शरीर, मन, बुद्धी यांचा विकास करीत राष्ट्रीय वृत्तीचे नागरिक घडविणारे माध्यम म्हणजे शिक्षण, अशी शिक्षणविषयक संकल्पना मांडली जाते. पण आज ही संकल्पना शिक्षणाचे खाजगीकरण होण्याच्या पाश्र्वभूमीवर लोप पावत चालल्याचे दृष्टीस पडते. पण सारेच दीप विझू लागलेले असतानाही आपल्या अटळ मार्गाने शिक्षणाची पणती तेवत ठेवत ज्ञानमार्ग प्रशस्त करणारी सेवाग्रामची नई तालीमप्रणीत आनंद निकेतन विद्यालय आदर्शाचा मापदंड ठरावी.

महात्मा गांधी म्हणत नई तालीम ही माझी देशाला सर्वोत्तम देणगी होय. नई तालीम म्हणजे काय? ज्याची परिणती आनंदात होते, असे ज्ञान व कर्म यांचे एकीकरण, अशा शब्दांत आचार्य विनोबाजींनी या शिक्षणाचे सूत्र मांडले आहे. शिक्षण व्यवस्थेचा विचार करताना सामाजिक व राष्ट्रहित आणि व्यक्तिगत विकास, याचा एकत्रित विचार करावा लागतो. हा विचार प्रधान ठेवून नई तालीम शाळा कार्यरत आहे.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
selfie parent letter cm eknath shinde
सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
CM order to MHADA take action against developers contractors who do not complete housing projects on time
गृह प्रकल्प वेळेत पूर्ण न करणारे विकासक, कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे म्हाडाला निर्देश
Jayant Patil son
जयंत पाटील यांना मुलाच्या राजकीय भवितव्याची काळजी

नोकरदार नव्हे स्वतंत्र उद्योजक

आज या शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंतची अडीचशे मुले शिकतात. येथील विद्यार्थी नोकरदार होण्यापेक्षा स्वतंत्र उद्योग करण्याचा आत्मविश्वास बाळगणारे व्हावेत, अशी अपेक्षा ठेवून त्यांना बाळकडू दिले जाते. क्रमिक अभ्यासक्रमाखेरीज इयत्ता सातवीपर्यंत बागकाम व शेती, पाकशास्त्र व वस्त्रकला, अशा कलांचा समावेश शिक्षण म्हणून केला आहे. भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रे या विषयांच्या अध्ययनासह भावात्मक व शारीरिक विकासाच्या विपुल संधी मुलांना उपलब्ध करून देण्याचा हेतू यामागे आहे.

शेतकऱ्याच्या परिस्थितीची समज यावी म्हणून.

इयत्ता सातवीपर्यंत येथील मुले चवळी, भेंडी, गवार, कारलीसारख्या भाज्या, कापूस, तुरी, ज्वारी या पावसाळी लागवडीचा, तसेच मेथी, पालक, शेपू, बीट, मुळा, गाजर अशा हिवाळी भाज्यांची लागवड करायला शिकतात. हे काम करताना जमिनीचे मोजमाप करणे, वाफे  तयार करणे, बागेचा नकाशा कागदावर तयार करणे, भौमितिक आकृत्यांचा उपयोग करीत बागेला आकार देणे, अशाही गोष्टी आत्मसात करतात. अशा परसबाग शेतीच्या माध्यमातून विविध ऋतूंतील तापमान, आद्र्रता, विहिरीतील पाण्याची पातळी, आलेख काढणे हेही शिकतात. गांडूळखत निर्मिती, कंपोस्ट खत, द्रवरूप खत, कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क, फ वारणी, मित्र किडी, नुकसानदायी किडी, मधमाश्या व कीटकांची उपयोगिता अशाही गोष्टींना विद्यार्थी सामोरे जातात. मुलांना अहिंसक पद्धतीने मध काढण्याची कला येथे गवसते. कुटारावर अळिंबीची शेती करीत त्याचे आपल्या वडिलांना मार्गदर्शन करणारी मुले ही अभिमान ठरावी अशीच. यामागचा हेतू काय, तर निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीची त्यांना समज यावी. आपले कष्ट करणारे मायबाप कुठल्या परिस्थितीला तोंड देत जीवन जगत आहेत, याविषयीची ही शाळा म्हणजे, प्रात्यक्षिक केंद्रच ठरते. पुस्तकाइतकीच मातीशी नाते सांगणारी ही मुले आहेत.

स्वयंपाक प्रयोगशाळा

या बाह्य़ प्रयोगशाळेसोबत जीवनानुभवाची अंतर्गत प्रयोगशाळा म्हणजे स्वयंपाकघरातील अनुभव होय. शाळेच्या मुख्याध्यापक सुषमा शर्मा म्हणतात की, स्वयंपाकघर हे गणित, भाषा, विज्ञान शिकण्याची विपुल संधी देणारे स्थान होय. येथेच मुले-मुली व्यवस्थापन कौशल्य शिकतात, असे त्या सांगतात. त्या हेतूने प्रत्येक मुलास महिन्यातून एकदा स्वयंपाकघरात काम करण्याची संधी दिली जाते. येथेच तो पाकशास्त्र, आहारशास्त्र, स्वच्छतेचे धडे घेतो, तसेच स्वावलंबन व लिंगसमभावाचे महत्त्व रुजते, अशी भावना आहे. वस्त्रोद्योगाच्या तासाला सूतकताई होते, कापसापासून धागा, धाग्यापासून कापड, कापडावर भरतकाम, कापड शिवून कपडे तयार करण्याची किमान कौशल्ये मुले-मुली हस्तगत करतात.

नागरिकत्वाचे धडे

देशाची पुढील पिढी म्हणून नागरिकत्वाचे धडे मतदान पद्धतीतून दिले जातात. वर्ग प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान होते. मतदानाचा अधिकार तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना असतो. प्रारंभी प्रतिनिधी कसा असावा, अशी पृच्छा होते. हा प्रतिनिधी भांडखोर नसावा. कामसू, कल्पक, उत्साही, संयमी, समंजस असावा. निसर्गमैत्री जपणारा, प्रामाणिक, माफ  करणारा, नेटका, कुशल असावा अशी अपेक्षा ठेवून प्रतिनिधी निवड होते. मुले अशी घडतात, पण ती कितपत घडली, हेसुद्धा नववर्षांचा संकल्प घेताना तपासले जाते. नळाचे पाणी वाया घालविणार नाही, पंखा विनाकारण सुरू ठेवणार नाही, अन्न शिल्लक ठेवणार नाही, सूत कातताना कापसाचा पेळू वाया घालविणार नाही अशा व अन्य स्वरूपांत प्रत्येकातील न्यूनत्व दूर करण्याचा प्रयत्न होतो. परसबागेतील फुलांना सहजतेने हाताळणारी बोटे ही तेवढय़ाच सराईतपणे संगणकावरही फि रतात. काहींची वेगळीच आवड ध्यानात ठेवून त्यांचा त्यांना आनंद शोधण्याचा पर्याय देण्याचा प्रयत्न शिक्षक करतात. गोशाळेत रमणारी, सौर कुकर तयार करणारी, चुलीचे प्रदूषणमुक्त इंधन निर्मिणारी अशी मळवाट मुले धरतात.

मुलांना घडविण्यापेक्षा अनुभवातून घडू देण्यावर भर देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करणे, हे या शाळेचे आधारभूत सूत्र आहे. मुख्य प्रवाहातील इतर शहरी शाळांतील मुलांपेक्षा आपला मुलगा कमी पडेल, ही पालकांची भीती मुलांच्या ठायी नसतेच. नई तालीम ही केवळ शिक्षणपद्धती नाही. ती जीवन जगण्याची कला होय. नई तालीमचा नव्याने विचार करीत त्यानुसार एक एक पाऊल टाकत सामान्य अशा शिक्षकसमूहाद्वारे हे काम चालले आहे. आर्थिक कमकुवत गटातील पालकांची भीती दूर करीत व इंग्रजीचा प्रभाव बाजूला सारत अध्ययनाचे धडे देण्याचा हा प्रयत्न आहे. हा मराठी विद्यार्थी काळाच्या कसोटीवर उतरणारच असा विश्वास मुख्याध्यापक म्हणून स्वत:ला वारंवार तपासत पुढे जाणाऱ्या सुषमाताई व्यक्त करतात.

 

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

प्रशांत देशमुख