदा. सदनिका/गाळा/गोडाऊन/दुकान इ. हस्तांतरीत करताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणती कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
-विद्या मोने, मालाड (प) मुंबई.
* ज्या वेळी हाऊसिंग को ऑप. संस्थेमधील एखादी सदनिका/गाळा हस्तांतरीत करावयाचा असेल त्यावेळी शक्य असेल तर अन्य मृत व्यक्तींच्या वारसांचे (लाभार्थी सोडून) ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे. तसेच शक्य असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे असा गाळा/सदनिका हस्तांतरीत होणार असेल त्यांच्याकडून संस्थेच्या हितासाठी सदर हस्तांतरणासंबंधी एक हमीपत्र बनवून घ्यावे. त्याचबरोबर संस्थेच्या उपविधीत नमूद केल्याप्रमाणे सर्व फॉर्मस/ डिक्लेशन भरून घ्यावीत.
जर इच्छापत्रावर प्रोबेट घेतलेले असेल तर मग अन्य कोणतीही (उपविधीत नमूद केलेल्या फॉर्म व डिक्लेशन सोडून) कागदपत्रे घ्यायची जरूर नाही. वर दर्शविलेली ना हरकत प्रमाणपत्र वा हमीपत्र घेणे कायद्याने बंधनकारक नाही. फक्त संस्थेच्या हितरक्षणार्थ घेतल्यास संस्थेला त्याचा फायदा होऊ शकेल.
* अद्याप आमच्या इमारतीला महानगरपालिकेने कर आकारणी केलेली नाही. बिल्डरने मार्च २०१२ ला कर भरला असल्याचे तो सांगतो व आता कर आकारणी अधिकाऱ्याचे नाव घेऊन रु. २०००ची मागणी बिल्डर करत आहे. अद्याप बिल्डरने जुन्या  टॅक्स भरलेल्या पावत्याही दिल्या नाहीत, अशा वेळी काय करावे?
– मधुकर राजनकर, नागपूर.
* आमच्या मते आपण बिल्डरला कोणतीही रक्कम देऊ नये. त्याला प्रथम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कर आकारणीची पावती देण्यास सांगावे. तसेच कर आकारणीच्या देयकाचीदेखील मागणी करावी. त्या देयकाप्रमाणे जर खरोखरच वर दर्शवलेली रक्कम देणे बाकी असेल तर ती महानगरपालिका कार्यालयात स्वत: भरावी किंवा शक्य असेल तर कर देयक प्रत्येक सदनिका/गाळा/दुकान इ.चे वेगवेगळे करून घ्यावे म्हणजे अन्य थकबाकीदारांचा भार नियमित कर भरणा करणाऱ्या सदस्यांना त्याचा आर्थिक भार सोसावा लागणार नाही.
* सदनिका धारकाना सहकार कायद्यातंर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करता येईल का? सदर नोंदणीस बिल्डरने अडथळा आणला तरीदेखील संस्थेची नोंदणी करता येते का?
-मधुकर राजनकर, नागपूर.
* हो. कोणत्याही इमारतीमधील सदनिकाधारकांना गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करता येते. ही नोंदणी दोन प्रकारे करता येते, एक म्हणजे बिल्डरच्या सहकार्याने व दुसरी म्हणजे बिल्डरच्या असहकार असला तरीदेखील गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करता येते. त्यासाठी आपण कोणत्याही हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयातून मदत घेऊ शकता.
संपर्कासाठी पत्ता-
 घैसास अँड असोशिएटस्, ब्लॉक नं. २, चंदन सोसायटी, किर्तीकर कंपाऊंड नूरी बाबा दर्गा रोड, ठाणे (प.)४००६०१.
संपर्क क्र. ०२२-२५४१६३३६

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…