राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात एकूण १० जाहीर सभा घेतल्या होत्या. ब्रम्हपुरी, गोंदीया, कोल्हापूर आणि औरंगाबाद या चार ठीकाणी सोनियांनी तर, औसा, महाड, दिंडोरी, सासवड, रामटेक आणि बुलढाणा या सहा ठीकाणी राहुल गांधींनी काँग्रेसच्या प्रचाराचा धुरळा उडवला होता.
सोनिया, राहुल यांनी सभा घेतलेल्या ठिकाणांपैकी ब्रम्हपुरी, गोंदिया, बुलढाणा, औसा या केवळ चार मतदार संघातच काँग्रेसला यश मिळाले तर, चार जागी काँग्रेस उमेदवार दुसऱया स्थानी, चार जागांवर तिसऱया व एका जागी चौथ्या स्थानावर काँग्रेसला समाधान मानावे लागले. एकूण १३ मतदार संघांपैकी काँग्रेस पराभूत झालेल्या ९ जागांमध्ये चार जागा शिवसेनेने, तीन भाजपने तर एक जागा एमआयएमने खिशात घातली आहे.