युती टिकवायची असेल तर अंतिम प्रस्ताव न पाठवता मित्रपक्षाने सरळ चर्चेला यावे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला सुनावले. रविवारी सकाळी शिवसेनेच्यावतीने देण्यात आलेल्या ११९ जागांच्या प्रस्तावाला उत्तर देताना खडसे पत्रकार परिषदेत बोलत होते. यामध्ये भाजपचा जोर हा शिवसेनेने कधीही न जिंकलेल्या ५९ जागांवर होता.  मोंदी यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य  खपवून घेतले जाणार नाही आणि प्रत्येकवेळी भाजप माघारदेखील घेणार असल्याचा सूचक इशारा यावेळी एकनाथ खडसे यांनी यावेळी दिला.
युती तोडण्याची दोन्हीही पक्षांची इच्छा नसून चर्चेतून तोडगा निघेल अशी आशा भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केली. शिवसेना-१५१, भाजप-११९ आणि मित्रपक्ष-१८ जागा असा अखेरचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सकाळी भाजपसमोर ठेवला होता.  या प्रस्तावाला प्रतिसाद म्हणून शिवसेना-१४०, भाजप-१३० आणि मित्रपक्ष-१८ असा नवा प्रस्ताव भाजपने पुढे केला आहे.