अंधेरी पश्चिमच्या वर्सोवा मतदारसंघातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी निवडणूक आयोगाने फेटाळला. राजूल पटेल यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र न जोडल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. पटेल यांनी उच्च न्यायालयात यासंबंधी दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
वर्सोवा मतदारसंघातून भाजपच्या भारती लव्हेकर, काँग्रेसकडून विद्यमान आमदार बलदेव खोसा, नरेंद्र वर्मा राष्ट्रवादी तर मनसेकडून मनिष धुरी यांना उमेदवारी मिळाली आहे.