वानखेडे स्टेडियमव आज, शुक्रवारी होणारा नव्या सरकारच्या राज्यारोहण सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांच्या साथीला गुजरात पोलिसांचा फौजफाटाही येणार आहे. एकूण अडीच हजार पोलीस व अधिकारी या शाही शपथविधी सोहळ्यासाठी बंदोबस्तावर असतील. दीड हजार वाहतूक पोलिसांनाही यासाठी पाचारण करण्यात आले असून स्टेडियम परिसरात ‘नो पार्किंग व नो फ्लाइंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) धनंजय कमलाकर आणि सहपोलीस आयुक्त (वाहतूक) बी. के. उपाध्याय यांनी ही माहिती दिली.
*अडीच हजार पोलीस कर्मचारी
*एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, सात पोलीस उपायुक्त, २५० अधिकारी
*पंतप्रधानांचे विशेष सुरक्षा पथक (एसपीजी), शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा
*वाहतूक पोलिसांनी स्टेडियमचा परिसर तसेच विमानतळापासून स्टेडिमयपर्यंता रस्ता मोकळा ठेवण्यासाठी हा मार्गही नो पार्किंग झोन म्हणून घोषित
*एक हजार वाहतूक पोलीस, शंभर वाहतूक पोलीस दलातील अधिकारी तसेच ४० रायडर्स स्टेडिमयबाहेरील वाहतूक व्यवस्था पाहतील
*प्रवेशिकेशिवाय कोणालाही कार्यक्रमस्थळी प्रवेश नाही
*मोबाइलव्यतिरिक्त इतर अन्य सामान आणण्यासाठी बंदी
*स्टेडियम परिसरात २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण स्टेडियमवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
निमंत्रितांची मांदियाळी
*सोहळ्यासाठी ३० हजार निमंत्रित येणार
*त्यातील पाच हजार जणांची व्हीव्हीआयपी स्टेडियममध्ये आणि इतर स्टेडियममध्ये बसण्याची व्यवस्था
*निमंत्रितांना दुपारी ४ पासून सुरू होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या दोन तास आधी आसनस्थ होण्याचे आवाहन
*शहरातही नाकाबंदी करून चोख सुरक्षा ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले.