आज विरारमध्ये अनेक नवीन इमारती निर्माण होत आहेत. लवकरच ते ‘काँक्रीट जंगल’ बनू पहात आहे. आज पूर्व-पश्चिम विभागात रस्तारुंदीकरण, भूगर्भीय मलनि:सारण पाइपलाइन तसेच पिण्यासाठी नवीन मोठी पाइपलाइन, रस्ते डांबरीकरण व पेव्हर ब्लॉकचे फूटपाथ सर्वत्र दिसू लागले आहेत. काही ठिकाणी कामे सुरू आहेत तर काही ठिकाणी पूर्णत्वास येत आहेत. येणाऱ्या वर्षांतील हे विरार बघणाऱ्यांसाठी नक्कीच नवीन वाटावे असे होऊ शकेल.
पूर्वीच्या काळी चर्चगेटहून सुरू होऊन येणारे अंतिम स्टेशन ‘विरार’ व आजचे चित्र हे चर्चगेटहून सुरू होऊन असलेले अंतिम स्टेशन ‘डहाणू रोड’ होय. पश्चिम रेल्वेचे पूर्वीचे अंतिम स्टेशन व आजचे दोघांमधले ‘मध्यवर्ती’ असणारे ‘विरार’ म्हणजे शहराने स्वत:ने केलेला हा विकास होय.
वाढत जाणारी लोकसंख्या व त्या वाढत्या संख्येबरोबर पुरवाव्या लागणाऱ्या नागरी सुविधा अशी तारेवरची कसरत ‘वसई-विरार महानगरपालिके’ला करावी लागत आहे. मुंबईत असलेली चाळीची रूम किंवा असलेला लहान फ्लॅट विकून सरळ विरारला येऊन मोठा फ्लॅट घेणाऱ्यांचा कल हा जसा दहा वर्षांपूर्वीपासून होता तसाच तो आजही आहे. महागाई ही सर्वत्रच वाढल्याने जी किंमत दहा वर्षांपूर्वी यायची त्यात २०००-२५०० रु. स्क्वेअर फूटप्रमाणे लोक मोठय़ा आकाराचे घर घ्यायचे. आज हीच किंमत ५०००-५५०० रु.पर्यंत वाढत गेली आहे. असे जरी असले तरीसुद्धा ‘विरार’च्या मागणीत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे आढळते.
ws12
जेव्हा एखाद्या शहराची मागणी ही अपेक्षेपेक्षा वाढते तेव्हा त्या शहराचा विकास होणे व विकास करणे ही कामे प्रशासनाला करावी लागतात. वाढत्या लोकसंख्येला द्याव्या लागणाऱ्या नागरी सुविधा म्हणजे रस्ते, वीज, वाहतूक, पाणी, गटारे, दवाखाने, इ. अनेक याप्रमाणे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ विकसित करणे आवश्यक व क्रमप्राप्त होते.
वाढत्या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका व त्यांचा कर्मचारी वर्ग हा कमी पडत असतो, म्हणून काळाची गरज ओळखून आज ‘वसई-विरार महानगरपालिका’ अस्तित्वात असून नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यात कार्यरत आहे.
ws11 आज विरारमध्ये अनेक नवीन इमारती निर्माण होत आहेत. लवकरच ते ‘काँक्रीट जंगल’ बनू पहात आहे. आज पूर्व-पश्चिम विभागात रस्तारुंदीकरण, भूगर्भीय मलनि:सारण पाइपलाइन तसेच पिण्यासाठी नवीन मोठी पाइपलाइन, रस्ते डांबरीकरण व पेव्हर ब्लॉकचे फूटपाथ सर्वत्र दिसू लागले आहेत. काही ठिकाणी कामे सुरू आहेत तर काही ठिकाणी पूर्णत्वास येत आहेत. येणाऱ्या वर्षांतील हे विरार बघणाऱ्यांसाठी नक्कीच नवीन वाटावे असे होऊ शकेल. त्या दृष्टीने येथील सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत व त्यांच्याकडून या नव्या ‘स्मार्टसिटी’चा विकास नक्कीच वाखाणण्याजोगा असू शकेल, असा विश्वास नागरिकांना आहे. पण आज जरी विरार येथे लोडशेडिंग नसले तरी इथे मुंबईप्रमाणे जमिनीखालची वीजप्रवाह कार्यप्रणाली नसल्याने त्याचा परिणाम नवीन रस्ते व रस्ता रुंदीकरणावर होत आहे. विजेचे खांब व लटकणाऱ्या- लोंबणाऱ्या वायरी असे जुनेच चित्र दिसत आहे, त्यासाठी तेथील प्रशासनाने प्रयत्न करण्याची नक्कीच गरज आहे.
वादळ-वारे, पाऊस यामुळे सतत खंडित होणारा वीजप्रवाह इथे राहणाऱ्या नागरिकांच्या त्रासात भर घालीत आहे. येणाऱ्या वर्षांत अखंडित वीजप्रवाह देण्यावर प्रशासनाचा भर असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नवनवीन निर्माण होणाऱ्या इमारती, त्यांचा दर्जा, नियम, कायदे-कानू यांची अंमलबजावणी होणेसुद्धा गरजेचे व महत्त्वाचे आहे. दर्जा चांगला व उच्च प्रतीचा राखला गेला तर ते शहरसुद्धा सुंदर, मजबूत व टिकाऊ राहू शकते, सुदृढ होऊ शकते. घर घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे घर मिळणे व त्याबरोबर सरकारकडून नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे व त्याचे सौजन्य राखणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
तर असे हे विरार शहर विकसनशीलतेकडून विकसित होऊ पाहणारे एकविसाव्या शतकातली  ‘स्मार्टसिटी’ म्हणून नक्कीच ओळखले जाईल, यात शंका नाही!
सुधीर मुकणे  – sudhirmukne@gmail.com