बहुजन समाजाच्या मतांसाठी २००४ मध्ये जेम्स लेनच्या पुस्तकाच्या विरोधात काहूर माजवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयोग यशस्वी झाला होता. आताही जोशी सरकार किंवा गडकरी, फडणवीस, जावडेकर यांना महत्त्व देणार का, असा उल्लेख करीत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा पद्धतशीर प्रयोग राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केला आहे.
राज्यात ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद जुनाच आहे. पुन्हा एकदा या वादात हळूवारपणे काडी घालण्याचे उद्योग निवडणुकीच्या तोंडावर सुरू झाले आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनच्या पुस्तकाचा मुद्दा प्रचारात प्रामुख्याने हाती घेतला होता. लेनच्या पुस्तकावरून वाद होताच पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला झाला होता. या वादाला राष्ट्रवादीने तेव्हा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा रंग देण्याचा प्रयत्न केला होता. २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत मराठा आणि बहुजन समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा पवार यांचा प्रयत्न यशस्वी झाला होता. तेव्हा राष्ट्रवादीला सर्वाधिक ७१ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादीकडून ब्राह्मण समाजाच्या विरोधात वातावरण तापविण्यात येत असल्याबद्दल पक्षाचे तत्कालीन प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन (आता काँग्रेसमध्ये) यांनी पवार यांना पत्र पाठवून नापसंती व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर आताही मतांच्या ध्रुवीकरणाचा हाच प्रयोग सुरू झाला आहे. दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यात शरद पवार यांनी हळूवारपणे या मुद्दय़ाला स्पर्श केला.
१९९५ मध्ये जोशी सरकारच्या कारभाराचा राज्यातील जनतेने धसका घेतला होता, असा उल्लेख पवार यांनी केला. गडकरी-जावडेकर-फडणवीस यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपविणार का, असा अप्रत्यक्ष सवालच पवार यांनी कोल्हापूरमध्ये केला. बहुजन समाजाच्या मतांचे राष्ट्रवादीच्या बाजूने ध्रुवीकरण व्हावे या त्यामागचा उद्देश असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.

Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…
Manoj Jarange SIT Inquiry
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; भाजपाच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश
Jay pawar
पवार कुटुंबीय अजित पवारांचा प्रचार करणार नाहीत? जय पवार म्हणाले, “परिवारात प्रत्येकजण…”
jayant chaudhary
दहा दिवसांनंतरही रखडतोय RLD चा NDA प्रवेश; भाजपाच्या मनात नेमके काय?