केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल होऊन निवडणूक लढलेल्या व जिंकलेल्या आयारामांना फडणवीस सरकारात मंत्रीपदे मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. निवडून येणे या एकाच निकषावर अन्य पक्षांतील काही नेत्यांना पक्षात घेतले असले तरी, ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचे किंवा भष्टाचाराचे आरोप आहेत, अशांची मंत्रीपदावर वर्णी लावण्याबाबत भाजपने सावध पवित्रा घेतला असून आयारामांना मंत्रीपदापासून दूरच ठेवले जाणार असल्याचे समजते.  
ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जागावाटपावरुन शिवसेनेशी संघर्ष सुरु झाला, त्याचवेळी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील तगडय़ा नेत्यांना गळ टाकून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्वाधिक राष्ट्रवादीमधील बडे मासे गळाला लागले. त्यात बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित, संजय सावकारे, मंदा म्हात्रे, लक्ष्मण जगताप, अजित घोरपडे, डॉ. सुनील देशमुख आदींचा समावेश आहे. तेलगी घोटाळा प्रकरणी आरोप असलेले अनिल गोटे, गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेले शिवाजीराव कर्डिले, मारहाण, दमदाटीचे आरोप असलेले मनसेचे राम कदम अशा मंडळींना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यातील काहीजिंकले व काही हरले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले विजयकुमार गावित व बबनराव पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. पाचपुचे निवडणुकीत हरले, परंतु गावित निवडून आले आहेत. संजय सावकारेही विजयी झाले. मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केल्याने त्यांचा भाव वाढला आहे. घोरपडे पराभूत झाले, पण सुनील देशमुख विजयी झाले. गोटे, कर्डिले, जगताप हेही निवडून आले. भाजपने आयारामंची फौज निवडणुकीत उतरवली त्यावेळी चहुबाजूंनी टीका झाली होती. परंतु केवळ लंकादहनासाठीच आम्ही या बिभीषणांना सोबत घेतले असून निवडून येण्याच्या निकषावर ही राजकीय खेळी केल्याचे त्यावेळी भाजप नेत्यांनी सांगितले होते. मात्र आता या आयारामांनीही मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. सरकार स्थापनेच्या प्रारंभालाचा वादाचे शिंतोडे उडायला नकोत, म्हणून तुर्तास तरी आयारामांना सत्तापदांपासून दूर ठेवण्याचा विचार केला जात आहे. मात्र, एखाद दुसरा अपवाद करुन वादग्रस्त नसलेल्या आयाराम आमदाराची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष प्रतिनिधी, मुंबई
केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल होऊन निवडणूक लढलेल्या व जिंकलेल्या आयारामांना फडमवीस सरकारात मंत्रीपदे मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. निवडून येणे या एकाच निकषावर अन्य पक्षांतील काही नेत्यांना पक्षात घेतले असले तरी, ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचे किंवा भष्टाचाराचे आरोप आहेत, अशांची मंत्रीपदावर वर्णी लावण्याबाबत भाजपने सावध पवित्रा घेतला असून आयारामांना मंत्रीपदापासून दूरच ठेवले जाणार असल्याचे समजते.  
ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जागावाटपावरुन शिवसेनेशी संघर्ष सुरु झाला, त्याचवेळी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील तगडय़ा नेत्यांना गळ टाकून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्वाधिक राष्ट्रवादीमधील बडे मासे गळाला लागले. त्यात बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित, संजय सावकारे, मंदा म्हात्रे, लक्ष्मण जगताप, अजित घोरपडे, डॉ. सुनील देशमुख आदींचा समावेश आहे. तेलगी घोटाळा प्रकरणी आरोप असलेले अनिल गोटे, गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेले शिवाजीराव कर्डिले, मारहाण, दमदाटीचे आरोप असलेले मनसेचे राम कदम अशा मंडळींना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यातील काहीजिंकले व काही हरले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले विजयकुमार गावित व बबनराव पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. पाचपुचे निवडणुकीत हरले, परंतु गावित निवडून आले आहेत. संजय सावकारेही विजयी झाले. मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केल्याने त्यांचा भाव वाढला आहे. घोरपडे पराभूत झाले, पण सुनील देशमुख विजयी झाले. गोटे, कर्डिले, जगताप हेही निवडून आले. भाजपने आयारामंची फौज निवडणुकीत उतरवली त्यावेळी चहुबाजूंनी टीका झाली होती. परंतु केवळ लंकादहनासाठीच आम्ही या बिभीषणांना सोबत घेतले असून निवडून येण्याच्या निकषावर ही राजकीय खेळी केल्याचे त्यावेळी भाजप नेत्यांनी सांगितले होते. मात्र आता या आयारामांनीही मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. सरकार स्थापनेच्या प्रारंभालाचा वादाचे शिंतोडे उडायला नकोत, म्हणून तुर्तास तरी आयारामांना सत्तापदांपासून दूर ठेवण्याचा विचार केला जात आहे. मात्र, एखाद दुसरा अपवाद करुन वादग्रस्त नसलेल्या आयाराम आमदाराची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.