अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट एकाच चित्रपटात काम करणार ही माहिती मिळताच काही महिन्यांपूर्वी अनेकांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. किंग खान आणि आलिया भट्ट एकत्र काम करणार ही बाब अनेकांना पचत नव्हती. पण या चित्रपटाची एक-एक झलक जसजशी सर्वांसमोर येत गेली त्याचप्रमाणे ‘डिअर जिंदगी’बद्दलचे चित्र अनेकांसमोर उघड होत गेले. त्यामुळे आता या आगामी चित्रपटातून किंग खान आणि आलियाची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहेत. प्रेम, नाती, ब्रेकअप आणि त्यातून घडत जाणारं आयुष्य यांचे सुरेख चित्रण या चित्रपटामध्ये केले गेले आहे.