मुंबईतील ओशिवरामधील फर्निचर मार्केटमध्ये शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीचे लोण मार्केटजवळील झोपडपट्टीच्या दिशेने पसरत गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.