नवी दिल्लीतील मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे ते तक्रार करणार आहेत.
भाजपने एका बोगस मतासाठी पंधराशे रुपयांचे आमिष दाखवले असून, ‘आप’च्या सहानुभूतीदारांची नावे वगळण्यासाठी प्रत्येक मताला दोनशे रुपये देऊ केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच हजार बोगस मतदार नोंदवा, असा आदेश एका ज्येष्ठ भाजप नेत्याने पक्षाच्या दिल्लीतील सर्व आमदारांना दिल्याचा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी केला. हेच काम केलेल्या व्यक्तीने ही माहिती दिल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. सोमवारी याबाबत तक्रार करणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.