एखादी मुलगी कमनीय बांध्याची, गौरवर्ण आणि रेखीव दिसली म्हणजेच ती सुंदर दिसते अशी काहीशी व्याख्या अनेकांच्या मनात असते. त्यावरूनच अनेकदा लग्नाच्यावेळीही मुलींच परीक्षण केलं जातं. यातून येते ती न्यूनगंडाची भावना. लठ्ठ असणं किंवा गौणवर्ण असणं कोणालाच आवडत नाही. त्यामुळे आपल्यात काहीतरी कमी आहे यामुळे त्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. बऱ्याचदा सुंदरतेच्या ‘सो कॉल्ड’ साच्यामध्ये न बसल्यामुळे अनेक मुली याला बळी पडलेल्या दिसतात. विशेषतः हा न्यूनगंड लठ्ठपणामुळेच आलेला दिसतो. त्यामुळे स्वतःला लठ्ठ समजणा-या मुलींसाठी ‘ज्या मुली बारीक नसतात त्या जाडच असतात, असं अधेमधे काही नसतं,’ या टॅगलाईन अंतर्गत प्रदर्शित झालेला ‘वजनदार’ चित्रपट लठ्ठ मुलींमध्ये असलेल्या न्यूनगंडावर भाष्य करतो.