नवे ठाणे अशी ओळख मिरवणाऱ्या घोडबंदर परिसरातील हावरे सिटी गृहसंकुलातील रहिवाशांना गेल्या तीन वर्षांपासून पाणी, रस्ता यासारख्या प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या रहिवाशांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. विकासकामांसाठी (डेव्हलपमेंट चार्जेस) बांधकाम व्यावसायिकाने दोन लाख रुपये घेऊनसुद्धा कोणतीही विकासकामे न केल्याने रहिवाशांनी मोर्चेकऱ्यांनी बिल्डरविरोधातही संताप व्यक्त केला.