अमित शहा यांनी राष्ट्रीय राजकारणात येऊन भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, त्यास तीन वर्षे होत आहेत. या काळात पक्षाची बिहारसह अनेक राज्यांत विजयी घोडदौड झालीच, पण सरकारच्या ध्येयधोरणांशी आणि योजनांशी जनसामान्यांना जोडणारा सेतूही पक्षाकडून उभारला गेला..

अमितभाई शहा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून तीन वर्षे पूर्ण करत आहेत. हीच तीन वर्षे भाजपच्या इतिहास आणि भूगोलात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी ठरली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी गाथा लिहिली गेली, त्याच  गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपली आगळी कार्यशैली आणि नेतृत्वक्षमता यांच्या जोरावर नवा अध्याय लिहिला.

Sharad pawar
“५६ वर्षांत मी एकही सुट्टी घेतली नाही”, शरद पवारांचं विधान चर्चेत; म्हणाले, “शेतकरी आपल्या बैलाला…”
Devendra Fadnavis expressed the opinion that by leaving the BJP other parties split
भाजपसोडून अन्य पक्ष फुटले – फडणवीस
Parshottam Khodbhai Rupala
मोले घातले लढाया: उमेदवारी वादात
Vikramsingh Sawant
मैत्रीपूर्ण की बंड : चार दिवसांत निर्णय – आमदार सावंत

तसे पाहू जाता, राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवल्यावर पहिल्याच दिवसापासून अमितभाईंची अग्निपरीक्षा सुरू झाली होती; कारण त्यांना देशातील सर्वात मोठय़ा राज्याची- उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या राज्याचे प्रभारी असताना अशक्यकोटीतील काम त्यांनी पूर्ण करून दाखविले. गेल्या तीन वर्षांतही पक्षाचा केवळ जनाधारच वाढलेला नाही, तर अनेक राज्यांत भाजपची सरकारे स्थापन झाली. आज १३ राज्यांमध्ये पक्षाचे सरकार आहे, पाच राज्यांत पक्षाने अन्य पक्षाशी आघाडी केली आहे. एकंदर १३८७ आमदार, ३३०हून अधिक खासदार आणि ११ कोटी कार्यकर्ते असलेला भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमितभाई शहा तीन वर्षे पूर्ण करीत आहेत.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे तिघेही त्याच पक्षाचे, यापेक्षा अभिमानाची बाब कुठल्याही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी आणखी कोणती असू शकेल? विशेषत: २०१४ मध्ये भाजपसाठी असा विचार करणे हेसुद्धा स्वप्नवत होते. परंतु अमितभाई शहा यांच्या कार्यकाळात आणि मोदीजींच्या सेवाकाळात ही सुसंधी कार्यकर्त्यांना आणि देशाला पाहावयास मिळाली.

आमच्याबद्दल एक म्हणच रूढ झाली होती, आमचे मित्रदेखील हास्यविनोदात म्हणत असत की, ‘बीजेपी के तीन काम, भोजन, बैठक और विश्राम’. पण मोदीजी आणि अमितभाई यांनी मिळून हे मिथक तोडले आणि पक्षाच्या सर्व पातळ्यांमध्ये कायावाचामने कार्यान्वित होण्याची भावना जागविली. सहसा सरकार स्थापनेनंतर पक्ष संघटना गौण ठरत जाते, परंतु अमितभाईंनी पक्ष संघटनेचे केवळ महत्त्वच वाढविलेले नसून पक्ष संघटना आणि सरकार यांच्यामध्ये प्रभावी समन्वयही स्थापित केलेला आहे. कोणत्याही विषयाचा खोलात जाऊन अभ्यास, राजकीय लाभ-हानीचे आकलन आणि मग तात्काळ निर्णय घेऊन त्यापासून मागे न हटता ठाम राहणे, ही आगळी कार्यशैलीच अमितभाईंची विशेषज्ञता ठरली आहे. त्यांच्या अनेक निर्णयांनी फक्त राजकीय विश्लेषकांनाच बुचकळ्यात टाकले असे नव्हे; तर विरोधकांना चारीमुंडय़ा चीतही करून टाकले. ‘मिस्ड कॉल’च्या माध्यमातून पक्षविस्ताराच्या कार्यक्रमाचा विचार जेव्हा जन्मला, तेव्हा विरोधाचे सूरही उमटले होते. परंतु अमितभाईंचा विश्वास इतका की त्याचमुळे आज ११ कोटींहून अधिक कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले आहेत. अनेक जण त्यांना कडक प्रशासक म्हणून ओळखतात, पण फार कमी लोकांना माहीत आहे की, त्यांची आध्यात्मिक आणि स्वाध्यायाची बाजूही मजबूत आहे आणि तिची झळाळी त्यांच्या संबोधनांत (भाषणांत) आणि निर्णयांमध्ये स्पष्ट दिसते.

ही गोष्ट आहे २०१४ सालची. भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रात ३० वर्षांनंतर प्रथमच पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाल्याने भारतीय राजकारणातच एक अभूतपूर्व परिवर्तन घडू लागले. भारताच्या इतिहासात ही घटना नि:संशय ऐतिहासिकच होती. हे एक असे स्वप्न होते ज्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच भाजपलाही एका नव्या युगाची सुरुवात करून दिली. पण ज्या राज्यातील विजयाने दिल्लीत सरकार स्थापण्याचा मार्ग मोकळा केला तो देशातील सर्वात मोठा प्रांत होता उत्तर प्रदेशचा. एरवीही भारतीय राजकारणात, ‘दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो’ हे म्हणणे प्रख्यातच आहे. उत्तर प्रदेशातील एकंदर ८० पैकी ७३ लोकसभा जागा भाजप व मित्रपक्षांनी जिंकून विरोधी पक्षांचा ‘सुपडा साफ’ केला, याचे श्रेय अमितभाईंच्या रणनीतीला व परिश्रमांना जाते, कारण उत्तर प्रदेशचे प्रभारी या नात्याने त्यांनी जात-वाद आणि (भौगोलिक) विभाग-वादाने जखडलेल्या राजकारणावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला होता, सप-बसपच्या जातवार सापळ्यात कैक दशके अडकलेल्या प्रदेशात त्या दोन्ही पक्षांना धूळ चारली. बसप तर खातेही उघडू शकली नाही आणि सपचा विस्तार कुटुंबापुरताच उरला. हळूहळू पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भाजपचे कमळ उमलू लागले. जे काम भारतीय राजकारणात कालपर्यंत कठीण वाटत होते, ते अमितभाईंच्या कुशल रणनीती आणि मॅनेजमेंटमुळे प्रत्यक्षात साध्य झाले.

अमितभाई शहा यांनी भाजपची विचारधारा आणि मोदी सरकारची ध्येयधोरणे यांना जनसामान्यांपर्यंत नेऊन भिडविण्याचे काम केले. निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी मतदान केंद्राच्या पातळीवरील व्यवस्थापन गरजेचे असते, याची माहिती अमित शहा यांना होतीच. त्यांनी वेळ न दवडता संघटनेला मजबूत करणे सुरू केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कच्छपासून कामरूपपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चारही दिशांत भाजपचा बिगूल वाजू लागला. सन २०१७ मध्ये पाच राज्यांत (विधानसभा) निवडणूक झाली, त्यांपैकी चार राज्यांत भाजपने विजय मिळविला. आज देशाच्या जवळपास सर्वच मोठय़ा राज्यांत- उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात देखील भाजपची सरकारे जनसेवेसाठी कटिबद्ध आहेत. जम्मू-काश्मीर, आसाम आणि मणिपूरमध्ये तर स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच भाजपच्या आघाडीने सरकार स्थापले. ज्या महाराष्ट्रात याआधी आम्ही (विधानसभेच्या) ११९ जागाच लढवत होतो, तेथे शहा यांच्या पुढाकारानंतर पक्षाने १२३ जागा जिंकल्या. भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. याच प्रकारे झारखंडमध्येही एक लोकप्रिय सरकार स्थापन झाले. केरळच्या विधानसभेत स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच भाजपने आपली उपस्थिती नोंदविली. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच आम्ही लक्षणीय म्हणावी अशी उपस्थिती नोंदविण्यात यशस्वी झालो. पूवरेत्तर (ईशान्येकडील) चार राज्यांत आज भाजप आणि मित्रपक्षांची सरकारे आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, चंडीगढ, हरियाणा, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल आणि ओडिशात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही भाजपला अभूतपूर्व यश मिळालेले आहे.

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाच्या करिष्म्याने जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि कूटनीतीमध्ये त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. ‘न्यू इंडिया’कडे वाटचाल करीत असलेल्या देशाचे सरकार, साहसी निर्णय घेऊन ‘उद्या’ची पाने सुवर्णाक्षरांत लिहिते आहे. त्यांच्या जोडीनेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या नेतृत्वातून सरकारची नीती, निर्णय आणि नियोजन यांना मतदान केंद्र पातळीपर्यंतच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सेतू उभारण्याचे काम करत आहेत.

सरकार अनेक कल्याणकारी योजना आखते, पण जनसामान्यांपर्यंत त्या पोहोचवण्यात संघटनेचा वाटा मोठा असतो. मोदी सरकारने लोककल्याणासाठी आखलेल्या नीतीतील विशेषत: जन-धन, जन-सुरक्षा, पीक विमा, मुद्रा योजना, आरोग्यविमा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छता अभियान, पंडित दीनदयाल ग्राम विद्युतीकरण योजना यांसह ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान हे सारे अधिक चांगला ताळमेळ राखून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी, जीएसटी आणि काळ्या पैशाविरुद्ध केंद्र सरकारने आखलेल्या मोहिमांचा प्रचार पक्षाने चांगल्या प्रकारे केला.

अमितभाई शहा यांनी संघटना विस्तारासाठी ११० दिवसांचा विस्तृत प्रवास कार्यक्रम सुरू केला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षांत प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाला मजबूत बनविले. परिणामी आज चार लाखांहून अधिक कार्यकर्ते १५ दिवस, सहा महिने किंवा वर्षभरासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून देशभरातील मतदान केंद्र- पातळीवर पक्षकार्य करीत आहेत.

स्वत: अमितभाई शहा यांनीही १५ दिवस पूर्ण वेळ प्रवास करून पश्चिम बंगाल, ओडिशा, केरळ, तेलंगणा आणि लक्षद्वीप येथील मतदान केंद्र पातळीवर भेटी दिल्या.

पक्षकार्यकर्त्यांसाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि मंडल (ब्लॉक) पातळीवर प्रशिक्षण शिबिरे लावणे, हाही अमितभाई शहा यांच्याच रणनीतीचा भाग होता. सुमारे आठ लाखांहून अधिक कार्यकर्त्यांना या शिबिरांतून प्रशिक्षण मिळाले.

संघटन करण्यासाठी महत्त्वपूर्ण असे अंतिम एकक म्हणजे मतदान केंद्रे, त्यातीलही प्रत्येक केंद्राच्या मतदारयादीचे ‘पृष्ठ प्रमुख’ नेमून त्यांची संमेलने भरविण्याचा आगळा प्रयोग, हा अमितभाईंचा निर्णय युगान्तरकारी होता.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहा यांनी दररोज सरासरी ५४१ किलोमीटरहूनही अधिक प्रवास केला आहे. हा प्रवास अंदमान-निकोबारपासून गुवाहाटीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक ठिकाणचा होता. एवढेच नव्हे तर राज्य विधानसभांच्या निवडणुकांदरम्यान त्यांनी सुमारे ५०० सभा घेतल्या. त्यांच्या अथक परिश्रमांनी आणि नेतृत्वामुळे मतदान केंद्र या एककापर्यंत सारे जण मैदानात उतरून सक्रिय झाले. भाजपच्या विस्ताराचा त्यांचा निरंतर प्रयत्न आजही सुरूच आहे. या अथक कार्यक्रमांनंतर, दौऱ्यांनंतर आणि प्रवासानंतर देखील अमित शहा आपल्या भाषणांत नेहमीच सांगतात की, अद्याप भाजपचे सुवर्णयुग येणे बाकी आहे.

कवी पंजवार यांच्या या हिंदी काव्यपंक्ती अमितभाईंना चपखल लागू पडतात :

आंधियों में दीप बनकर, जलते जाना जिंदगी है,

पत्थरों को तोडम्, निर्झर का निकलना जिंदगी है।

सोचता हूँ दो घडम्ी छाया तले, विश्राम कर लूँ,

किंतु कोई कह रहा, दिन रात चलना जिंदगी है ।

लेखक भाजपच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख आहेत.

शेती.. गती आणि मतीहे खासदार राजू शेट्टी यांचे सदर अपरिहार्य कारणांमुळे आजच्या अंकात नाही