अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? हा सवाल महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत वारंवार विचारला गेला. निवडणुक प्रचारातील या मुद्यावरून महाराष्ट्राचा नकारात्मक प्रचार चालवल्याबद्दल सर्वच पक्षांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. परंतु रविवारी हाती आलेल्या निकालानंतर भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता सोशल मिडियावर भाजप समर्थक इतर पक्षांना, ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय …?’ हा सवाल विचारत आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त खिल्ली उडवली जात आहे, ती म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. संपूर्ण सत्तेची मागणी करणा-या राज ठाकरेंच्या मनसेला केवळ एक जागा मिळाली आहे. तसेच स्वबळावर सत्ता आणण्याची बाता करणा-या शिवसेनेलाही केवळ ६०-६२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अशा परिस्थितीत सोशल मिडियावर या सवालाशी निगडीत आणि इतर नेते, पक्षांबाबत सर्वत्र फिरत असलेल्या काही निवडक प्रतिक्रिया येथे देत आहोत.

  • अरे कुठे नेऊन ठेवलंय मनसेला?
  • मुंबई, ठाण्यात, नाशिकमध्ये मनसेचा पराभव. हो, हे शक्य आहे.
  • निकालानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया… मतमोजणी निकाल चुकीच्या दिवशी आहे.
  • अर्ध्या किमतीत फटाके हवेत का? नारायण राणे यांच्या घरी मिळतील.
  • सध्या दोन गोष्टींना काहीच किंमत राहिली नाही. बाजारात चार आणे. राजकारणात नारायण राणे.
  • नारायण राणे विचारताय… आमदारकीलासुध्दा पडलो. आता काय नगरसेवक बनू?
  • आज (रविवार) रेल्वेचा मेगाब्लॉक आहे त्यामुळे आमचं इंजिन हळुहळू चालतंय, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर दिली आहे.
  • राज ठाकरेंचं ध्येय आता केवळ – बीग बॉस सीझन ९.
  • कॅलिफोर्नियातून रामदास आठवले आघाडीवर.

     

नव्या सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी उद्धव महाराजांनी भाजपा श्रेष्ठींसमोर बोलायचे संवाद संजय राऊत यांनी आधीच लिहून काढले आहेत. त्यातला काही भाग आताच हाती लागला;
१. झाले गेले गंगेला मिळाले.
२. आम्ही मराठी जनहिताच्या तळमळीतून बोललो. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व!
३. कमाल करता, २५ वर्षाची मैत्री चहाच्या कपातल्या वादळाने कशी तुटेल हो?
४. हे सगळे माध्यमांचे कारस्थान. आपल्या आंतरिक नात्याची मुळे किती खोलवर पसरली आहेत हे माध्यमांना कुठे ठाऊक आहे.
५. व्यापक देशहितासाठी आपण एकत्र आलो आहोत आणि पुढेही राहू; कोण आपल्या मैत्री आड येतो ते बघतोच आता आम्ही.
६. सेक्युलरवाले मूर्खाच्या नंदनवनात नाचताहेत. दोन हिंदू संघटना आपसात लढताहेत याचा आनंद आपण सेक्युलरवाल्यांना होऊ देता कामा नये.
७. मराठी हिताच्या चळवळीला तुम्ही आम्हाला वेळोवेळी मनापासून साथ दिली आहे हे आम्ही जाणून आहोत. यापुढेही तुम्ही अशी साथ द्याल याची आम्हाला खात्री आहे. ते अफझल खान वगैरे गमतीने म्हटले हो, विसरून जा.
८. चला, आता महालक्ष्मी रेसकोर्सवर, बोलवा तुमच्या अमितभाईना. युतीचे पुनरुज्जीवन, एकत्र गरबा खेळून साजरे करूया म्हणावं.