शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवलेल्या भाजपने महाराष्ट्राचा गड काबीज करण्यासाठी यावेळी स्वत:ची संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात २७ ठिकाणच्या प्रचारसभा भाजपच्या निवडणूक प्रचाराच्या मुख्य केंद्रबिंदू ठरल्या होत्या. नेमक्या ठिकाणी मोदींच्या सभा आयोजित करून आजुबाजूच्या मतदारसंघातही त्याचा फायदा मिळविण्याची भाजपची रणनिती होती. मात्र, निवडणुकांचे निकाल पाहता, भाजपला मोदींच्या व्यक्तिगत करिष्म्याचा अपेक्षेइतका उपयोग झालेला दिसत नाही. ४ ऑक्टोबर रोजी बीड येथून सुरू झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभांची सांगता १३ ऑक्टोबर रोजी कोकणात झाली. भाजपच्या २८८ पैकी तब्बल ११६ उमेदवारांच्या विजयासाठी भाजपने आपल्या भात्यातील ‘मोदीअस्त्राचा’ प्रयोग केला होता. मात्र, यापैकी फक्त ४६ उमेदवारांनाच विजय मिळाल्याने महाराष्ट्रातील भाजपच्या यशात नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक करिष्म्याचा भाग किती, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

१.पालघर
डहाणू­ – पासकल धनारे- पराभूत
विक्रमगड­ – विष्णू सावरा- विजयी
पालघर­- दीपा संके- पराभूत
बोईसर­- जगदीश धुरी-पराभूत
नालासोपारा- राजन नाईक- पराभूत
वसई­- शेखर धुनी- पराभूत

२. रत्नागिरी<br />रत्नागिरी – सुरेंद्र माने- पराभूत
दापोली­- केदार साठे- पराभूत
गुहागर- ­ डॉ. विनय नातू- पराभूत
चिपळूण­- माधव गवळी- पराभूत
राजापूर- ­ संजय यादव- पराभूत

3. कणकवली
कणकवली- ­ प्रमोद जठार- पराभूत
कुडाळ ­- विष्णू मोडकर- पराभूत
सावंतवाडी – ­ राजन तेली- पराभूत

४. बोरीवली
बोरीवली­ – विनोद तावडे- विजयी
दहिसर- मनीषा चौधरी- विजयी
मागाठणे- हेमेंद्र मेहता- पराभूत
चारकोप- योगेश सागर- विजयी
जोगेश्वरी पूर्व- उज्वला मोडक- पराभूत
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर- विजयी

५. ठाणे<br />ठाणे­- संजय केळकर- विजयी
कल्याण पश्चिम- ­नरेंद्र पवार- विजयी
कल्याण पूर्व­- यशवंत गवळी- पराभूत
मुंब्रा­कळवा­- अशोक भोईर- पराभूत

६. पंढरपूर- ­ प्रशांत प्रभाकर (स्वाभिमानी शेतकरी)- पराभूत

७. तुळजापूर­- संजय निंबाळकर- पराभूत

८. राहूरी­- शिवाजीराव कार्डिले- विजयी

९. नाशिक­ सर्व उमेदवारांसाठी- ३५ पैकी १४ उमेदवार विजयी

१०. नागपूर­
देवेंद्र फडणवीस- विजयी
सुधाकर कोल्हे- विजयी
कृष्णा हेगडे- विजयी
विकास कुंभारे- विजयी
सुधाकर देशमुख-विजयी

११. जळगाव­
जळगाव शहर­- राजूमामा भोले- विजयी
जळगाव ग्रामीण- ­ पी. सी. आबा पाटील- पराभूत

१२. सिंदखेडराजा-­ गणेश मांन्टे- पराभूत
१३. पुणे­ (सर्व उमेदवार)- सर्व आठ उमेदवार विजयी

१४. कोल्हापूर­
चंदगड-­ राजेंद्र शामराव गाद्यानावर (स्वाभिमानी)- पराभूत
राधानगरी­ – जालिंदर गणपती पाटील (स्वाभिमानी)- पराभूत
कोल्हापूर दक्षिण­- अमोल महा़डिक- विजयी

१५. तासगाव­-कवठेमहांकाळ­ अजित घोरपडे- पराभूत

१६. महालक्ष्मी­ दक्षिण- मुंबईतील उमेदवार
कुलाबा- राज पुरोहित- विजयी
मुंबादेवी- अतुल शहा- पराभूत
मलबार हिल- मंगलप्रभात लोढा- विजयी
भायखळा- मधु चव्हाण- पराभूत
वांद्रे पश्चिम- आशिष शेलार- विजयी
वरळी- सुनिल राणे- पराभूत
शिवडी- शलका साळवी- पराभूत
१७. हिंगोली­- तानाजी मुटकुळे- विजयी

१८. धामणगाव रेल्वे- ­ अरुण अडसद- पराभूत

१९. घाटकोपर­
घाटकोपर पश्चिम-­ राम कदम- विजयी
घाटकोपर पूर्व-­ प्रकाश मेहता- विजयी

२०. खामगाव­ आकाश फुंडेकर- विजयी

२१. चंद्रपूर-­ नाना शामकुळे- विजयी

२२. धुळे­
साक्री-­ मंजुळा गावित- पराभूत
धुळे ग्रामीण-­ मनोहर भदाणे- पराभूत
धुळे शहर­- अनिल गोटे- विजयी

२३. बीड­ परळी-­ पंकजा मुंडे­- विजयी

२४. बारामती­- बाळासाहेब गावंडे- पराभूत

२५. बुलढाणा­- योगेंद्र गोडे- पराभूत