पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआतील घटकपक्षांना स्न्ोहभोजनाचे निमंत्रण दिले असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ते दिलेले नाही. त्यामुळे २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दिवाळी स्न्ोहभोजनास ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता नसून शिवसेना खासदार मात्र आवर्जून जाऊन भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. भाजप नेतृत्वाला अफझलखानाची उपमा दिल्यावर आणि दिल्लीश्वरांपुढे झुकणार नाही, अशा वल्गना केल्यावरही शिवसेना खासदार मात्र त्यांच्याच पंगतीत मांडीला मांडी लावून बसणार आहेत.
मोदी यांनी संसदीय शिवसेना पक्षाला स्न्ोहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील संबंध ताणले गेले व युती तुटली. ठाकरे यांनी मोदी, अमित शहा व भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपबरोबर सत्तेत सहभागी होऊन पािठबा देण्याचाही निर्णय शिवसेनेने अजून जाहीर केलेला नाही. या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांना मोदी यांच्याकडून गुरुवारी रात्रीपर्यंत तरी स्न्ोहभोजनाचे आमंत्रण देण्यात आले नव्हते. रालोआतील अन्य पक्षांचे प्रमुख हे खासदारही असल्याने त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. शिवसेनेच्या खासदारांना उशिरा निमंत्रण दिल्याने ते मिळणार की नाही, ही चिंता अनेकांना भेडसावत होती. मात्र पक्षप्रमुखांना आमंत्रण नसतानाही शिवसेना खासदार स्न्ोहभोजनास जाणार आहेत. वास्तविक भाजप शिवसेनेला भीक घालत नसताना स्वाभिमान जपण्यासाठी स्न्ोहभोजनास न जाण्याची भूमिका घ्यावी, असे काही शिवसेना नेत्यांना वाटत होते. मात्र राज्यातील सत्तेत सहभागी होण्यासाठी आसुसलेल्या नेत्यांची मात्र मोदी यांची उगाच खप्पा मर्जी नको, अशी भूमिका आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वाला आमंत्रण नसतानाही खासदार भोजनासाठी जाण्यास तयार झाले आहेत.शिवसेनेबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी ठाकरे यांना स्न्ोहभोजनास निमंत्रित करणे गरजेचे होते, असे काही शिवसेना नेत्यांना वाटत आहे. मात्र सध्या भाजप शिवसेनेला फटकारत असल्याने व स्वबळावर सत्ता स्थापन करीत असल्याने जाणीवपूर्वक ही वागणूक दिल्याची भावना शिवसेनेत आहे.
‘आनंदाची गोष्ट आहे’
ठाकरे यांच्यासंदर्भात मला काहीही माहीत नाही. मात्र पंतप्रधानांचे आमंत्रण ही आनंदाची बाब आहे. रालोआच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी आहे. महाराष्ट्रातील घटना वेगळ्या असल्या तरी स्न्ोहभोजनास जाण्यामध्ये कोणतीही राजकीय अडचण नाही, असे प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले.